Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 63:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ज्याने आपला प्रतापी भुज मोशेच्या उजव्या बाजूने चालवला, आपले नाम सर्वकाळ राहावे म्हणून ज्याने त्यांच्यापुढे समुद्र दुभागला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 ज्याने आपले वैभवशाली सामर्थ्य मोशेच्या उजव्या हाताने पुढे नेले, आणि ज्याने आपणास सार्वकालिक नाव करायला त्यांच्यापुढे समुद्र दुभागला, तो देव कोठे आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मोशेच्या उजव्या हाताजवळ राहण्यासाठी आपल्या प्रतापी सामर्थ्याची भुजा पाठविणारे, त्यांच्यासमोर समुद्राच्या जलास दुभागून अजरामर किर्ती मिळविली,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 63:12
23 Iomraidhean Croise  

(कारण तुझे मोठे नाम, बलिष्ठ हात व पुढे केलेला बाहू हे सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच,) आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली,


फारो, त्याचे सेवक, त्याच्या देशाचे सर्व लोक ह्यांना चिन्हे व अद्भुत कृत्ये तू दाखवलीस; कारण ते त्यांच्याशी गर्वाने वागत होते हे तुला ठाऊक होते; तू आपल्या नामाचा महिमा प्रकट केला; तो आजवर आहे.


तू त्यांच्यासमोरून समुद्र दुभंग केला, असा की ते समुद्रामधून कोरड्या जमिनीवरून चालून गेले; धोंडा महाजलाशयात टाकावा त्याप्रमाणे तू त्यांचा पाठलाग करणार्‍यांना समुद्रतळी फेकले.


त्याने समुद्र दुभागून त्यातून त्यांना पार नेले; त्याने पाणी राशीसारखे उभे केले.


हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस, तो तू कान दे; जो तू करूबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रकट कर.


तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे; आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस.


भीती व दहशत त्यांना घेरतात; तुझ्या बाहुपराक्रमाने ते दगडाप्रमाणे निश्‍चल झाले आहेत; हे परमेश्वरा, तुझे लोक पार जाईपर्यंत, तू खरेदी केलेली प्रजा पार निघून जाईपर्यंत असे होईल.


हे परमेश्वरा, तुझा उजवा हात बळाने प्रतापी झाला आहे; हे परमेश्वरा, तुझा उजवा हात शत्रूला चिरडून टाकतो.


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


परमेश्वर मिसरी समुद्राची खाडी नष्ट करील; तो आपला उष्ण श्वास सोडून आपला हात नदावर (फरातावर) परजील; त्यावर प्रहार करून त्याचे सात फाटे करील; त्यांवरून लोकांना जोडे घालून जाता येईलसे करील.


जो समुद्रात मार्ग, प्रचंड प्रवाहात वाट करतो,


मी खोल पाण्याच्या डोहास म्हणतो, ‘कोरडा हो, मी तुझे प्रवाह आटवीन;’


ज्याने समुद्र आटवला, खोल सागराचे जल आटवले, उद्धरलेले पार उतरून जावेत म्हणून सागराच्या अगाध डोहांतून मार्ग केला, तो तूच नव्हेस काय?


काटेर्‍याच्या जागी सरू उगवेल, रिंगणीच्या जागी मेंदी उगवेल; ह्यावरून परमेश्वराचे नाव होईल; ते सर्वकाळचे चिन्ह होईल, ते कधी नष्ट होणार नाही.”


परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही; मी त्याच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला.


तू मिसर देशात चिन्हे व अद्भुत कृत्ये केलीस; आजवर इस्राएलात व इतर लोकांत ती करीत आला आहेस आणि आज आहे तसे तू आपले नाम केले आहेस.


तू चिन्हे व अद्भुत कृत्ये दाखवून समर्थ हाताने व बाहू उभारून मोठी दहशत घालून आपले लोक इस्राएल ह्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस;


शास्त्रलेख फारोला असे सांगतो, “मी तुला पुढे केले आहे ते ह्याचकरता की, तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे.”


तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बर्‍याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगराजवळ साठून चढले व त्याची रास झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षार समुद्र ह्याकडे जात होते ते अगदी वाहून गेले; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan