Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 63:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 मी आपल्या क्रोधाने राष्ट्रांना तुडवले; मी त्यांना आपल्या संतापाच्या मद्याने बेहोश केले व त्यांचे रक्त भूमीवर वाहवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 माझ्या रागात मी लोकांस पायाखाली तुडवले आणि त्यांना माझ्या रागात मस्त केले आणि त्यांचे रक्त मी पृथ्वीवर उडवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 क्रोधाच्या भरात मी राष्ट्रांना तुडविले; माझ्या संतापाच्या भरात मी त्यांना मद्यधुंद केले आणि त्यांचे रक्त जमिनीवर ओतले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 63:6
24 Iomraidhean Croise  

तो आपल्याच डोळ्यांनी आपला नाश पाहो; तो सर्वसमर्थाच्या संतप्त कोपाचे प्राशन करो.


तू आपल्या लोकांना कठीण प्रसंग दाखवला आहेस; तू आम्हांला जणू काय झोकांड्या खाण्यास लावणारा द्राक्षारस पाजला आहेस;


पाहा, परमेश्वराच्या हाती प्याला आहे व त्यात द्राक्षारस फेसाळत आहे; त्यात मसाला मिसळला आहे आणि त्यातून तो ओतून देतो; पृथ्वीवरील सर्व दुर्जनांना तो खातरीने गाळासकट प्यावा लागेल.


कारण दृष्टान्ताच्या खोर्‍यात हा दिवस प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने गडबडीचा, पायमल्लीचा व घाबरण्याचा असा नेमलेला आहे; ह्या दिवशी भिंती मोडतील आणि डोंगरात आरोळ्यांचा प्रतिध्वनी होईल.


थांबा, विस्मय पावा, आपले डोळे मिटा, अंध व्हा; ते मस्त झाले आहेत पण द्राक्षारसाने नव्हत; ते झोकांडे खात आहेत पण मद्याने नव्हत.


कारण परमेश्वराचा कोप सर्व राष्ट्रांवर होत आहे, त्याचा संताप त्यांच्या सर्व सैन्यांवर होत आहे; त्याने त्यांचा सर्वस्वी नाश केला आहे; त्याने त्यांचा वध करण्यास लावले आहे.


रेडे, रानबैल व गोर्‍हे हे सर्व त्यांच्याबरोबर पडतील; त्यांच्या रक्ताने त्यांची भूमी भिजून जाईल; तेथली माती मांद्याने भरून जाईल.


तुझा छळ करणार्‍यांना स्वतःचेच मांस खायला लावीन; नव्या द्राक्षारसाने जसे लोक मस्त होतात तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील; ह्यावरून मी परमेश्वर तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे सर्व मानवजातीला समजेल.”


हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.


त्या तुम्हांला तलवार नेमली आहे; तुम्ही सगळे वधासाठी खाली वाकाल; कारण मी हाक मारली तरी तुम्ही उत्तर दिले नाही; मी बोललो तरी तुम्ही ऐकले नाही; माझ्या दृष्टीने जे वाईट ते तुम्ही केले, जे मला नापसंत ते तुम्ही पसंत केले.”


तेव्हा त्यांना तू सांग, ‘पाहा, परमेश्वर म्हणतो, मी ह्या देशाचे सर्व रहिवासी म्हणजे दाविदाच्या गादीवर बसणारे राजे, याजक, संदेष्टे व सर्व यरुशलेमनिवासी ह्यांना मद्याने मस्त करीन.


त्याने मला क्लेशाने व्यापले आहे, तो मला कडू दवणा पाजतो.


परमेश्वर म्हणतो, “मी लुटीसाठी उठेन तोवर माझी वाट पाहा. कारण राष्ट्रे एकत्र जमवावीत, राज्ये एकत्र मिळवावीत; त्यांच्यावर माझा क्रोध, माझा सर्व संतप्त क्रोध पडावा हा माझा निश्‍चय आहे; कारण माझ्या ईर्ष्येच्या अग्नीने सर्व पृथ्वी भस्म होईल.


तोही ‘देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला’ त्याचा क्रोधरूपी द्राक्षारस पिईल, आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकर्‍यासमक्ष त्याला ‘अग्नी व गंधक’ ह्यांपासून पीडा होईल.


मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले; राष्ट्रांची नगरे कोसळली. तेव्हा देवाने आपला ‘तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला’ द्यावा, म्हणून त्याच्यासमोर तिचे स्मरण करण्यात आले.


कारण त्यांनी पवित्र जनांचे व संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले’ आणि तू ‘त्यांना रक्त पिण्यास’ लावले आहे; ह्यास ते पात्र आहेत.”


नंतर एका बलवान देवदूताने जात्याच्या एका मोठ्या तळीसारखा धोंडा उचलला ‘आणि’ तो समुद्रात ‘भिरकावून म्हटले, “‘अशीच’ ती ‘मोठी’ नगरी ‘बाबेल’ झपाट्याने टाकली जाईल ‘व ह्यापुढे कधीही सापडणार नाही;”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan