Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 59:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्यांची जाळी पांघरण्याच्या उपयोगी नाहीत, ह्या आपल्या विणकामाने त्यांना स्वत:स झाकता येत नाही; त्यांची कामे केवळ उपद्रवजनक होत; त्यांच्या हातून बलात्काराची कामे होतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्यांनी बनविलेल्या जाळ्याचा उपयोग कपड्यांसाठी होऊ शकत नाही आणि त्यांचे अंग ते आपल्या कृत्यांनी झाकू शकणार नाहीत. त्यांची कृत्ये ही पापाची कृत्ये आहेत, आणि त्यांच्या हातात हिंसेची कामे आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्यांनी विणलेले जाळे वस्त्र बनविण्याच्या उपयोगाचे नसते; त्यांनी जे बनविले त्याने ते स्वतःला पांघरू शकत नाहीत. त्यांच्या कृती दुष्टतेच्या कृती आहेत, हिंसात्मक कृती करणे हेच त्यांच्या हातात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 59:6
31 Iomraidhean Croise  

त्या काळी देवाच्या दृष्टीने पृथ्वी भ्रष्ट झाली होती; ती जाचजुलमांनी भरली होती.


माझ्या हातून काही अन्याय झाला नाही; माझी प्रार्थना शुद्ध भावाची आहे, तरी असे झाले.


त्यामध्ये अनर्थ माजला आहे; त्याच्या पेठेतून जुलूम व कपट ही निघून जात नाहीत;


नाही, तुम्ही मनात दुष्कर्मे योजता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसक कृत्ये पसरता1


परमेश्वर म्हणतो, “फितुरी मुले हायहाय करतील; ती मसलती करतात पण त्या माझ्या प्रेरणेने करीत नाहीत; ती करारमदार करतात पण माझ्या आत्म्याला अनुसरून करीत नाहीत; अशी ती पापाने पाप वाढवतात;


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


तुझी नीतिमत्ता मी उजेडात आणीन; तुझ्या कर्मांविषयी म्हणशील तर त्यांपासून तुला काहीएक लाभ होणार नाही.


पाहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता; तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा ह्यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही.


आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत; आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत; आमच्या अधर्माने आम्हांला वादळाप्रमाणे उडवून दिले आहे.


झर्‍यांतून जसे नित्य नवे पाणी येते तशी त्यात नित्य नवी दुष्टता घडते; त्याच्या ठायी बलात्कार व लुटालूट ह्यांचा गोंगाट ऐकू येतो; नित्य माझ्यासमोर रोग आणि जखमा आहेत.


लाचार व दुबळे ह्यांच्यावर जुलूम केला, कोणास लुटले, कर्जदाराचे गहाण त्याला परत केले नाही, मूर्तीकडे पाहिले, अमंगल कृत्य केले,


बलात्कार हा शासनदंड होऊन बसला आहे; त्या लोकांतला कोणीही, त्यांच्या समूहापैकी कोणीही, त्यांच्या धनातले काहीही उरणार नाही; त्यांची काही प्रतिष्ठा राहणार नाही.


बेडी तयार करा, कारण देश रक्तपाताच्या गुन्ह्यांनी भरला आहे, नगर बलात्काराने भरले आहे.


तेव्हा तो मला म्हणाला, “इस्राएल व यहूदा ह्यांच्या घराण्याचा अधर्म अत्यंत भारी आहे; देश रक्तपाताने भरला आहे; कारण ते म्हणतात, ‘परमेश्वराने देशाचा त्याग केला आहे, परमेश्वर पाहत नाही.’


परमेश्वराचे असे म्हणणे आहे की, “हे जे आपल्या महालात बलात्कार व विध्वंस ह्यांच्या योगे धनसंचय करतात त्यांना सरळ आचरण करण्याचे ठाऊक नाही.”


अहो तुम्ही विपत्तीच्या दिवसाचा विचार लांबणीवर टाकता आणि बलात्काराचे आसन जवळ आणता.


तरीपण अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले; जे युद्धप्रिय नसून सहजगत्या जवळून जातात, त्यांच्या वस्त्रांवरून घातलेला झगा तुम्ही हिसकावून घेता.


तेथील श्रीमंत दुष्टतेने भरले आहेत, तेथील रहिवासी खोटे बोलतात; त्यांची जीभ त्यांच्या मुखात साक्षात कपटरूप आहे;


त्या दिवशी जे उंबरठ्यावरून उडी मारून आपल्या प्रभूचा वाडा बलात्काराने व कपटाने भरून टाकतात त्या सर्वांचा समाचार मी घेईन.”


ती बंडखोर, भ्रष्ट व बलात्कारी नगरी, तिला धिक्कार असो!


परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मला सूटपत्राचा तिटकारा आहे; म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर2 क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो; तुम्ही आपल्या आत्म्याला जपा, विश्वासघाताने वागू नका.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan