Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 63:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 अदोमाहून येत आहे हा कोण? लालभडक वस्त्रे लेऊन बसराहून येत आहे हा कोण? आपल्या वस्त्राभरणांनी भूषित होऊन, आपल्या पराक्रमाच्या आढ्यतेने डुलत येत आहे हा कोण? “जो नीतीने बोलणारा, जो तारण करण्यास समर्थ तो मी आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जो अदोमाहून येत आहे, जो लाल वस्रे घातलेला बस्राहून येत आहे, तो कोण आहे? जो राजेशाही वस्त्रे असलेला, जो त्याच्या महान शक्तीमुळे आत्मविश्वासाने कूच करीत आहे, तो कोण आहे? जो न्यायीपणाने बोलणारा, आणि तारायला सामर्थ्य आहे, तो मीच आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 एदोमाहून व बस्रा शहराहून, किरमिजी रंगाने रंगविलेली वस्त्रे घालून, वैभवी वस्त्रे परिधान करून त्यांच्या महान सामर्थ्याने वेगाने पावले पुढे टाकत येणारे हे कोण आहेत? “विजयाची घोषणा करीत, तारण करण्यास समर्थ असलेला, हा मी आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 63:1
39 Iomraidhean Croise  

बेला मेल्यावर बस्रा येथला जेरहाचा मुलगा योबाब त्याच्या जागी राजा झाला.


तो आपले तरुण गाढव द्राक्षलतेला, आपल्या गाढवीचे शिंगरू उत्तम द्राक्षलतेला बांधून ठेवील; तो आपले वस्त्र द्राक्षारसात, आपला पोशाख द्राक्षांच्या रक्तात धुईल.


बेला मेल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब त्याच्या गादीवर बसला.


देवाच्या साहाय्याने आम्ही पराक्रम करू; तोच आमच्या शत्रूंना तुडवून टाकील.


हे परमेश्वरा, अदोमी लोकांविरुद्ध यरुशलेमेच्या त्या दिवसाची आठवण ठेव; ते म्हणाले, “ती पाडून टाका, पायापर्यंत जमीनदोस्त करा.”


तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस.


गंधरस व ऊद, सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये ह्यांच्या सुगंधाने युक्त असे धुरांच्या स्तंभांसारखे रानातून हे येत आहे ते काय?


“ही प्रभातेसारखी आरक्त, चंद्रासारखी सुंदर, सूर्यासारखी निर्मळ, ध्वजा फडकवणार्‍या सेनेप्रमाणे भीती उत्पन्न करणारी अशी ही दर्शन देत आहे, ती कोण?”


आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण? सफरचंदाच्या झाडाखाली मी तुझे प्रेम जागृत केले; तेथे तुझी माता तुला प्रसवली; तुझ्या जननीला तेथे प्रसववेदना झाल्या.


ते पश्‍चिमेकडे पलिष्ट्यांच्या खांद्यावर (खालाटीवर) झडप घालतील; ते एकत्र होऊन पूर्वदेशीयांना लुटतील; अदोम व मवाब ह्यांना हस्तगत करतील; आणि अम्मोनी त्यांना वश होतील.


अहो राष्ट्रांनो, ऐकायला जवळ या; लोकांनो कान द्या; पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, जग व त्यात उपजलेले सर्वकाही ऐकोत.


पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी आधार आहे; पाहा, हा माझा निवडलेला, ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; ह्याच्या ठायी मी आपला आत्मा घातला आहे; तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल.


चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्याय पुढे आणील.


मी गुप्तपणे अंधकारमय प्रदेशाच्या स्थळी बोललो असे नाही; ‘शून्य स्थळी मला शोधा,’ असे याकोबाच्या वंशाला मी म्हणालो नाही; नीतिमत्ता सांगणारा, रास्त गोष्टी विदित करणारा असा मी परमेश्वर आहे.


मी आपली शपथ वाहिली आहे; माझ्या न्याय्यत्वाच्या मुखातून वचन निघाले आहे, ते बदलणार नाही; ते हे की, ‘माझ्यापुढे प्रत्येक जण गुडघा टेकील, प्रत्येक जिव्हा माझ्या ठायी निष्ठेची शपथ वाहील.’


युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.


त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


करीयोथ, बसरा आणि मवाब देशातली दूर व जवळची नगरे ह्यांना शासन झाले आहे.


परमेश्वर म्हणतो, मी आपल्या जीविताची शपथ वाहिली आहे की बसरा विस्मय, निंदा, उजाडी व शाप ह्यांना पात्र होईल; त्याची सर्व नगरे कायमची ओसाड होतील.”


प्रभू परमेश्वर म्हणतो, अदोमाने यहूदाच्या घराण्याचा सूड उगवण्याच्या बुद्धीने वर्तन केले, त्याने त्याच्यावर सूड उगवला हे पातक केले;


परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे :


प्रभू परमेश्वर म्हणतो, माझे सेवक जे इस्राएलाचे संदेष्टे त्यांच्या द्वारे पुरातन काळी ज्याविषयी मी बोललो होतो आणि त्या काळी बहुत वर्षे त्यांनी ज्याविषयी असा संदेश दिला होता की, मी तुला त्यांच्यावर चाल करण्यास आणीन, तो तूच ना?


ओबद्याला झालेला दृष्टान्त : अदोमाविषयी प्रभू परमेश्वराने हे म्हटले : परमेश्वरापासून आम्ही हे वर्तमान ऐकले आहे; एक जासूद राष्ट्रांमध्ये पाठवला आहे; तो म्हणतो, “उठा, आपण त्यांच्याबरोबर लढायला जाऊ.”


अरे तेमाना, तुझे वीर कच खातील, म्हणजे प्रत्येकाचा वध होऊन एसावाच्या पहाडातून सर्व नष्ट होतील.


परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्‍या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल.


परमेश्वर म्हणतो, “मी तुमच्यावर प्रीती केली. पण तुम्ही विचारता, तू कोणत्या बाबतीत आमच्यावर प्रीती केलीस?” परमेश्वर म्हणतो, “एसाव याकोबाचा भाऊ नव्हता काय? तरी मी याकोबावर प्रीती केली;


“बालाका, ऊठ, ऐकून घे; सिप्पोरपुत्रा, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही की त्याने लबाडी करावी; तो काही मानवपुत्र नाही की त्याने अनुताप करावा; दिलेले वचन तो पाळणार नाही काय? दिलेला शब्द तो पुरा करणार नाही काय?


तो यरुशलेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, “हा कोण?”


ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणार्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.


रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते; आणिदेवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते;


Lean sinn:

Sanasan


Sanasan