Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 60:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 परदेशचे लोक तुझे कोट बांधत आहेत, त्यांचे राजे तुझी सेवा करत आहेत; कारण मी क्रोधाविष्ट होऊन तुला ताडन केले तरी आता मी प्रसन्न होऊन तुझ्यावर दया केली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 विदेश्यांची मुले तुझ्या भींती पुन्हा बांधतील, आणि त्यांचे राजे तुझी सेवा करतील. “जरी रागात मी तुला शिक्षा केली, परंतु आता माझ्या प्रसन्नतेने मी तुझ्यावर दया केली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “परदेशी तुझ्या तटबंदीची पुनर्बांधणी करतील, राजे तुझी सेवा करतील. जरी मी माझ्या क्रोधाने तुला फटकारले, तरी आता कृपावंत होऊन मी तुझ्यावर दया करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 60:10
20 Iomraidhean Croise  

तू उठून सीयोनेवर दया करशील; कारण तिच्यावर कृपा करण्याचा समय आला आहे. नेमलेला समय येऊन ठेपला आहे;


त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो; त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो; रात्री विलापाने बिर्‍हाड केले तरी प्रात:काळी हर्षध्वनी होतो.


त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, तुझा मी धन्यवाद करतो, कारण तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप शमला आहे व तू माझे सांत्वन केले आहेस.


राजे बापासमान तुझे पालक होतील, त्यांच्या राण्या तुझ्या दाया होतील; ती तुला भूमीपर्यंत लवून नमन करतील. तुझ्या पायांची धूळ चाटतील; तेव्हा मी परमेश्वर आहे, माझी आस धरणारे फजीत होत नाहीत, असे तुला कळून येईल.”


तसेच परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यांतील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात,


राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील.


परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे;


परके उभे राहून तुमचे कळप चारतील. परदेशी तुमचे नांगरे व द्राक्षांचे मळे लावणारे होतील.


हे परमेश्वरा, फार कोपू नकोस, आमचा अधर्म सदा स्मरू नकोस, पाहा, दृष्टी लाव, आम्ही तुला विनवतो, आम्ही सर्व तुझी प्रजा आहोत!


त्यांच्यातून काही जण याजक व लेवी व्हावेत म्हणून मी घेईन, असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा परमेश्वराने आपल्या देशाविषयी ईर्ष्या धरली, तो आपल्या लोकांविषयी कळवळला.


“मग जे दूर आहेत ते येतील व परमेश्वराचे मंदिर बांधण्यास हातभार लावतील आणि सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तुम्हांला कळून येईल. परमेश्वर तुमचा देव ह्याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल.”


‘राष्ट्रे’1 तिच्या ‘प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे’ आपले ‘वैभव’ व सन्मान तिच्यात आणतात.


‘राष्ट्राचे वैभव’ व प्रतिष्ठा तिच्यात आणतील;


Lean sinn:

Sanasan


Sanasan