यशायाह 59:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही, आणि सत्यास स्मरून खटला चालवणारा कोणी नाही; लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कोणीही न्यायीपणाने दावा सांगत नाही, आणि कोणीही सत्यात आपली बाजू मांडत नाही. ते पोकळ शब्दांवर विश्वास ठेवतात आणि खोटे बोलतात, ते दुष्टाईची गर्भधारणा करून अन्यायाला जन्म देतात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 कोणी न्यायाने वागत नाही; कोणीही सत्याने खटला लढत नाही. ते निरर्थक वाद घालतात आणि खोटे शब्द उच्चारतात; ते क्षुब्धतेची गर्भधारण करतात आणि दुष्टतेस जन्म देतात. Faic an caibideil |
नंतर इस्राएल लोक परततील आणि आपला देव परमेश्वर व आपला राजा दावीद ह्यांना शरण येतील; ते शेवटच्या दिवसांत भीतीने कंपित होऊन परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आश्रय करतील.” इस्राएलाशी परमेश्वराचा वाद 4 इस्राएल लोकहो, परमेश्वराचे वचन ऐका, कारण देशातून सत्य, दया, व देवज्ञान ही नाहीतशी झाल्यामुळे परमेश्वर ह्या देशाच्या रहिवाशांबरोबर वाद करीत आहे.