Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 57:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 प्रत्येक हिरव्या झाडाखाली, एला झाडांमध्ये तुम्ही मदोन्मत्त होता, ओढ्यांतल्या खडकांच्या कपारीत मुलांना ठार मारता तेच ना तुम्ही?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तुम्ही प्रत्येक झाडा खाली, एला झाडांमध्ये मदोन्मत्त होता, तुम्ही जे सुकलेल्या नदीखोऱ्यांमध्ये, खडकांच्या कड्यांखाली मुले ठार मारता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत तुम्ही कामांध होता; खोल दर्‍यात, खडकांच्या कड्याखाली नरबळी म्हणून आपल्या लेकरांचे बळी देता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 57:5
32 Iomraidhean Croise  

त्यांनी प्रत्येक उंच टेकडीवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली उच्च स्थाने, स्तंभ आणि अशेरा मूर्ती स्थापल्या.


त्यांनी सर्व उंच पहाडांवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तिस्तंभ व अशेरामूर्ती स्थापन केल्या;


ह्याचे कारण असे की इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याने त्यांना मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या हातातून सोडवून मिसर देशातून बाहेर आणले होते तरी त्याच्याविरुद्ध त्यांनी पाप केले व अन्य देवांची पूजा केली,


नंतर, कोणी आपला पुत्र अथवा कन्या ह्यांचा अग्नीत होम करून त्याला मोलखास अर्पू नये म्हणून हिन्नोमपुत्रांच्या खोर्‍यातील तोफेत त्याने भ्रष्ट करून टाकले.


त्याने हिम्मोनपुत्राच्या खोर्‍यात धूप जाळला आणि ज्या राष्ट्रांना परमेश्वराने इस्राएल लोकांपुढून घालवून दिले होते त्यांच्या अमंगळ कृतींना अनुसरून त्याने आपल्या मुलांचा अग्नीत होम करून ती अर्पण केली.


म्हणून दुसर्‍या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पणे अर्पण केली, शांत्यर्पणे आणली; ते खायलाप्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले.


तुमच्या आवडीची जी एलाची झाडे त्यांविषयी ते लज्जित होतील, आणि ज्या बागांवर तुमचे मन बसले होते त्यासंबंधाने तुमच्या तोंडाला काळिमा लागेल.


कारण त्याची संतती उंच टेकड्यांवरील हिरव्या झाडांच्या वेद्या व अशेरामूर्ती ह्यांचे स्मरण ठेवते.


कारण प्राचीन काळी तू आपले जू मोडले, आपली बंधने तोडली आणि तू म्हणालीस, ‘मी सेवा करणार नाही.’ आणि तू कसबिणीसारखी प्रत्येक उंच टेकडीवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली ओणवी झालीस.


तू आपला देव परमेश्वर ह्याच्यापासून पतन पावून इकडे तिकडे प्रत्येक हिरव्या झाडाखालून परक्याबरोबर भटकलीस व माझा शब्द ऐकला नाहीस, हा आपला दोष मात्र पदरी घे, असे परमेश्वर म्हणतो.


ह्याशिवाय योशीया राजाच्या कारकिर्दीत परमेश्वर मला म्हणाला, “मला सोडून जाणारी इस्राएल हिने काय केले हे तू पाहिले आहेस काय? प्रत्येक उंच पर्वतावर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली जाऊन तेथे तिने व्यभिचार केला.


यहूदाला पापास प्रवृत्त करण्यासाठी मोलखाच्या मूर्तीला आपले पुत्र व कन्या होम करून अर्पाव्यात म्हणून बेन-हिन्नोमाच्या खोर्‍यात त्यांनी बालमूर्तीची उच्च स्थाने बांधली; हे मी त्यांना आज्ञापिले नव्हते; ते असले घोर कृत्य करतील हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते.


त्याच्या जलप्रवाहांना झळ लागेल व ते सुकून जातील; कारण तो देश कोरीव मूर्तींचा आहे, त्यातील लोकांना मूर्तींचे वेड लागले आहे.


बाबेल परमेश्वराच्या हातातला सर्व पृथ्वीस मस्त करणारा सोनेरी पेला होता; राष्ट्रे त्याचा द्राक्षारस प्याली म्हणून ती वेडी झाली आहेत.


आपल्या पुत्रांचा व आपल्या कन्यांचा अग्नीत होम करण्यासाठी बेन-हिन्नोमाच्या खोर्‍यातील तोफेतात त्यांनी उच्च स्थाने बांधली आहेत; मी त्यांना अशी आज्ञा केली नव्हती; ती माझ्या मनातही आली नव्हती.


आणखी माझ्यापासून तुला पुत्र व कन्या ही झालीं, ती तू घेऊन त्यांना खाऊन टाकण्यासाठी बळी म्हणून अर्पण केलीस. ह्या तुझ्या शिंदळक्या तुला पुरेशा झाल्या नाहीत;


मी त्यांची नासधूस केल्याने त्यांना असे समजावे की मी परमेश्वर आहे; मी त्यांना त्यांच्या यज्ञार्पणासंबंधाने असे भ्रष्ट केले की त्यांनी गर्भाशयातून प्रथम निघालेल्यांचा अग्नीत होम केला.


मी आपला हात उचलून शपथ करून दिलेल्या देशात त्यांना आणले तेव्हा त्यांनी प्रत्येक उंच टेकडी व प्रत्येक दाट छायेचा वृक्ष पाहून तेथे आपले यज्ञबली अर्पण केले; तेथे संतापवण्याजोगी अर्पणे त्यांनी केली; तेथे त्यांनी सुवासिक धूप जाळला व तेथेच त्यांनी आपली पेयार्पणेही वाहिली.


आणि आपली अर्पणे वाहून व आपल्या पुत्रांचा अग्नीत होम करून आपल्या सर्व मूर्तींच्या योगे आजवर आपणांस विटाळवत आहात; असे असता मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देईन काय? प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, मी तुम्हांला मला प्रश्‍न विचारू देणार नाहीच.


प्रत्येक उंच टेकडीवर, सर्व डोंगरांच्या माथ्यांवर, प्रत्येक हिरव्या झाडाखाली, प्रत्येक दाट पालवीच्या एला झाडाखाली ज्या ज्या स्थळी त्यांनी आपल्या सर्व मूर्तींपुढे सुवासिक धूप अर्पण केला, तेथल्या त्यांच्या मूर्तींच्या मध्ये त्यांच्या वेद्यांभोवती त्यांचे वध पावलेले पडतील, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


आपल्या संतानापैकी कोणाचाही मोलख दैवतासाठी होम करू नकोस, ह्या प्रकारे तुझ्या देवाच्या नावाला कलंक लावू नकोस, मी परमेश्वर आहे.


त्या वेळेस मोशेसमोर व दर्शनमंडपाच्या दाराशी इस्राएलची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्राएली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्यासमक्ष आपल्या भाऊबंदांकडे आणली.


जी राष्ट्रे तुम्ही ताब्यात घ्याल, त्यांतले लोक ज्या ज्या ठिकाणी, उंच डोंगरांवर, टेकड्यांवर आणि हरतर्‍हेच्या हिरव्या वृक्षांखाली आपापल्या देवांची सेवा करीत असतील त्या सर्व ठिकाणांचा अवश्य विध्वंस करा;


कारण, ‘तिच्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रे प्याली आहेत; पृथ्वीवरील राजांनी तिच्याबरोबर जारकर्म’ केले व पृथ्वीवरील व्यापारी तिने आपल्या विषयभोगास खर्चलेल्या द्रव्यबळाने धनवान झाले.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan