Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 58:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तू असे करशील तेव्हा पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे तुझा प्रकाश उगवेल, आणि तुझे आरोग्य लवकर उजळेल. तुझा चांगुलपणा तुझ्यापुढे चालेल आणि परमेश्वराचे गौरव तुझा पाठीराखा होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मग तुमचा प्रकाश सूर्योदयाप्रमाणे उजाडेल, आणि तुमचे आरोग्य लगेच तुम्हाला प्राप्त होईल; तुमची धार्मिकता तुमच्यापुढे चालेल, आणि याहवेहचे गौरव तुमची पाठराखण करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 58:8
27 Iomraidhean Croise  

तुझे जीवित मध्यान्हसमयाहून तेजस्वी होईल; अंधकार असला तरी तो प्रभातेसारखा होईल.


सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठायी कृपा, दया व न्याय ही आहेत.


तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यान्हासारखे प्रकट करील.


त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल व त्याची पावले इतरांना मार्गदर्शक होतील.


नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.


तेव्हा देवाचा दूत इस्राएली सेनेच्या पुढे चालत असे तो निघून सेनेच्या मागे गेला आणि मेघस्तंभ त्यांच्या आघाडीहून निघून त्यांच्या पिछाडीस उभा राहिला.


दयाळू मनुष्य आपल्या जिवाचे हित करतो, पण निर्दय स्वत:वर संकट आणतो.


उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वत:ला ते पाजण्यात येईल.


परंतु नीतिमानांचा मार्ग मध्यान्हापर्यत उत्तरोत्तर वाढणार्‍या उदयप्रकाशासारखा आहे.


वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे नीतिमान राष्ट्र आत येईल.


ज्या दिवशी परमेश्वर आपल्या लोकांचे घाव बांधील, त्यांच्या प्रहाराच्या जखमा बर्‍या करील, त्या दिवशी चंद्रप्रकाश सूर्यप्रकाशासारखा आणि सूर्यप्रकाश सात दिवसांच्या प्रकाशाएवढा सातपट होईल.


“मी रोगी आहे” असे एकही रहिवासी म्हणणार नाही; तेथे राहणारे पातकाची क्षमा पावतात.


तुम्हांला घाईघाईने निघावे लागणार नाही, पळ काढावा लागणार नाही; कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे; इस्राएलाचा देव तुमचा पाठीराखा आहे.


मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन.


ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे.


पाहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे, निबिड काळोख राष्ट्रांना झाकत आहे; पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे.


सीयोनेची नीतिमत्ता उदयप्रभेप्रमाणे फाकेपर्यंत तिच्याकरिता मी मौन धरणार नाही, यरुशलेमेचे तारण पेटलेल्या मशालींप्रमाणे दिसेपर्यंत तिच्याकरिता मला चैन पडणार नाही.


मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’


तर पाहा, मी ह्या नगरास आरोग्याचे उपचार करीन, त्या लोकांना बरे करीन, आणि शांती व सत्य ह्यांचे वैपुल्य त्यांच्या ठायी प्रकट करीन.


मी त्यांना वाटेवर आणीन, त्यांच्यावर मोकळ्या मनाने प्रीती करीन, कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे.


पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे त्या तुमच्यावर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखांच्या ठायी आरोग्य असेल; तुम्ही गोठ्यातल्या वत्सांप्रमाणे बाहेर पडून बागडाल.


कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये व वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.’


‘कर्नेल्या, तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि देवासमोर तुझ्या दानधर्माचे स्मरण करण्यात आले आहे.


“‘देव पक्षपाती नाही’, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.


तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?” त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan