Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 59:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 कोणीच कर्ता पुरुष नाही हे त्याला दिसून आले, कोणी मध्यस्थ नाही म्हणून तो विस्मित झाला; तेव्हा त्याच्याच बाहूने त्याला साहाय्य केले, त्याच्या न्याय्यत्वाने त्याला आधार दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्याने पाहिले की कोणी मनुष्य नाही, आणि कोणी मध्यस्थही नाही. तेव्हा त्याच्याच बाहूने त्याच्याकडे तारण आणले, आणि त्याच्याच न्यायीपणाने त्यास आधार दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 त्यांनी बघितले की कोणीही नाही, कोणीच मध्यस्थी करणारा नाही, हे पाहून ते अस्वस्थ झाले; म्हणून स्वतःच्या भुजेने त्यांनी त्यांच्याप्रीत्यर्थ तारण निर्माण केले, आणि स्वतःच्या नीतिमत्वाने त्यांना आधार दिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 59:16
19 Iomraidhean Croise  

तेव्हा तो म्हणाला, ह्यांचा नायनाट केला पाहिजे; पण त्याचा क्रोध शांत करावा, व त्याने त्यांचा नाश करू नये, म्हणून त्याचा निवडलेला मोशे त्याला आडवा आला.


माझ्यासाठी दुष्कर्म्यांविरुद्ध कोण उठेल? अनीती करणार्‍यांविरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील?


परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत; त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वत:साठी विजय साधला आहे.


हे परमेश्वरा, आमच्यावर कृपा कर; आम्ही तुझी आशा धरून आहोत; रोज सकाळी तू आमचा भुज हो, आणि संकटसमयी आमचा उद्धारक हो.


कलहाचा ध्वनी ऐकताच लोक पळून गेले; तू उभा राहताच राष्ट्रे पांगून गेली.


पाहा, प्रभू परमेश्वर पराक्रम्यासारखा येत आहे; त्याचा भुज त्याचे प्रभुत्व चालवील; पाहा, वेतन त्याच्याजवळ आहे, व प्रतिफळ त्याच्या हाती आहे.


मी पाहतो तर कोणी दिसेना; मी विचारतो तर त्यांच्यामध्ये उत्तर देईल असा एकही मंत्री नाही.


मी आलो तेव्हा कोणी नव्हता; मी हाक मारली तेव्हा जबाब द्यायला कोणी नव्हता, ते का? मुक्त करवत नाही इतका माझा हात तोकडा झाला आहे काय? माझ्या ठायी सोडवण्याचे सामर्थ्य नाही काय? पाहा, मी आपल्या धमकीने समुद्र कोरडा करतो, नद्यांचे रान करतो; पाणी नसल्यामुळे त्यातील मासे कुजून त्यांची घाण येते, ते पाण्यावाचून मरतात.


माझा न्याय समीप आला आहे, माझे उद्धारकार्य सुरू झाले आहे, माझे भुज राष्ट्रांचा न्याय करतील; द्वीपांना माझा ध्यास लागला आहे, त्यांचा भरवसा माझ्या बाहूंवर आहे.


हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो; पूर्वकाळच्या दिवसांतल्याप्रमाणे, प्राचीन युगातल्याप्रमाणे जागृत हो. राहाबास छिन्नभिन्न करणारा तूच नव्हेस काय? मगरास विंधणारा तूच नव्हेस काय?


परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.


आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?


परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की, “ह्यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूंना मी खातरीने खाऊ देणार नाही; तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षारस परके प्राशन करणार नाहीत;


तुझ्या धावा करणारा कोणी नाही; तुझा आश्रय करण्यासाठी कोणी स्वतःला जागृत करीत नाही; कारण तू आपले मुख आमच्यापासून लपवले आहेस; आमच्या अधर्माच्या योगानेच तू आम्हांला भस्म केले आहेस.


यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन.


मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील, कोणी माझ्यासमोर देशासाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय ह्याची मी वाट पाहिली, पण मला कोणी आढळला नाही.


त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्‍चर्य वाटले. मग तो शिक्षण देत गावोगाव फिरला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan