Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 6:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 घोषणा करणार्‍यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले व मंदिर धुराने भरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जे कोणी घोषणा करीत होते त्यांच्या वाणीने दरवाजे व उंबरठे हादरले, आणि मंदिर धुराने भरून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराच्या चौकटी व उंबरठा हादरला व सर्व मंदिर धुराने भरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 6:4
12 Iomraidhean Croise  

कर्णे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे, झांजा आदिकरून वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्चस्वरे करू लागले; ती अशी : “तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे.” तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.


त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता, त्याच्या मुखातून ग्रासणारा अग्नी निघत होता, त्यामुळे निखारे धगधगत होते.


मग दर्शनमंडपावर मेघाने छाया केली व निवासमंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.


ते चालत असता मला त्यांच्या पंखांचा आवाज ऐकू आला; तो महाजलाशयांच्या आवाजासारखा, सर्वसमर्थाच्या वाणीसारखा होता; लष्कराच्या गजबजीप्रमाणे तो मोठा होता; ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडत.


करूबांच्या पंखांचा ध्वनी बाहेरच्या अंगणात ऐकू जात होता; सर्वसमर्थ देवाच्या वाणीसारखा तो होता.


तीनही मजल्यांवर असलेले द्वारांचे उंबरठे, झरोके आणि उंबरठ्याभोवतालचे सज्जे ह्यांना तक्तपोशी होती; जमिनीपासून झरोक्यांपर्यंत भिंतीला तक्तपोशी केली होती व झरोकेही भरून काढले होते;


नंतर त्याने मला उत्तर द्वारास जाणार्‍या वाटेने मंदिरासमोर नेले; मी पाहिले तर परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते; तेव्हा मी उपडा पडलो.


मी प्रभूला वेदीजवळ उभे राहिलेले पाहिले; तो म्हणाला, “खांबांच्या माथ्यांवर प्रहार कर म्हणजे उंबरठे हलतील; त्यांचे तुकडे करून त्या सर्वांच्या डोक्यावर पाड; त्यांच्यातले शेष उरतील ते मी तलवारीने वधीन; त्यांतला कोणी पळून जाऊ पाहील, पण त्याला पळून जाता येणार नाही; त्यांतला कोणी निसटून जाऊ पाहील, पण तो निभावणार नाही.


तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले, ‘त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश’ दृष्टीस पडला आणि ‘विजा’ चमकल्या, ‘गर्जना’ व मेघांचे गडगडाट झाले, भूमिकंप झाला व ‘मोठ्या गारांची वृष्टीही’ झाली.


तेव्हा देवाचे ‘तेज’ व पराक्रम ह्यांपासून निघालेल्या ‘धुराने मंदिर भरून गेले;’ आणि त्या सात देवदूतांच्या ‘सात पीडा’ संपेपर्यंत ‘कोणालाही मंदिरात जाता आले नाही.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan