Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 63:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्यांच्या सर्व दु:खाने तो दु:खी झाला, त्याची प्रत्यक्षता दर्शवणार्‍या दिव्यदूताने त्यांचे तारण केले; त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धरले; पूर्वीचे सर्व दिवस त्याने त्यांचे लालनपालन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्यांच्या सर्व दु:खात, तो पण दु:खी झाला आणि त्याच्या समक्षतेच्या दुतांने त्यांना तारले. त्याने आपल्या प्रेमाने व आपल्या करूणेने त्यांना वाचवले, आणि त्याने सर्व पुरातन दिवसात त्यांना उचलून वाहून नेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्यांना होणार्‍या सर्व क्लेशांनी तेही व्यथित झाले, आणि त्यांच्या समक्षतेच्या स्वर्गदूताने इस्राएलचा उद्धार केला. याहवेहच्या प्रीती व करुणेमुळेच त्यांनी त्यांचा उद्धार केला; व त्यांना उचलून प्राचीन कालापासून त्यांचा भार वाहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 63:9
45 Iomraidhean Croise  

ज्या दूताने मला सर्व आपदांतून सोडवले, तो ह्या मुलांचे अभीष्ट करो; माझे नाव व माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक ह्यांचे नाव हे चालवोत आणि ह्यांची वाढ होऊन पृथ्वीच्या मध्यभागी ह्यांचा मोठा समुदाय होवो.”


सर्वसमर्थ तर अगम्य आहे, त्याचे सामर्थ्य अप्रतिम आहे; तो न्याय व महान नीतिमत्ता विपरीत करीत नाही;


हे देवा, इस्राएलास त्याच्या सर्व संकटांतून सोडव.


पण तो कनवाळू असल्यामुळे त्यांच्या अपराधाची क्षमा करीत असतो, तो नाश करीत नाही; तो आपला कोप वारंवार आवरतो, आपला सगळा संताप भडकू देत नाही.


तेव्हा देवाचा दूत इस्राएली सेनेच्या पुढे चालत असे तो निघून सेनेच्या मागे गेला आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीहून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला.


तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे; आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस.


मी मिसर्‍यांचे काय केले ते व तुम्हांला गरुडाच्या पंखांवर बसवून मी आपणाकडे कसे आणले आहे हे तुम्ही पाहिले आहे;


परमेश्वर म्हणाला, “मी स्वत: येईन आणि तुला विसावा देईन.”


तो त्याला म्हणाला, “तू स्वत: येत नसलास तर आम्हांला येथून पुढे नेऊ नकोस.


तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्नकर्ता, आणि हे इस्राएला, तुझा निर्माणकर्ता परमेश्वर, असे म्हणतो, “भिऊ नको; कारण मी तुला सोडवले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे; तू माझा आहेस.


तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जिवाबद्दल राष्ट्रे मी देईन.


तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”


ज्याने समुद्र आटवला, खोल सागराचे जल आटवले, उद्धरलेले पार उतरून जावेत म्हणून सागराच्या अगाध डोहांतून मार्ग केला, तो तूच नव्हेस काय?


यरुशलेमेच्या उद्ध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमेस उद्धरले आहे.


माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.”


यहूदाच्या घराण्यावर मी दया करीन; त्यांचा देव परमेश्वर ह्याच्या हातून त्यांचा उद्धार करीन; धनुष्य, तलवार, लढाई, घोडे अथवा स्वार ह्यांच्या द्वारे हा उद्धार करणार नाही.”


तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला.


ज्या राष्ट्रांनी तुम्हांला लुटले त्यांच्याकडे प्रताप मिळवण्यासाठी,1 त्याने मला पाठवले आहे; जो कोणी तुम्हांला स्पर्श करील तो त्याच्या डोळ्याच्या बुबुळालाच स्पर्श करील; कारण सेनाधीश परमेश्वर म्हणतो :


पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो; ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल; पाहा, करार घेऊन येणार्‍या निरोप्याची3 तुम्ही अपेक्षा करत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे.’


तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हांला खचीत सांगतो की, ज्या अर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्या अर्थी ते मला केले नाही.’


ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यांवर घेतो;


मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, “आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”


रानातील मंडळीमध्ये सीनाय पर्वतावर त्याच्याशी बोलणार्‍या देवदूताबरोबर आणि आपल्या पूर्वजांबरोबर जो होता तो हाच होय; त्यालाच आपल्याला देण्याकरता जिवंत वचने मिळाली.


तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, “शौला, शौला, माझा छळ का करतोस?”


त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची2 परीक्षा पाहू नये.


आणि तुम्ही रानातही पाहिले की, येथवर येऊन पोहचेपर्यंत जो सारा मार्ग तुम्ही आक्रमिला त्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने, मनुष्य जसा आपल्या मुलाला वाहून नेतो तसे तुम्हांला नेले.’


त्याने तुझ्या पूर्वजांवर प्रीती केली म्हणून त्यांच्यामागून त्यांच्या संतानाला त्याने निवडून घेतले आणि स्वतः आपल्या महासामर्थ्याने त्याने तुला मिसर देशातून बाहेर आणले.


त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’


कारण ज्या अर्थी त्याने स्वत: परीक्षा होत असता दु:ख भोगले त्या अर्थी ज्यांची परीक्षा होत आहे त्यांना साहाय्य करण्यास तो समर्थ आहे.


कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला.


आणि ‘विश्वसनीय साक्षी,’ मेलेल्यांमधून ‘प्रथम जन्मलेला’ व ‘पृथ्वीवरील राजांचा अधिपती’ येशू ख्रिस्त ह्याच्यापासून, तुम्हांला कृपा व शांती असो. जो आपल्यावर प्रीती करतो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकांतून मुक्त केले,’


ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात : “तू गुंडाळी घेण्यास व तिचे शिक्के फोडण्यास योग्य आहेस; कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून 1आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत


मग ते आपल्यातील परके देव टाकून देऊन परमेश्वराची सेवा करू लागले. इस्राएलांचे हाल पाहून त्याच्या मनाला खेद झाला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan