Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 57:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तो शांती पावतो; सरळ मार्गाने चालणारा प्रत्येक जण आपल्या बिछान्यावर शांत पडतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तो शांतीत प्रवेश करतो, जो प्रत्येक आपल्या सरळतेने चालतो, तो आपल्या पलंगावर विसावा घेतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जे नीतिमार्गाने चालतात ते शांती पावतात; त्यांच्या मरणोत्तर त्यांना विसावा प्राप्त होतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 57:2
19 Iomraidhean Croise  

अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा.


दावीदपुरात जे थडगे त्याने खोदवले होते त्यात त्याला मूठमाती दिली आणि सुवासिक द्रव्ये आणि गांध्यांनी केलेले तर्‍हेतर्‍हेचे मसाले ह्यांनी भरलेल्या बिछान्यावर त्याला त्यांनी निजवले व त्याच्याप्रीत्यर्थ त्यांनी बहुत सुवासिक द्रव्ये जाळली.


तेथे दुर्जन त्रास देण्याचे थांबवतात, श्रांत विश्रांती पावतात.


सात्त्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतिप्रिय मनुष्याचा वंश टिकून राहील.


तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल.


राष्ट्रांचे राजे सगळे आपापल्या घरी गौरवाने निद्रिस्त आहेत;


नीतिमानाचा मार्ग नीट आहे; तू न्यायपरायण असून नीतिमानाची गती सरळ करतोस.


परमेश्वर म्हणतो, “चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांती मिळेल;” पण ते म्हणाले, ‘आम्ही चालणार नाही.’


त्यांनी तिच्यासाठी व तिच्या सर्व समुदायासाठी वधलेल्यांमध्ये शय्या तयार केली आहे; तिच्यासभोवती त्यांच्या कबरा आहेत; ते सर्व बेसुंती इसम तलवारीने ठार झालेले आहेत; त्यांनी जिवंतांची भूमी दहशतीने भरली म्हणून गर्तेत उतरणार्‍यांबरोबर ते अप्रतिष्ठा पावले आहेत; वधलेल्यांमध्ये त्यांना ठेवले आहे.


तथापि अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा; म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील.


त्याला त्याच्या धन्याने म्हटले, ‘शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन; तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.’


ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती.


पुढे असे झाले की, तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले; श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली.


“हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस;


मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, “तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा.”


कारण आम्हांला ठाऊक आहे की, आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडून टाकण्यात आले, तर देवाने आमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे; ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे.


आम्ही धैर्य धरतो, आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणे हे आम्हांला अधिक बरे वाटते.


मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे.


तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “लिही : प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत.” आत्मा म्हणतो, “खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल; त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan