Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 6:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मी म्हणालो, “हे प्रभू, असे कोठवर?” तो म्हणाला, “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तेव्हा मी म्हटले, “प्रभू, असे किती वेळपर्यंत?” त्याने उत्तर दिले, “नगरे चिरडून उध्वस्त आणि रहिवाशांविरहित होईपर्यंत, आणि घरे लोकविरहीत व जमीन उजाड वैराण होईपर्यंत,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 नंतर मी म्हणालो, “हे प्रभू, आणखी किती वेळ?” आणि त्यांनी उत्तर दिले: “शहरे जोपर्यंत उद्ध्वस्त होत नाहीत आणि तिथे कोणी लोक राहिले नाहीत, घरे ओसाड पडत नाहीत आणि शेतांची नासाडी होत नाही आणि ती उद्ध्वस्त होत नाहीत तोपर्यंत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 6:11
28 Iomraidhean Croise  

हे देवा, शत्रू कोठवर निंदा करणार? वैरी तुझ्या नावाची निर्भर्त्सना सदा करणार काय?


हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार? तू सर्वकाळ कोपायमान राहणार काय? तुझा रोष अग्नीसारखा भडकत राहणार काय?


हे परमेश्वरा, परत फीर; किती वेळ लावशील? तू आपल्या सेवकांवर करुणा कर.


हे परमेश्वरा, दुर्जन कोठवर ― दुर्जन कोठवर जयोत्सव करतील?


तुमचा देश ओसाड आहे; तुमची नगरे अग्नीने जळाली आहेत; तुमची शेते परके लोक तुमच्यादेखत खाऊन टाकत आहेत; परक्यांनी उद्ध्वस्त केल्याप्रमाणे ती ओसाड झाली आहेत.


पुरुष उत्कृष्ट सोन्याहून दुर्मीळ करीन; मानव ओफीराच्या शुद्ध सोन्याहून दुर्मीळ करीन.


तेव्हा तिच्या वेशी आकांत करतील, शोकाकुल होतील व ती एकटी1 होऊन भुईवर बसेल.


यरुशलेम कोसळली आहे, यहूदा पतन पावला आहे; कारण त्यांची जिव्हा व त्यांची कृत्ये परमेश्वराविरुद्ध असून ते त्याच्या तेजोमय नेत्रांना तुच्छ लेखतात.


कारण राजभुवन ओस होईल, गजबजलेले शहर सुने पडेल; टेकडी व टेहळणीचा बुरूज ही सदासर्वदा गुहा बनतील, तेथे रानगाढवांचे क्रीडास्थान व कळपांची चरण होईल.


अरण्य व रुक्ष भूमी ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.


सेनाधीश परमेश्वराने माझ्या कानात सांगितले : “बहुत मोठी व सुंदर घरे खरोखर ओसाड व लोकरहित होतील.


तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन.


तुझी पवित्र नगरे वने बनली आहेत; सीयोन रान बनली आहे; यरुशलेम ओसाड झाली आहे.


कारण यहूदाच्या राजघराण्याविषयी परमेश्वर म्हणतो : तू मला गिलाद, लबानोनाचे शिखर असे आहेस; मी तुला खातरीने ओसाड भूमीसारखे, निर्जन नगरासारखे करीन.


सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;


“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मी यरुशलेमेवर व यहूदाच्या सर्व नगरांवर जे अरिष्ट आणले ते सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिले आहे; पाहा, आज ती उजाड व निर्जन झाली आहेत;


बाबेलच्या राजाने त्यांना हमाथ देशातील रिब्ला येथे मार देऊन ठार केले. ह्या प्रकारे यहूदी लोकांना त्यांच्या देशातून कैद करून नेले.


तुमच्या सर्व वसतिस्थानांतील नगरे उद्ध्वस्त होतील व उच्च स्थाने उजाड होतील, अशाने तुमच्या वेद्या उद्ध्वस्त व उजाड होतील, तुमच्या मूर्ती भंगून नष्ट होतील, तुमच्या सूर्यमूर्ती तोडून टाकतील; अशी तुमच्या हातची कामे नाहीतशी करतील.


तेव्हा मी एका पवित्र पुरुषाला बोलताना ऐकले; दुसरा एक पवित्र पुरुष त्या बोलणार्‍यास म्हणाला, “हा नित्याचा यज्ञयाग, विध्वंसमूलक पातक, पवित्रस्थान व सैन्य ही पायांखाली तुडवणे, ह्या दृष्टान्तात पाहिलेल्या गोष्टी कोठवर चालणार?”


मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्रस्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही.


परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन; तुमचा देश उद्ध्वस्त होईल आणि तुमची नगरे ओसाड पडतील.


त्या दिवसांत लोक तुम्हांला उद्देशून बोलतील, विव्हळून शोक करतील व म्हणतील, “आमचा अगदी समूळ नाश झाला. त्याने माझ्या लोकांचा वाटा परक्यांच्या स्वाधीन केला आहे; तो माझ्यापासून कसा काढून घेतला आहे! आमचे क्षेत्र बंडखोरांना त्याने वाटून दिले आहे.”


तुझ्या देशातील नगरांचा विध्वंस करीन, तुझे सर्व दुर्ग पाडून टाकीन;


म्हणून मी तुला हाणून भारी जखम करतो, तुझ्या पातकांमुळे मी तुला उजाड करतो.


तथापि देश, आपल्या रहिवाशांमुळे, त्यांच्या कृत्यांच्या फळामुळे वैराण होईल.


तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही म्हणून आकाशातील तार्‍यांप्रमाणे तुम्ही अगणित झाला तरी थोडके उराल.


तुमचे भले करावे आणि तुमची संख्या वाढवावी ह्यात जसा परमेश्वराला आनंद होत असे तसाच आनंद तुमचा नाश व निःपात करण्यात त्याला होईल; आणि जी भूमी वतन करून घ्यायला तुम्ही जात आहात तेथून तुमचे उच्चाटन होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan