Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 59:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 त्याने उरस्त्राणाप्रमाणे न्यायत्व धारण केले व आपल्या मस्तकी तारणरूप शिरस्त्राण घातले; सूडरूपी पेहराव तो ल्याला. आवेशरूप झग्याने आपले अंग त्याने झाकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 त्याने चांगुलपणाचे चिलखत घातले, तारणाचे शिरस्त्राण आपल्या डोक्यावर घातले, त्याने सूडाचे वस्र परिधान केले आणि जसा झग्याने तसा तो आवेशाने वेष्टिलेला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्यांनी नीतिमत्वास त्यांचे चिलखत म्हणून चढविले आणि त्यांच्या मस्तकावर तारणाचे शिरस्त्राण घातले; सूडरूपी वस्त्र परिधान केला आवेश हा अंगरखा म्हणून स्वतःला पांघरले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 59:17
24 Iomraidhean Croise  

नीतिमत्ता माझे पांघरूण होई आणि ती मला आच्छादून टाकी; माझी नीतिमत्ता हाच माझा झगा व शिरोभूषण होत असे.


कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, निंदा करणार्‍यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे.


हे पारिपत्य करणार्‍या देवा, परमेश्वरा, हे पारिपत्य करणार्‍या देवा, तू आपले तेज प्रकट कर.


नीतिमत्ता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


कारण यरुशलेमेतून अवशेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील; सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


परमेश्वर वीराप्रमाणे निघेल; रणधुरंधराप्रमाणे तो आपल्या आवेशाचे उद्दीपन करील; तो प्रचंड शब्द करील; तो रणशब्द करील; तो आपल्या शत्रूंना आपला प्रभाव दाखवील.


हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो; पूर्वकाळच्या दिवसांतल्याप्रमाणे, प्राचीन युगातल्याप्रमाणे जागृत हो. राहाबास छिन्नभिन्न करणारा तूच नव्हेस काय? मगरास विंधणारा तूच नव्हेस काय?


तू स्वर्गातून अवलोकन कर, आपल्या पवित्रतेच्या व प्रतापाच्या निवासस्थानातून पाहा; तुझी आस्था व तुझे पराक्रम कोठे आहेत? तुझ्या पोटातला कळवळा व तुझी करुणा माझ्या बाबतीत संकुचित झाली आहे.


तुझ्या पोशाखाला लाली कोठून? तुझी वस्त्रे द्राक्षकुंड तुडवणार्‍यांसारखी का?


“मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले; माझ्याबरोबर अन्य राष्ट्रांतला कोणी नव्हता; मी त्यांना आपल्या क्रोधाने तुडवले. मी त्यांना आपल्या संतापाने रगडले; त्यांचे रक्त माझ्या वस्त्रांवर उडाले; माझ्या सर्व वस्त्रांवर डाग पडले आहेत.


त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार; तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवील आणि तेथून पुढे ते सर्वकाळ न्यायाने व नीतिमत्तेने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


अशी माझ्या रागाची पूर्तता होईल आणि त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाची तृप्ती होऊन माझे समाधान होईल. मी त्यांच्यावरच्या माझ्या क्रोधाचा शेवट केला म्हणजे ते समजतील, की मी परमेश्वर हे आवेशाने बोललो आहे.


मग माझ्याबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, ‘असे जाहीर कर की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरुशलेम व सीयोन ह्यांविषयी मी अतिशय ईर्ष्यायुक्त झालो आहे.


तेव्हा ‘तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील,’ असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले.


सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने; आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी,


तर मग आपली कंबर सत्याने कसा; नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा;


तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाचे वचन, ही घ्या.


परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे.


तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मानत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.


कारण “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन; असे प्रभू म्हणतो.” आणखी, “परमेश्वर आपल्या लोकांचा न्याय करील,” असे ज्याने म्हटले तो आपल्याला माहीत आहे.


‘नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला’, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. ‘तो नीतीने न्यायनिवाडा करतो’ व लढतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan