Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 58:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पाहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता; तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा ह्यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पाहा! तुम्ही विवाद व भांडण यासाठी आणि तुमच्या दुष्टतेच्या हातांनी मारण्यासाठी तुम्ही उपास करता. तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकू जावा, म्हणून तुम्ही आजच्याप्रमाणे उपवास करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तुमचे उपास कलह व भांडणाने आणि एकमेकांशी दुष्टपणे मारामारी करण्याने संपतात. तुम्ही जसा उपास करता, तसा आता करून तुमचा आवाज उच्चस्थानी ऐकला जाईल अशी अपेक्षा करता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 58:4
16 Iomraidhean Croise  

दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?


तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्यापुढे डोळे झाकतो; तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही; तुमचे हात रक्ताने भरले आहेत.


परमेश्वर आपल्या लोकांचे वडील व सरदार ह्यांचा निवाडा करील : “तुम्हीच द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; दीनांची लूट तुमच्या घरात आहे.


तुम्ही माझ्या लोकांना चिरडता, दीनांचे तोंड ठेचता, हे काय?” असे प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचे म्हणणे आहे.


तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत; तुमच्या पातकांमुळे तो तुम्हांला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही.


त्यांची जाळी पांघरण्याच्या उपयोगी नाहीत, ह्या आपल्या विणकामाने त्यांना स्वत:स झाकता येत नाही; त्यांची कामे केवळ उपद्रवजनक होत; त्यांच्या हातून बलात्काराची कामे होतात.


“आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.”


त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की, “कोणा माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेरडामेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


ते विधवांची घरे गिळंकृत करतात आणि ढोंगाने लांबलचक प्रार्थना करतात; त्यांना अधिक शिक्षा होईल.”


नंतर त्यांनी येशूला कयफाकडून सरकारवाड्यात नेले, तेव्हा सकाळ होती आणि आपणांस विटाळ होऊ नये, वल्हांडणाचे भोजन करता यावे, म्हणून ते स्वतः सरकारवाड्यात गेले नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan