Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 57:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तू तेलाने माखून राजाकडे गेलीस, पुष्कळ सुगंधी द्रव्ये तू वाढवलीस, आपले जासूद दूरदूर पाठवलेस, अधोलोकापर्यंत तुझ्या नीचतेचा पल्ला गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तेल घेऊन तू राजा समोर गेलीस; आणि आपली सुगंधी द्रव्ये पुष्कळ केलीस. तुझे दूत तू अति दूर पाठवले, आणि तू अधोलोकात गेलीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 मोलखाला तू जैतुनाचे तेल वाहिले व तुझी सुगंधी अत्तरे वाढवून अर्पण केलीस. तू तुझ्या दूतांना दूरवर पाठविले; अगदी प्रत्यक्ष मृतलोकांच्या राज्यापर्यंत गेलीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 57:9
12 Iomraidhean Croise  

मी आपली गादी बोळ, अगरू व दालचिनी, ह्यांनी सुवासिक केली आहे.


हलका मनुष्य लवला आहे, थोर मनुष्य नीचावस्था पावला आहे; त्यांना तू क्षमा करूच नकोस.


लोक वेश्येस वेतन देतात; पण तू उलट आपल्या सर्व जारांना वेतन देतेस, त्यांनी चोहोकडून येऊन तुझ्याबरोबर शिंदळकी करावी म्हणून तू त्यांना लालूच दाखवतेस.


तिची नजर त्यांच्यावर गेली तेव्हा ती त्यांच्यावर आसक्त झाली व तिने त्यांना बोलावून आणण्यास खास्दी देशात जासूद पाठवले.


तसेच तुम्ही दूरदूरच्या पुरुषांना बोलावणे पाठवले; त्यांच्याकडे जासूद पाठवला आणि पाहा, ते आले; त्यांच्यासाठी तू स्नान केले, डोळ्यांत काजळ घातले व दागिन्यांनी आपणास सजवले;


तो राजा मनास येईल तसे वर्तेल; तो उन्मत्त होईल; सर्व दैवतांहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल; कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील; जे नेमले आहे ते घडेलच.


एफ्राईम वायूची जोपासना करतो, पूर्वेच्या वार्‍याच्या मागे लागतो; दिवसभर तो लबाडी व नाश ह्यांची वृद्धी करतो; ते अश्शूराबरोबर करार करतात, मिसर देशात तेल नेतात.


एफ्राईम एखाद्या खुळ्या निर्बुद्ध पारव्यासारखा आहे; ते मिसराला हाक मारतात; अश्शूराकडे धाव घेतात.


लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने देवदूतांची उपासना करणार्‍या, स्वत:ला न दिसलेल्या गोष्टींवर अवलंबून राहणार्‍या व दैहिक बुद्धीने उगीचच गर्वाने फुगणार्‍या कोणा माणसाला तुम्हांला फसवून तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan