Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 57:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मोठ्या उंच पर्वतावर तू आपली खाट घातलीस, तेथेच यज्ञ करण्यास तू वर चढून गेलीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तू तुझे अंथरूण उंच पर्वतावर तयार केले आहे, तेथेच तू यज्ञ अर्पण करायला वर गेलीस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 डोंगरमाथ्यांवर व अत्यंत उच्चस्थानी तू आपला बिछाना बनविला आहेस; तिथे वर जाऊन तू तुझी अर्पणे वाहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 57:7
12 Iomraidhean Croise  

अहो चेटकिणीच्या मुलांनो, जाराच्या व जारिणीच्या वंशजांनो, तुम्ही इकडे जवळ या.


तुमच्या दुष्कर्मांचे आणि तुमच्या वाडवडिलांनी पर्वतावर धूप जाळला व टेकड्यांवर माझा अपमान केला त्या दुष्कर्मांचे फळ मी त्यांना देईन,” असे परमेश्वर म्हणतो; “मी आधी त्यांच्या कर्मांचे फळ त्यांच्या पदरी मोजून घालीन.”


कारण प्राचीन काळी तू आपले जू मोडले, आपली बंधने तोडली आणि तू म्हणालीस, ‘मी सेवा करणार नाही.’ आणि तू कसबिणीसारखी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली ओणवी झालीस.


डोळे वर करून उजाड टेकड्यांकडे पाहा; जेथे तुझ्याजवळ कोणी निजला नाही असे कोणते ठिकाण उरले आहे? रानात अरब दबा धरतो तशी तू त्यांच्या वाटा धरून बसलीस; तू आपल्या शिंदळकीने व दुष्टतेने देश भ्रष्ट केला आहेस.


ह्याशिवाय योशीया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वर मला म्हणाला, “मला सोडून जाणारी इस्राएल हिने काय केले हे तू पाहिले आहेस काय? प्रत्येक उंच पर्वतावर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तेथे तिने व्यभिचार केला.


तू आपली वस्त्रे घेऊन रंगीबेरंगी उच्च स्थाने आपणांसाठी सजवलीस आणि कधी झाली नाही व पुन्हा कधी व्हायची नाही अशी शिंदळकी त्यांवर केलीस.


तू आपणासाठी कमानदार घर बांधलेस, रस्त्यारस्त्यांवर तू आपणासाठी उंच स्थाने केलीस.


तू रस्त्यांच्या नाक्यानाक्यांवर आपली उंच स्थाने बांधलीस, आपले सौंदर्य भ्रष्ट केलेस, आल्यागेल्या सर्वांपुढे आपले पाय पसरून मनस्वी शिंदळकी केलीस.


तेव्हा बाबेलचे पुरुष तिच्या शृंगारलेल्या पलंगावर तिच्याजवळ गेले; त्यांनी तिच्याबरोबर व्यभिचार करून तिला भ्रष्ट केले; त्यांच्या समागमाने ती भ्रष्ट झाली, तेव्हा तिने आपले मन त्यांच्यावरून काढले.


तू उत्कृष्ट मंचकावर बसलीस, त्यापुढे मेज मांडून त्यावर माझा धूप व तेल ठेवले.


प्रत्येक उंच टेकडीवर, सर्व डोंगरांच्या माथ्यांवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली, प्रत्येक दाट पालवीच्या एला झाडाखाली ज्या ज्या स्थळी त्यांनी आपल्या सर्व मूर्तींपुढे सुवासिक धूप अर्पण केला, तेथल्या त्यांच्या मूर्तींच्या मध्ये त्यांच्या वेद्यांभोवती त्यांचे वध पावलेले पडतील, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan