Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 58:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेल; तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेव्हा तू परमेश्वरास हाक मारशील आणि परमेश्वर उत्तर देईल. तू त्याची आरोळी करशील आणि तो म्हणेल, मी इथे आहे. जर तू आपल्या मधून जोखड, बोट दाखवने, दुष्टपणाचे भाषण काढून टाकशील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मग तुम्ही हाक माराल आणि याहवेह त्यास उत्तर देतील; तुम्ही मदतीसाठी धावा कराल व ते म्हणतील: हा मी येथे आहे. “जर तुम्ही पीडितांना जोखडातून मुक्त कराल, एखाद्याकडे बोट रोखून आरोप लादण्याचे आणि द्वेषयुक्त बोलणे थांबवाल,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 58:9
31 Iomraidhean Croise  

तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, “बाबा”; तेव्हा तो म्हणाला, “काय आहे? माझ्या बाळा, तू कोण?”


तू त्याची प्रार्थना केलीस म्हणजे तो तुझे ऐकेल; आणि तू आपले नवस फेडशील.


अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला; तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले.


ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात,


जे कोणी त्याचा धावा करतात, जे खर्‍या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.


परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मला आता कळून आले; तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्ये करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल.


म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;


डोळे मिचकावतो, पायांनी इशारा करतो, बोटांनी खुणावतो;


तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.


सीयोनेत, यरुशलेमेत, लोकांची वस्ती राहील; तू इतःपर कधी शोक करणार नाहीस; तुझ्या धाव्याच्या शब्दाबरोबर तो तुझ्यावर कृपा करीलच; तो ऐकताच तो तुला पावेल.


परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा;


कोणाची तुम्ही चेष्टा करता? कोणाला तोंड विचकता? कोणाला जीभ काढून दाखवता? तुम्ही अधर्माची संतती, लबाडीचे बीज नाही काय?


दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यात, जुवाच्या दोर्‍या सोडाव्यात, जाचलेल्यांना मुक्त करावे, सगळे जोखड मोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय?


पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही; ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.


नीतिनियमांचे उल्लंघन, परमेश्वराचा अव्हेर, आमच्या देवास अनुसरण्यास माघार घेणे, छलसूचक व असत्य भाषण करणे, लबाडी मनात योजून ती बोलून दाखवणे, ही ती आहेत.


त्यांनी हाक मारण्यापूर्वी मी उत्तर देईन, ते बोलत आहेत तोच मी त्यांचे ऐकेन, असे होईल.


मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास; तू म्हणालास भिऊ नकोस.


ह्याकरता प्रभू परमेश्वर म्हणतो, “तुम्ही पोकळ गोष्टी सांगता व खोटे दृष्टान्त पाहता; तर पाहा, मी तुमचा विरोध करीन असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


मी बोलत व प्रार्थना करीत असता, माझे पाप व माझे लोक इस्राएल ह्यांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर ह्याच्याकडे विनवणी करीत असता,


किंवा ज्या एखाद्या वस्तूच्या बाबतीत त्याने खोटी शपथ वाहिली असेल ती त्याने पुरी भरून द्यावी. ज्या वस्तूचा त्याने अपहार केला असेल तिची पुरी भरपाई आपल्या दोषार्पणाच्या दिवशी करून देऊन वर आणखी तिचा एक पंचमांश भाग त्याने द्यावा.


कारण तेराफीम3 व्यर्थ गोष्टी बोलल्या आहेत, दैवज्ञांनी खोटे दृष्टान्त पाहिले आहेत व फसवणारी स्वप्ने सांगितली आहेत; ते कोरडा धीर देतात; ह्यामुळे ते मेंढरांप्रमाणे भटकले आहेत. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांच्यावर जुलूम होत आहे.


तो तिसरा भाग मी अग्नीत टाकीन, रुपे गाळतात तसे मी त्यांना गाळीन, सोने शुद्ध करतात त्याप्रमाणे त्यांना शुद्ध करीन; ते माझे नाम घेतील तेव्हा मी त्यांचे ऐकेन; मी म्हणेन, ‘हे माझे लोक’ व ते म्हणतील, ‘परमेश्वर माझा देव.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan