Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 58:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना तुमच्या घरात आसरा द्यावा, हे असे नाही काय? जेव्हा तू कोणी उघडा पाहतोस तर त्यास कपडे द्यावे, आणि आपणाला स्वतः:च्या नातेवाईकांपासून लपवून ठेवू नये.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 भुकेल्यांना तुमच्या अन्नात तुम्ही वाटेकरी करू नये काय व निराश्रितांना आश्रय द्यावा— जेव्हा तुम्ही निर्वस्त्राला बघाल, त्याला पांघरूण घाला, आणि आपल्या रक्त व मांसाच्या बाधवांना दूर लोटावे का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 58:7
38 Iomraidhean Croise  

तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलींशी विवाह केलेल्या1 आपल्या जावयांना म्हणाला, “उठा, ह्या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर ह्या नगराचा नाश करणार आहे;” परंतु त्याच्या जावयांना तो केवळ गंमत करत आहे असे भासले.


तो त्यांना म्हणाला, “पाहा, महाराज, आपल्या दासाच्या घरी येण्याची कृपा करा; आजची रात्र राहा, पाय धुवा व सकाळी उठून मार्गस्थ व्हा;” पण ते म्हणाले, “नाही, आम्ही रात्रभर रस्त्यातच मुक्काम करू;”


मग वर नावे सांगितलेल्या पुरुषांनी पाडाव केलेल्या लोकांतल्या उघड्यानागव्यांना लुटीतली वस्त्रे नेसवली, जोडे घालायला दिले, त्यांना खाऊपिऊ घातले, त्यांना तैलाभ्यंग केला आणि सर्व निर्बल लोकांना गाढवांवर बसवून खर्जूर नगर जे यरीहो तेथे त्यांच्या भाऊबंदांकडे पोहचते केले, आणि मग ते शोमरोनास परत गेले.


वस्तुतः आमची शरीरे आमच्या भाऊबंदांच्या शरीरां-सारखीच आहेत व आमची मुलेबाळे त्यांच्या मुलाबाळांसारखीच आहेत. पाहा, आम्ही आपले पुत्र व कन्या ह्यांना दास्य करण्यासाठी गुलामगिरीत ठेवले आहे; आमच्या काही कन्या दासी होऊन राहिल्या आहेत; त्यांना सोडवण्याची आमच्यात काही ताकद राहिली नाही, कारण आमची शेते व द्राक्षांचे मळे दुसर्‍यांच्या हाती गेले आहेत.”


थकल्याभागलेल्यांना तू पाणी दिले नाहीस, भुकेलेल्यांना अन्न घातले नाहीस.


त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे; त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल2


दयाळू मनुष्य आपल्या जिवाचे हित करतो, पण निर्दय स्वत:वर संकट आणतो.


ज्याची दृष्टी उदार त्याचे कल्याण होते, कारण तो आपल्या अन्नातून गरिबास देतो


ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्यांना सोडव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर.


तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यायला दे;


जो दरिद्र्यांना देतो त्याला काही उणे पडत नाही, पण जो त्यांच्याकडे डोळेझाक करतो त्याला शापांवर शाप मिळतात.


जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यांना देशील, दुःखग्रस्त जिवांना तृप्त करशील; तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल,


परमेश्वर म्हणतो : तुम्ही न्यायनिवाडा करा; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडवा; परका, पोरका व विधवा ह्यांच्यावर अन्याय करू नका; त्यांना उपद्रव देऊ नका; ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडू नका.


कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण अडकवून ठेवत नाही, कोणाला लुटत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववतो,


कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करतो, कोणाला लुटत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववतो,


म्हणून महाराज, माझी मसलत आपण मान्य करावी; आपण पाप सोडून न्यायनीतीचे आचरण करावे; अधर्म सोडून गरिबांवर दया करावी; अशाने कदाचित आपले स्वास्थ्य अधिक काळ राहील.”


तर जे आत आहे त्याचा2 दानधर्म करा म्हणजे पाहा, सर्व तुम्हांला शुद्ध आहे.


तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”


तो त्यांना उत्तर देई, “ज्याच्याजवळ दोन अंगरखे आहेत त्याने, ज्याला नाही त्याला एक द्यावा, आणि ज्याच्याजवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणेच करावे.”


मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हांला मान्य करावी लागली.


मग त्याने त्यांना घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या सर्व मंडळीने आनंदोत्सव केला.


पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.


आपल्या एखाद्या बांधवाचा बैल अथवा मेंढरू भटकत असलेले पाहून न पाहिल्यासारखे करू नकोस; ते अवश्य आपल्या बांधवाकडे पोचते कर.


जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागवली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कृत्यांस अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत नोंदण्यात यावी.


तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला व माझे सांत्वन झाले; कारण, हे बंधो, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जिवाला विश्रांती मिळाली आहे.


“शखेमाच्या सर्व प्रमुख नागरिकांना विचारा की, यरुब्बालाच्या सत्तर मुलांनी तुमच्यावर अधिकार गाजवावा की एकानेच गाजवावा ह्यांपैकी तुम्हांला कोणते इष्ट आहे? पण लक्षात ठेवा की, मी तुमच्या हाडामांसाचा आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan