Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 63:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 परमेश्वराने आमच्यावर जे सर्व उपकार केले आणि आपल्या दयेने व आपल्या विपुल करुणेने इस्राएलाच्या घराण्याचे जे फार कल्याण केले, त्यांस अनुसरून असे परमेश्वराच्या सदय कृत्यांचे मी वर्णन करीन, त्याचे गुणानुवाद गाईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मी परमेश्वराच्या कराराचा विश्वासूपणा आणि त्याची प्रशंसनीय कृत्ये सांगेन. परमेश्वराने आम्हांसाठी जे सर्व केले आणि इस्राएलाच्या घराण्याचे जे हित केले ते मी सांगेन. त्याच्या करुणामुळेच ही दया त्याने आम्हांला दाखवली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 मी याहवेहच्या दयाळूपणाबद्दल त्यांनी केलेल्या सर्व स्तुतिपात्र कृत्यांबद्दल सांगेन, जे सर्व याहवेहनी आमच्यासाठी केले— होय, ज्या अनेक गोष्टी त्यांच्या करुणेने व विपुल दयेने, त्यांनी इस्राएलसाठी केल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 63:7
46 Iomraidhean Croise  

आठव्या दिवशी त्याने लोकांची रवानगी केली; ते सर्व राजाचे अभीष्ट चिंतून आपापल्या डेर्‍यांस गेले; आपला सेवक दावीद व आपले लोक इस्राएल ह्यांचे जे कल्याण परमेश्वराने केले त्यामुळे त्यांना आनंद वाटला व त्यांची मने हर्षभरित झाली.


राजाने सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी लोकांना आपापल्या डेर्‍यांकडे जाण्यास निरोप दिला; परमेश्वराने दाविदावर, शलमोनावर व आपल्या इस्राएल प्रजेवर जी कृपा केली होती तिच्यामुळे ते आनंदित, हर्षितचित्त झाले होते.


त्यांनी तटबंदीची नगरे व सुपीक भूमी काबीज केली, आणि उत्तमोत्तम वस्तूंनी भरलेली घरे, खोदलेले हौद, द्राक्षांचे मळे, जैतुनांचे मळे व विपुल फळझाडे ह्यांचा ताबा घेतला; ते खाऊन तृप्त झाले, धष्टपुष्ट झाले आणि तुझ्या अतिशय चांगुलपणामुळे सुख पावले.


त्यामुळे तू त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हाती दिले; त्यांनी त्यांना संकटात घातले; तरी आपल्या विपत्काळी त्यांनी तुझा धावा केला; तो तू स्वर्गातून ऐकलास व तुझ्या दयेच्या बहुत कृत्यांना अनुसरून त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून सोडवण्यासाठी तू त्यांना सोडवणारे दिलेस.


तरी तू आपल्या दयेच्या बहुत कृत्यांना अनुसरून त्यांचा पुरा अंत केला नाहीस, त्यांचा त्याग केला नाहीस, कारण तू कृपाळू व दयाळू देव आहेस.


त्यांनी आपल्या राज्यात तुझी सेवा केली नाही; तू त्यांचे मोठे कल्याण केलेस, आणि तू त्यांना विस्तृत व सुपीक भूमी दिली, तरीही तुझी सेवा त्यांनी केली नाही आणि आपल्या दुष्कर्मापासून ते परावृत्त झाले नाहीत.


हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस;


परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत;


परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्यांबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.


परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.


परमेश्वराच्या दयेबद्दल व त्याने मनुष्यांसाठी केलेल्या अद्भुत कृत्याबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत;


ते तुझ्या परमदयेची आठवण काढतील; व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील.


हे परमेश्वरा, तू आपला कळवळा व वात्सल्य आठव; ती पुरातन काळापासून आहेत.


हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर; तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक.


तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे; माझे ओठ तुझे स्तवन करतील.


तरी हे प्रभू, तू सदय व कृपाळू देव आहेस; मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस.


हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणार्‍या सर्वांवर विपुल दया करणारा आहेस.


प्रभातसमयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे,


परमेश्वराने इस्राएलांना मिसरी लोकांच्या हातातून सोडवून त्यांचे जे कल्याण केले त्या सर्वांबद्दल इथ्रोला आनंद वाटला.


हे आमच्या देवा, परमेश्वरा, तुझ्याहून अन्य सत्ताधीशांनी आमच्यावर सत्ता चालवली होती, पण तुझ्याच द्वारे आम्ही तुझे नाम स्तवतो.


अब्राहाम तुमचा पिता व सारा तुमची जननी ह्यांच्याकडे लक्ष द्या; तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलावले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले.


कारण पर्वत दृष्टिआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही; माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो.


केवळ क्षणभर मी तुला सोडले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन.


रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले; पण मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो.


दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.


जो आवडीने नीती आचरतो त्याला, जे तुझ्या मार्गाने चालताना तुझे स्मरण करतात, त्यांना तू भेट देतोस; पाहा, तू आमच्यावर कोपलास, कारण आम्ही पापी ठरलो; ह्या स्थितीत आम्ही बहुत काळ आहोत; तर आमचा उद्धार होईल काय?


तो जरी दु:ख देतो तरी तो आपल्या दयेच्या वैपुल्यानुसार करुणा करतो.


मी तुला सर्वकाळासाठी आपली वाग्दत्त असे करीन, नीतीने व न्यायाने, व ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन.


त्यांची आबादानी केवढी! त्यांचे सौंदर्य केवढे! धान्य तरुणांना आणि नवा द्राक्षारस तरुणींना धष्टपुष्ट करील.


मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषेकरून चांगल्या देणग्या देईल?


किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?


शिवाय अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्राचा प्रवेश झाला; तरी जेथे पाप वाढले तेथे कृपा त्यापेक्षा विपुल झाली.


तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे,


आणि ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांसह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan