Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 58:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ‘आम्ही उपास करतो ते तू का पाहत नाहीस? आम्ही आपल्या जिवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस?’ “पाहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवता, तुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ते म्हणतात, “आम्ही का उपास केला, पण ते तू पाहिले नाहीस? आम्ही का आपणाला नम्र केले, तू त्याची दखल घेतली नाहीस?” पाहा! “उपासाच्या दिवशी तुम्ही तुमच्याच गोष्टींमध्ये आनंद पावता आणि तुमच्या सर्व कामकऱ्यांना छळता.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ते म्हणतात, ‘आम्ही उपास केला, पण तुम्ही बघितलेही नाही? आम्ही नम्र झालो, आणि तुम्ही त्याकडे लक्षही दिले नाही?’ “तरी तुमच्या उपासाच्या दिवशी, तुम्ही मनाला वाटेल तसे करता आणि तुमच्या कामगारांची पिळवणूक करता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 58:3
23 Iomraidhean Croise  

मग मी अहवा नदीतीरी उपास करण्याचे जाहीर केले; त्याचा हेतू असा की आम्ही देवासमोर दीन व्हावे आणि आमच्यासाठी, आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्या सर्व धनासाठी बिनधोक मार्ग प्राप्त व्हावा असे आम्ही आमच्या देवासमोर दीन होऊन मागावे.


मग मी आपल्या मनात विचार करून सरदार व शास्ते ह्यांच्याशी वाद करून म्हणालो की, “तुम्ही आपल्या बांधवांकडून वाढीदिढी घेता.” मग मी त्यांच्याविरुद्ध एक मोठी सभा भरवली.


तो म्हणतो ‘देवाशी सख्य ठेवून मनुष्याला काय लाभ होतो?’


मी उपास करून शोक केला, तेच माझ्या निंदेस कारण झाले.


नियमशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थनादेखील वीट आणणारी आहे.


त्या दिवशी तुम्ही रडावे, शोक करावा, केस तोडावे, गोणपाट नेसावे असे प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने सांगितले होते;


पण पाहावे तर आनंद व हर्ष, बैल मारणे व मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षारस पिणे चालले आहे; “उद्या मरायचे आहे म्हणून खाऊनपिऊन घेऊ या,” असे ते म्हणत आहेत.


मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.


तुमच्यासाठी हा निरंतरचा विधी असावा : सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे; त्या दिवशी कसलेही काम करू नये, मग तो स्वदेशीय असो किंवा तुमच्यामध्ये राहणारा परदेशीय असो;


तुमच्यासाठी हा परमविश्रामाचा शब्बाथ होय; ह्या दिवशी तुम्ही आपल्या जिवांस दंडन करावे; हा निरंतरचा विधी होय.


“त्याच सातव्या महिन्याच्या दशमीस प्रायश्‍चित्ताचा दिवस पाळावा; त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी तुम्ही आपल्या जिवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे.


तुम्ही म्हणालात, ‘देवाची सेवा करणे व्यर्थ आहे; त्याने आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोकवस्त्रे धारण करून चाललो ह्यांपासून लाभ काय?


देवाने बलामाला तेथे दर्शन दिले, तेव्हा बलाम त्याला म्हणाला, “मी सात वेद्या तयार केल्या आहेत आणि प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला आहे.”


परंतु त्याने बापाला उत्तर दिले, ‘पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करत आहे, आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही; तरी मला आपल्या मित्रांबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan