Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 6:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहा-सहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याच्याबाजूला सराफीम होते; प्रत्येकाला सहा पंख होते; दोहोंनी प्रत्येकजण आपला चेहरा झाकीत; आणि दोहोंनी आपले पाय झाकी; आणि दोहोंनी उडे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यांच्या वरच्या बाजूला सराफीम होते, प्रत्येकाला सहा पंख होते: दोन पंखांनी त्यांनी स्वतःचे मुख झाकले होते, दोन पंखांनी पाय झाकले होते आणि दोन पंखांनी ते उडत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 6:2
34 Iomraidhean Croise  

तेव्हा अब्राम उपडा पडला, आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला :


एलीयाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला. तेव्हा त्याला वाणी ऐकू आली ती अशी, “एलीया, तू येथे काय करीत आहेस?”


मीखाया म्हणाला, “तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक : परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.


करूबाचा एक पंख पाच हात व दुसरा पंख पाच हात होता. एका पंखाच्या टोकापासून दुसर्‍या पंखाच्या टोकापर्यंत दहा हात अंतर होते.


आतल्या गाभार्‍यात त्याने ते करूब ठेवले; करूबांचे पंख असे पसरले होते की एका करूबाचा एक पंख एका बाजूच्या भिंतीला व दुसर्‍या करूबाचा एक पंख दुसर्‍या बाजूच्या भिंतीला लागलेला होता; त्याचे दुसरे दोन पंख गाभार्‍याच्या मधोमध एकमेकांना लागलेले होते.


कोशाच्या जागेवर करूबांचे पंख पसरले होते; तो कोश व त्याचे दांडे ह्यांच्यावर त्यांचे आच्छादन होते;


तूच एक परमेश्वर आहेस; आकाश व अत्युच्च आकाश व त्यांतील सर्व नक्षत्रगण, पृथ्वी व तिच्यावर वसणारे सर्व, जलाशय त्यांत असलेले सर्वकाही ह्यांचा तू उत्पन्नकर्ता व पालनकर्ता आहेस; स्वर्गातील सेना तुला नमन करते.


एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले, व त्यांच्यामध्ये सैतानही आला.


पाहा, देव आपल्या पवित्र जनांचाही विश्वास धरीत नाही; आकाशही त्याच्या दृष्टीने निर्मळ नाही.


पाहा, तो तर आपल्या सेवकांचाही भरवसा धरत नाही; तो आपल्या दिव्यदूतांना प्रमाद केल्याचा दोष लावतो;


अहो परमेश्वराच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात, आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा.


वायूंना आपले दूत करतोस, अग्नी व ज्वाला ह्यांना आपले सेवक करतोस.


तो करूबारूढ होऊन उडाला, त्याने वायूच्या पंखांनी वेगाने उड्डाण केले.


पवित्र जनांच्या सभेत भीती बाळगण्यास योग्य असा देव तो आहे; त्याच्या सभोवतालच्या सर्वांपेक्षा तो भीतिप्रद आहे.


त्या करूबांचे पंख असे पसरलेले असावेत की त्यांनी ते दयासन झाकले जावे आणि त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी.


तो आणखी म्हणाला, “मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे.” तेव्हा मोशेने आपले तोंड झाकले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला.


त्या करूबांचे पंख असे पसरले होते की, त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनासमोर लागलेली होती.


मग एक सराफदूत वेदीवरील इंगळ चिमट्याने हाती घेऊन माझ्याकडे उडत आला.


वरच्या अंगी त्यांची मुखे व त्यांचे पंख विभक्त होते. प्रत्येकाचे दोन पंख जवळील दुसर्‍याच्या एकेका पंखाला लागले होते; आणि प्रत्येकाच्या दोन-दोन पंखांनी त्यांचे शरीर आच्छादले होते.


ते चालत असता मला त्यांच्या पंखांचा आवाज ऐकू आला; तो महाजलाशयांच्या आवाजासारखा, सर्वसमर्थाच्या वाणीसारखा होता; लष्कराच्या गजबजीप्रमाणे तो मोठा होता; ते उभे राहत तेव्हा आपले पंख खाली सोडत.


मी पाहिले तो उत्तरेकडून तुफानाचा वारा सुटला, तेव्हा एक विशाल मेघ येत असून त्यामध्ये लपेटलेला एक अग्निगोल होता; त्याभोवती प्रभा फाकली असून अग्नीच्या मध्यभागातून तृणमण्याच्यासारखे तेज झळकत होते.


त्या प्रत्येकाला चार मुखे होती, व प्रत्येकाला चार पंख होते.


त्यांचे पंख एकाचे दुसर्‍याशी लागलेले होते; ते चालताना वळत नसत, तर ते प्रत्येक पाहिजे त्या आपल्या मुखाच्या दिशेने नीट समोर जात.


करूब चालले म्हणजे चाके त्यांच्याबरोबर चालत आणि भूमीवरून उंच उडण्यासाठी ते आपले पंख उचलत तेव्हा ती चाके वेगळी होत नसत.


त्या प्रत्येकाला चार मुखे होती व प्रत्येकाला चार पंख होते; त्यांच्या पंखांखाली मनुष्याच्या हातासारखी आकृती होती.


त्याच्यासमोरून अग्निप्रवाह वाहत होता; हजारो लोक त्याची सेवा करीत होते; लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते; न्यायसभा भरली; वह्या उघडल्या गेल्या.


असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता जो पुरुष गब्रीएल, दृष्टान्ताच्या आरंभी मी अगदी व्याकूळ असता माझ्या दृष्टीस पडला होता, तो संध्याकाळच्या यज्ञसमयी माझ्यासमीप आला.


त्याच्यासमोर जे उभे होते त्यांना तो उत्तरादाखल म्हणाला, “त्याच्यावरची मलीन वस्त्रे काढा.” तो त्याला म्हणाला, “पाहा, मी तुझा अधर्म तुझ्यापासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालत आहे.”


धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता.


आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, “तो आपले देवदूत वायू, आणि आपले सेवक अग्निज्वाला असे करतो.”


नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला; त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणार्‍यांना म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यांना सांगण्यास सार्वकालिक सुवार्ता होती.


त्या चारही प्राण्यांना ‘प्रत्येकी सहा-सहा पंख असून ते प्राणी’ आतून ‘बाहेरून सर्वांगी, डोळ्यांनी भरलेले’ होते; आणि, “पवित्र, पवित्र, पवित्र, जो होता, ‘जो आहे’ व जो येणार तो ‘सर्वसमर्थ प्रभू देव,”’ असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत.


तेव्हा राजासन, वडीलमंडळ व चार प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते, ते राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले :


मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी उडताना दृष्टीस पडला; त्याला मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले : “जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्यांच्या होणार्‍या ध्वनीने पृथ्वीवर राहणार्‍या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan