Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 59:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 आम्ही आंधळ्यांसारखे भिंत चाचपतो, नेत्रहीनांप्रमाणे चाचपतो; संधिप्रकाशात अडखळावे तसे मध्यान्हसमयी अडखळतो, धष्टपुष्टांमध्ये आम्ही मृतवत आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आम्ही आंधळ्यांप्रमाणे भिंती चाचपतो, त्याप्रमाणे जे पाहू शकत नाहीत. रात्री अडखळून पडावे तसे आम्ही भर दूपारी पडतो; बलवानांमध्ये आम्ही मरण पावलेल्या मनुष्यांप्रमाणे आहोत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आंधळ्याप्रमाणे आम्ही भिंती लगत चाचपडत चालतो, दृष्टिहीनांप्रमाणे स्पर्शाद्वारे मार्ग चाचपडतो. मध्यान्हात आम्ही संधिप्रकाशात असल्याप्रमाणे अडखळतो; बलवानांमध्ये आम्ही मेलेल्यांसारखे असतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 59:10
16 Iomraidhean Croise  

काळोख त्यांना भर दिवसा गाठतो, भर दुपारी ते जसे काय रात्रीच्यासारखे चाचपडतात.


दुर्जनांचा मार्ग अंधकारासारखा आहे; त्यांना कशाची ठेच लागते हे त्यांना कळत नाही.


ह्यामुळे त्यांना परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल : नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील.


म्हणजे तो तुम्हांला पवित्रस्थान होईल; तथापि इस्राएलाच्या उभय घराण्यांत तो ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक आणि यरुशलेमेच्या रहिवाशांना पाश व सापळा असा होईल.


त्यांपैकी बहुत लोक ठेचा खातील, पडतील व आपटून छिन्नभिन्न होतील, पाशांत अडकून धरले जातील.”


परमेश्वर तुमचा देव अंधकार पाडील, अंधकारमय डोंगरांवर तुमचे पाय ठेचा खातील, तुम्ही उजेडाची अपेक्षा करीत असता उजेड पालटून तो मृत्युच्छाया व काळोख करील, त्यापूर्वी त्याला थोर माना.


जे मागेच मरून गेले त्यांच्याप्रमाणे मला तो अंधकारमय स्थळी बसवतो.


ते अंधाप्रमाणे रस्त्यांनी भटकतात; ते रक्ताने माखले आहेत, म्हणून लोकांना त्यांच्या वस्त्रांना स्पर्श करवत नाही.


त्यांचे हृदय गलित व्हावे, व त्यांचे पाय पराकाष्ठेचे लटपटावेत म्हणून मी त्यांच्या सर्व वेशींवर घात करणारी तलवार चालवली आहे; अहो! ती विजेप्रमाणे चमकावी असे तिला केले आहे, ती वधासाठी उपसली आहे.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “त्या दिवशी असे होईल की मी सूर्याचा दुपारी अस्त करीन, निरभ्र दिवशी पृथ्वीवर अंधार करीन.


ह्यामुळे तुमच्यावर रात्र गुदरून तुम्हांला दृष्टान्त होणार नाही; तुमच्यावर अंधार पडून तुम्हांला भविष्य सांगता येणार नाही; संदेष्ट्यांवर सूर्य मावळेल, त्यांचा दिवस काळोख होईल.


ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर प्रकाश आहे; तुम्हांला अंधकाराने गाठू नये म्हणून तुमच्याजवळ प्रकाश आहे तोपर्यंत चाला; कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कोठे जातो हे कळत नाही.


“त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये. म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व त्यांचे अंतःकरण कठीण केले आहे.”


आंधळा जसा चाचपडतो तसा तू भरदुपारी चाचपडत फिरशील; तुझे कोणतेही काम सफळ होणार नाही. तुझा एकसारखा छळ होईल व तुझी नागवणूक होईल; पण तुझा बचाव करणारा कोणी असणार नाही.


पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो; तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan