Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 64:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अहाहा! तू आकाश विदारून उतरतास, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते, तर बरे होते!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 अहा! जर तू स्वर्ग दुभंगला आणि खाली उतरून आलास! तर पर्वत तुझ्या उपस्थितीत थरथरतील,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 अहा, आकाश विदारून तुम्ही खाली आलात, तर किती बरे झाले असते, तुमच्यासमोर पर्वत थरथर कापले असते!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 64:1
22 Iomraidhean Croise  

राष्ट्रे खवळली, राज्ये डळमळली; त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली.


तेव्हा भूमी कंपित झाली, व देवासमोर आकाशातून पर्जन्यवृष्टी झाली; देवासमोर, इस्राएलाच्या देवासमोर, सीनाय पर्वतदेखील कंपित झाला.


“ह्यांचा देव कोठे आहे,” असे राष्ट्रांनी का म्हणावे? तुझ्या सेवकांचा रक्तपात झाला त्याबद्दल सूड उगवण्यात आला आहे, हे आमच्यादेखत राष्ट्रांना कळू दे.


तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसर्‍या दिवशी सर्व लोकांदेखत परमेश्वर सीनाय पर्वतावर उतरेल.


त्यांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवावे, आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, अमोरी, परिज्जी, हिव्वी व यबूसी ह्यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे.


पाहा, मी तुझे तीक्ष्ण, नवीन व दुधारी असे मळणीचे औत बनवत आहे; तू डोंगर मळून त्यांचा चुराडा करशील व टेकड्यांचा भुसा करशील.


तू स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पाहा; तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे.


ज्यांच्यावर तू कधी राज्य केले नाहीस, ज्यांना तुझे नाम दिले नाही, त्यांच्यासारखे आम्ही झालो आहोत.


पाहा, परमेश्वर म्हणतो “असे दिवस येत आहेत की नांगरणारा कापणी करणार्‍याला गाठील व द्राक्षे तुडवणारा बी पेरणार्‍याला गाठील; डोंगरांवरून नवा द्राक्षारस वाहील व सर्व टेकड्यांना पाझर फुटतील.


कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर, ह्याने भूमीला हात लावताच ती विरघळते आणि तिच्यावरील सर्व रहिवासी शोक करतात; तिला नील नदीप्रमाणे पूर येईल; मिसर देशाच्या नदीप्रमाणे ती पुन्हा ओसरेल.


आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या झाडांच्या डोंगराला त्याचे पाय लागतील तेव्हा जैतुनाच्या झाडांचा डोंगर पूर्वपश्‍चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल.


आणि लगेचच पाण्यातून वर येताना, आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे, असे त्याला दिसले;


‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan