Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 58:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मला पसंत पडणारा असा हा उपास आहे काय? मनुष्याच्या जिवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे काय? लव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोणपाट व राख पसरणे ह्याला उपास म्हणतोस काय? आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 या अशाप्रकारचा उपास मला हवा आहे काय, ज्यात मनुष्याच्या जीवास पीडा व्हावी? आपले डोके लव्हाळ्यासारखे खाली लववणे आणि आपल्या खाली गोणताट व राख पसरवणे, तू खरच याला उपास म्हणतोस, तो दिवस जो परमेश्वरास आनंदीत करेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 असा उपास मी निवडला आहे काय, लोकांनी नम्र होण्याचा एक दिवस? केवळ वार्‍याने लवणार्‍या लव्हाळ्याप्रमाणे वाकण्याकरिता, आणि गोणपाट नेसून राख फासण्याकरिता? यालाच तुम्ही उपास म्हणता का, याहवेहला असा दिवस मान्य असेल काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 58:5
22 Iomraidhean Croise  

त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्रे फाडली. त्या प्रसंगी तो नगराच्या तटावर फिरत होता आणि लोकांनी पाहिले तेव्हा त्याने आतून आपल्या अंगाला गोणपाट गुंडाळले आहे असे त्यांना दिसले.


यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले.


मग एज्रा देवाच्या मंदिरापुढून उठला आणि यहोहानान बिन एल्याशीब ह्याच्या कोठडीत गेला; तेथे तो गेला तेव्हा त्याने अन्नपाणी सेवन केले नाही, कारण बंदिवासातून आलेल्या लोकांच्या पातकास्तव तो शोक करीत राहिला.


मग मी अहवा नदीतीरी उपास करण्याचे जाहीर केले; त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे.


“जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरता उपास करा; तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले.”


राजाचा हुकूम व फर्मान ज्या ज्या प्रांतात जाऊन पोहचले तेथे तेथे यहूदी लोकांत मोठा विलाप, उपोषण व रडारड चालू झाली; बहुतेक लोक गोणपाट नेसून राखेत पडून राहिले.


ईयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली; आणि तो जाऊन राखेत बसला.


मी तर, हे परमेश्वरा, तुला मान्य होईल अशा समयी तुझी प्रार्थना करतो; हे देवा, तू आपल्या विपुल दयेस अनुसरून व आपण सिद्ध केलेल्या उद्धाराच्या सत्यास अनुसरून मला उत्तर दे.


परमेश्वर म्हणतो, “प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले; देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रीत्यर्थ तुला नेमतो.


‘आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जिवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस?’ “पाहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता.


परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा; सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे;


तुमच्यासाठी हा निरंतरचा विधी असावा : सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या दिवशी कसलेही काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो;


तुमच्यासाठी हा परमविश्रामाचा शब्बाथ होय; ह्या दिवशी तुम्ही आपल्या जिवांस दंडन करावे; हा निरंतरचा विधी होय.


“तू ह्या देशातील सर्व लोकांना व याजकांना विचार : तुम्ही सत्तर वर्षे पाचव्या व सातव्या महिन्यात उपोषण व रुदन केले तेव्हा खरोखर माझ्यासाठी उपोषण केले काय?


तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.


परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.”


देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan