Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 60:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 खरेच, द्वीपे माझी वाट पाहत आहेत; तुझा देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी, इस्राएलाच्या पवित्र प्रभूसाठी तार्शीशची गलबते तुझ्या पुत्रांना त्यांच्या सोन्यारुप्यांसहित दुरून घेऊन प्रथम येत आहेत, कारण परमेश्वराने तुला वैभवयुक्त केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 द्वीपे माझी वाट पाहतात, आणि परमेश्वर तुझा देव याच्या नावासाठी, आणि इस्राएलाच्या पवित्रासाठी तुझ्या मुलांना आपले सोने व रुपे यांसहीत दुरुन आणावे, म्हणून पहिल्याने तार्शीशाची जहाजे वाट पाहतील, कारण त्याने तुला शोभविले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 निश्चितच द्वीप माझ्याकडे बघतात; सर्वात पुढे तार्शीशची गलबते आहेत, तुझी लेकरे दूरवरून तुझ्याकडे आणत आहेत, त्यांनी आपले चांदी व सोनेही बरोबर आणले आहे, इस्राएलचे पवित्र परमेश्वर याहवेह, आमच्या परमेश्वराला गौरविण्यासाठी त्यांनी तुला ईश्वरदत्त तेजस्विता बहाल केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 60:9
46 Iomraidhean Croise  

देव याफेथाचा विस्तार करील; तो शेमाच्या डेर्‍यात राहील; आणि कनान त्याचा दास होईल.”


परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्‍नांनी त्याची परीक्षा पाहायला आली.


समुद्रावर हीरामाच्या जहाजांबरोबर राजाच्याही तार्शीश जहाजांचा एक तांडा असे, आणि तीन-तीन वर्षांनी ही तार्शीश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत.


सोने आणण्यासाठी ओफीर येथे जाता यावे म्हणून यहोशाफाटाने तार्शीशी गलबते बांधली; ती एसयोन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती गेली नाहीत.


तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला,


पूर्वेच्या वार्‍याने तार्शीशची गलबते तू फोडतोस.


तार्शीश व द्वीपे ह्यांचे राजे खंडणी देवोत, शबा व सबा ह्यांचे राजे नजराणे आणोत.


परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी उल्लास करो; द्वीपसमूह हर्ष करो!


तो म्हणाला, “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; तुझ्यासमोर ‘परमेश्वर’ ह्या नावाची मी घोषणा करीन; ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन.


मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात; त्याला आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे.


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


तार्शीशाची सर्व गलबते व सर्व मनोहर मनोरे ह्यांसाठी दिवस नेमला आहे.


ह्यास्तव उगवतीकडल्या लोकांनो, परमेश्वराचे गौरव करा; समुद्रतीरी राहणार्‍यांनो, इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या नामाचे गौरव करा.


अहो समुद्रावर पर्यटन करणारे व त्यात राहणारे सर्व लोकहो, अहो द्वीपांनो, तुम्ही आपल्या रहिवाशांसह परमेश्वराला नवगीत गा, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्याची स्तोत्रे गा.


पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही; द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची प्रतीक्षा करतात.


तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस; तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून तुझ्याबद्दल माणसे व तुझ्या जिवाबद्दल राष्ट्रे मी देईन.


मी उत्तरेला म्हणेन, ‘देऊन टाक’; दक्षिणेला म्हणेन, ‘अटकाव करू नकोस’; माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या;


मी आपला न्याय जवळ आणत आहे, आता तो दूर नाही; माझ्याकडून होणार्‍या उद्धारास विलंब लागणार नाही; मी सीयोनेत उद्धार स्थापतो, इस्राएलास माझे गौरव देतो.”


द्वीपांनो, माझे ऐका; दूरदूरच्या राष्ट्रांनो, कान द्या; मी गर्भावस्थेत असतानाच परमेश्वराने मला बोलावले; मी मातेच्या उदरात होतो तेव्हाच त्याने माझे नाव घेतले.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी राष्ट्रांना आपल्या हाताने इशारा करीन, लोकांसमोर आपला झेंडा उभारीन; ते तुझ्या पुत्रांना आपल्या उराशी धरून आणतील; तुझ्या कन्यांना खांद्यांवर बसवून पोहचत्या करतील.


माझा न्याय समीप आला आहे, माझे उद्धारकार्य सुरू झाले आहे, माझे भुज राष्ट्रांचा न्याय करतील; द्वीपांना माझा ध्यास लागला आहे, त्यांचा भरवसा माझ्या बाहूंवर आहे.


पाहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू ह्याच्यामुळे असे होईल.


त्याच्या स्वार्थमूलक अधर्मामुळे मी रागावून त्याला ताडन केले, मी विन्मुख झालो, मी त्याच्यावर कोपलो; पण तो आपल्या मनाच्या कलाप्रमाणे वागत गेला.


तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होत आहेत, तुझ्याकडे येत आहेत; तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत.


उंटांच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील, परमेश्वराचा आनंदाने गुणानुवाद करतील.


कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, नदीप्रमाणे शांती व पाण्याच्या पुराप्रमाणे राष्ट्रांचे वैभव मी तिच्याकडे वाहवतो; तुम्ही स्तनपान कराल, तुम्हांला कडेवर वागवतील, मांडीवर खेळवतील.


त्या काळी यरुशलेमेस परमेश्वराचे सिंहासन म्हणतील, त्याच्याकडे सर्व राष्ट्रे जमा होतील. कारण परमेश्वराचे नाम यरुशलेमेत आहे; ह्यापुढे ती आपल्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टाप्रमाणे चालणार नाहीत.


त्यांमधून उपकारस्मरणाचा व आनंदोत्सव करणार्‍यांचा शब्द उठेल; मी त्यांची संख्या वाढवीन. ती अल्प होणार नाही; मी त्यांचे गौरव करीन म्हणजे ते क्षुद्र असणार नाहीत.


मी आपल्या इस्राएल लोकांत माझे पवित्र नाम प्रकट करीन; ह्यापुढे आपल्या पवित्र नामाची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही; तेव्हा मी परमेश्वर, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे असे राष्ट्रांना समजून येईल.


सीयोनकन्ये, ऊठ, मळणी कर; मी तुझे शिंग लोखंडासारखे व तुझे खूर पितळेसारखे करतो; तू अनेक राष्ट्रांचा चुराडा करशील, त्यांची कमाई परमेश्वराला वाहशील, त्यांची संपत्ती सकल पृथ्वीच्या प्रभूला तू वाहशील.


त्या दिवशी अश्शूर देशातून, मिसर देशातील नगरांतून, मिसर देशापासून फरात नदीपर्यंतच्या प्रांतांतून, दूरदूरच्या समुद्रतीरांहून व दूरदूरच्या पर्वतांवरून लोक तुझ्याकडे येतील.


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


यहूदाही यरुशलेमेत युद्ध करील; आसपासच्या सर्व राष्ट्रांतील धन जमा होईल; सोने, रुपे व पोशाख ह्यांचा पूर लोटेल.


ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या ‘इस्राएल’ लोकांचे ‘वैभव’ असे आहे.”


मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”


परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा; कारण परराष्ट्रीय, राजे व इस्राएलाची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे;


कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात.


वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे.


त्यांनी त्याला म्हटले, “तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव ऐकून तुझे दास फार दूर देशाहून आले आहेत; त्याची कीर्ती व त्याने मिसर देशात जे जे केले ते सर्व आम्ही ऐकले आहे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan