Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 60:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 “तू टाकलेली आणि तिरस्कारयुक्त होतीस, तुझ्यातून कोणीही जात नसे, मी तुला चिरकालासाठी गौरवाची एक गोष्ट करीन, एका पिढी पासून दुसऱ्या पिढीपर्यंतचा आनंद असे करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “जरी तुझा तिरस्कार व त्याग करण्यात आला होता, तुझ्यामधून कोणीही प्रवास करीत नसत, तरी मी तुला कायमचे अभिमानास्पद स्थान बनवेन, आणि सर्व पिढ्यांकरिता हर्षदायक करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 60:15
20 Iomraidhean Croise  

तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो; प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहर्‍यावरील अश्रू पुसतो; तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करतो, कारण परमेश्वर हे बोलला आहे.


मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दु:ख व उसासे पळ काढतील.


त्या दिवशी परमेश्वराचा अंकुर शोभिवंत व तेजस्वी होईल; भूमीचे उत्पन्न इस्राएलाच्या बचावलेल्यांना वैभव व शोभा देणारे होईल.


मी म्हणालो, “हे प्रभू, असे कोठवर?” तो म्हणाला, “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल,


परमेश्वर लोकांना दूर घालवून देईल व देशात ओसाड स्थळे बहुत होतील तोवर.


तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हांला दुप्पट मिळेल; आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतनभागानेच ते आनंद पावतील; असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील; त्यांना सार्वकालिक आनंद प्राप्त होईल.


ह्यापुढे तुला सोडलेली म्हणणार नाहीत, ह्यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत; तर तुला हेफसीबा (ती माझा आनंद) व तुझ्या भूमीला बऊल (विवाहित) म्हणतील; कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस, तुझी भूमी सधवा होईल.


परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा; पाहा, मी यरुशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करतो.


परमेश्वराचे वचन ऐकून कंपायमान होणार्‍यांनो, त्याचे वचन ऐका : “तुमचा द्वेष करणारे तुमचे जे बंधू माझ्या नामाचे निमित्त करून तुम्हांला हाकून देतात व म्हणतात की, ‘परमेश्वराचा गौरव होवो म्हणजे तुमचा हर्ष आम्हांला पाहण्यास मिळेल,’ ते फजीत होतील.


मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’


त्यांत आनंद व हर्ष ह्यांचा ध्वनी होईल, नवर्‍याची व नवरीची वाणी ऐकू येईल; ‘सेनाधीश परमेश्वराची स्तुती असो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सर्वकाळची आहे,’ असे म्हणून जे परमेश्वराच्या मंदिरात स्तुत्यर्पणे आणतात त्यांचा शब्द पुन्हा ऐकू येईल. कारण मी देशाचा बंदिवास उलटवून आरंभी होते तसे सर्वकाही करीन, असे परमेश्वर म्हणतो.


कारण परमेश्वर याकोबाचे ऐश्वर्य इस्राएलाच्या ऐश्वर्याप्रमाणे पुन्हा स्थापत आहे; लुटारूंनी त्यांना लुटले आहे, त्यांच्या द्राक्षींची नासधूस केली आहे.


“जी राष्ट्रे त्यांच्या ओळखीची नाहीत त्यांमध्ये मी त्यांना वावटळीने उडवीन. त्यांच्यामागे त्यांचा देश उजाड झाला आहे; त्यातून कोणी जातयेत नाही; कारण त्यांनी उत्तम भूमी वैराण केली आहे.”


तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना दिले’ आहे; आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी ‘तुडवतील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan