Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 59:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 न्यायाला मागे ढकलले आहे. नीतिमत्ता लांब उभी राहिली आहे; कारण चव्हाठ्यांवर सत्य अडखळून पडले आहे, तेथे सरळतेचा प्रवेश होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 न्यायास मागे ढकलण्यात आले आहे, आणि प्रामाणिकपणा फार दूर उभा आहे. सत्य सार्वजनिक चौकात पडले आहे, आणि सरळपण आत येऊ शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 म्हणून न्याय मागे सरला आहे, आणि नीतिमत्ता दूर उभी आहे; सत्य रस्त्यावर अडखळले आहे, प्रमाणिकपणा प्रवेश करू शकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 59:14
25 Iomraidhean Croise  

आणि दोन अधम माणसे त्याच्यासमोर बसवा; ‘त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला’ अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी; मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.”


ईजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणार्‍या वडील जनांनी व सरदारांनी केले.


दुष्कर्म योजणारे माझ्याजवळ आले आहेत; ते तुझ्या नियमशास्त्रापासून दूर आहेत.


शिवाय ह्या भूतलावर न्यायाचे स्थान पाहावे तर तेथे दुष्टता आहे; नीतीचे स्थान पाहावे तर तेथे दुराचार आहे.


साध्वी नगरी कशी असाध्वी झाली आहे? ती न्यायपूर्ण होती, तिच्यात नीतिमत्ता वसत असे, आता तिच्यात घातकी राहतात.


नीतिमत्तेपासून दूर असलेल्या अहो कठोर मनाच्या लोकांनो, माझे ऐका.


आणि जे लाच घेऊन दुष्कर्म करणार्‍यास निर्दोषी ठरवतात व नीतिमानाच्या निर्दोषीपणाची हानी करतात, त्यांना धिक्कार असो.


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


आम्ही सगळे अस्वलांसारखे गुरगुरतो, पारव्यांसारखे घुमत राहतो; आम्ही न्यायाची अपेक्षा करतो तर त्याचा पत्ता नाही; तारणाची आशा धरतो तर ते आमच्यापासून दूर राहते;


न्यायाला अनुसरून दावा करणारा कोणी नाही, आणि सत्यास स्मरून खटला चालवणारा कोणी नाही; लोक पोकळ गोष्टींवर भिस्त ठेवतात, कपटाने बोलतात; ते उपद्रवरूप गर्भ धारण करतात आणि अनर्थाला जन्म देतात.


म्हणून न्याय आमच्यापासून दूर राहतो, दोषमुक्तता आम्हांला प्राप्त होत नाही; आम्ही प्रकाशाची अपेक्षा करतो तर अंधकार; उजेडाची आशा करतो पण आम्ही काळोखात चालू लागतो.


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


त्यांना असे सांग, ‘आपला देव परमेश्वर ह्याचा शब्द ऐकत नाही व शिक्षेला मान्य होत नाही ते हेच राष्ट्र आहे; सत्य नष्ट झाले आहे, ते त्यांच्या मुखांतून नाहीसे झाले आहे.


लोकांच्या पातकास्तव ते सैन्य नित्याच्या यज्ञयागांसहित त्याच्या स्वाधीन करण्यात आले; त्याने सत्य मातीस मिळवले; त्याने आपला मनोरथ सिद्धीस नेला.


जेव्हा इस्राएलास मी बरे करू पाहतो तेव्हा एफ्राइमाचा अधर्म व शोमरोनाची दुष्टता दिसून येते; ते दगा करतात, चोर घरात शिरतो, बाहेर लुटारूंची टोळी लूट करते.


तुम्ही गरिबाला तुडवता व भेट म्हणून त्याच्यापासून धान्य उपटता, त्यामुळे जी चिर्‍यांची घरे तुम्ही बांधली आहेत त्यांत तुम्ही राहणार नाही; तुम्ही जे द्राक्षाचे रमणीय मळे लावले आहेत त्यांचा द्राक्षारस पिणार नाही.


न्यायाचा कडूदवणा करणारे व नीतिमत्ता धुळीस मिळवणारे लोकहो,


घोडे खडकावर धावतात काय? कोणी तेथे बैल नेऊन नांगरतात काय? तुम्ही तर न्यायाऐवजी विष व नीतिमत्तेच्या फळाऐवजी कडूदवणा केला आहे.


अशाने कायद्याचा अंमल ढिला पडतो, न्यायाचे काहीएक चालत नाही; दुष्ट नीतिमानास घेरून सोडतो म्हणून न्याय विपरीत होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan