Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 6:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा मी म्हणालो, “मला हाय हाय आहे! कारण मी आता मरणार आहे. कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे, आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, कारण माझ्या डोळ्यांनी राजाला, परमेश्वरास, सेनाधीश परमेश्वरास पाहीले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “मला धिक्कार असो!” मी ओरडलो. “मी उद्ध्वस्त झालो! कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांमध्ये राहतो आणि माझ्या डोळ्यांनी महाराज सर्वसमर्थ याहवेह यांचे मुखावलोकन केले आहे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 6:5
33 Iomraidhean Croise  

तो पनुएल (पनीएल) सोडून चालला असता सूर्योदय झाला; आणि तो आपल्या मांडीमुळे लंगडत चालला;


हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. (सेला)


त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; त्याच्या पायांखाली नीलकांत मण्यांच्या चबुतर्‍यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखे स्वच्छ होते.


तो आणखी म्हणाला, “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला.


तरीपण” तो म्हणाला की, “तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही.”


तेव्हा मोशे परमेश्वराला म्हणाला, “हे प्रभू, मी बोलका नाही; पूर्वीही नव्हतो, व तू आपल्या दासाशी बोललास तेव्हापासूनही नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे.”


तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, “पाहा, इस्राएल लोकांनी माझे ऐकले नाही, तर फारो माझे कसे ऐकेल? मी बेसुनत ओठांचा3 आहे.”


तेव्हा मोशे परमेश्वरासमोर म्हणाला, “पाहा, मी बेसुनत (जड) ओठांचा आहे, तर फारो माझे कसे ऐकणार?”


नीतिमानाची प्रतिष्ठा होवो अशी गीते दिगंतापासून आमच्या कानी पडली. तेव्हा मी म्हणालो, “माझा नाश झाला हो नाश झाला! हायहाय! ठकांनी ठकवले, ठकांनी ठकबाजीने ठकवले.”


प्रभू म्हणाला आहे की, “हे लोक माझ्यासमीप येऊन आपल्या तोंडच्या शब्दांनी माझा सन्मान करतात, तरी माझ्यापासून आपले अंतःकरण दूर राखतात, आणि हे माझे भय बाळगतात ते केवळ मनुष्यांनी पढवलेल्या आज्ञेप्रमाणे बाळगतात.


तुझे नेत्र राजाला वैभवसंपन्न असा पाहतील. ते दूरवर विस्तृत झालेली भूमी पाहतील.


कारण तुमचे हात रक्ताने, तुमची बोटे अधर्माने विटाळली आहेत; तुमची वाणी असत्य आहे, तुमची जिव्हा दुष्टतेचे शब्द पुटपुटते.


आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे.


तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.”


मी त्याचे सरदार, त्याचे ज्ञानी, त्याचे अधिपती व नायब अधिपती, आणि त्याचे वीर ह्यांना मस्त करीन; ते कायमचे निद्रावश होतील, ते उठायचे नाहीत, असे सेनाधीश परमेश्वर, हे नाम धारण करणारा राजेश्वर म्हणतो.


“मानवपुत्रा, तू फितुरी घराण्यात राहत आहेस, त्यांना डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही; कारण ते फितुरी घराण्यातले आहेत.


लोक येतात तसे ते तुझ्याकडे येऊन माझ्या लोकांच्या रीतीप्रमाणे तुझ्यापुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात, पण त्यांचे मन लोभवश झाले आहे.


मी बोलत व प्रार्थना करीत असता, माझे पाप व माझे लोक इस्राएल ह्यांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर ह्याच्याकडे विनवणी करीत असता,


मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे.


मग इस्राएल लोक मोशेला म्हणाले, “आम्ही मरत आहोत, आमचा नाश होत आहे, आम्ही सर्वच नष्ट होत आहोत.


मानोहा आपल्या स्त्रीला म्हणाला, “आपण खात्रीने मरणार, कारण आपण देवाला पाहिले आहे.”


हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनाच्या लक्षात आले तेव्हा तो म्हणाला, “हाय, हाय, हे प्रभू परमेश्वरा! खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan