Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 59:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत; तुमच्या पातकांमुळे तो तुम्हांला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तर तुमच्या पापमय कृत्यांनी तुम्हास तुमच्या परमेश्वरापासून वेगळे केले आहे. आणि तुमच्या पापांनी त्यास आपले मुख लपवण्यास आणि तुमचे न ऐकण्यास भाग पाडले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 परंतु तुमच्या पातकांनी तुम्हाला तुमच्या परमेश्वरापासून दूर केले आहे; तुमच्या पापांनी त्यांचे मुख तुमच्यापासून लपविले आहे, जेणेकरून त्यांना ऐकू येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 59:2
14 Iomraidhean Croise  

परमेश्वर दुर्जनांपासून दूर राहतो, पण तो नीतिमानांची प्रार्थना ऐकतो.


तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.


परमेश्वर म्हणतो, “तुमच्या आईला मी सोडून दिल्याचे सूटपत्र कोठे आहे? ज्याला तुम्हांला विकले तो माझा सावकार कोणता? पाहा, तुमच्या दुष्कर्मामुळे तुमची विक्री झाली आहे; तुमच्या अपराधामुळे तुमच्या आईला सोडावे लागले.


त्याच्या स्वार्थमूलक अधर्मामुळे मी रागावून त्याला ताडन केले, मी विन्मुख झालो, मी त्याच्यावर कोपलो; पण तो आपल्या मनाच्या कलाप्रमाणे वागत गेला.


पाहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता; तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा ह्यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही.


तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरवली आहेत, तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे.


यरुशलेमेने घोर पातक केले आहे; म्हणून ती किळसवाणी झाली आहे; जे तिचा आदर करीत ते सर्व तिला तुच्छ मानत आहेत, कारण त्यांनी तिची नग्नता पाहिली आहे; ती उसासे टाकते, तिने पाठ फिरवली आहे.


मी आपले मुख ह्यापुढे त्यांच्यापासून लपवणार नाही; कारण मी आपल्या आत्म्याची इस्राएल घराण्यावर वृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


तेव्हा ते परमेश्वराला आरोळी मारतील तरी तो त्यांचे ऐकणार नाही; तो त्या वेळेस त्यांना पराङ्मुख होईल, कारण त्यांनी दुष्कृत्ये केली आहेत.


इस्राएलाने पाप केले आहे; मी त्यांच्याशी केलेला करार त्यांनी मोडला आहे; समर्पित वस्तूंपैकी काही त्यांनी घेतल्या आहेत; एवढेच नव्हे तर त्यांनी चोरी व लबाडीही केली आहे, आणि त्या वस्तू आपल्या सामानामध्ये ठेवल्या आहेत.


लोक छावणीत परत आले तेव्हा इस्राएलाचे वडील जन म्हणू लागले, “परमेश्वराने आज आमचा पलिष्ट्यांकडून पराभव का होऊ दिला? तर परमेश्वराच्या कराराचा कोश शिलोहून आपण आणू या; तो आपल्यामध्ये आला तर शत्रूच्या हातातून आपला बचाव होईल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan