Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 57:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत, त्यांना शांती असो, शांती असो; मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 आणि मी त्यांच्या मुखातून आभारवचने उच्चारवीन, जो दूर आहे त्याला, आणि जो जवळ आहे त्यास शांती, असो, असे परमेश्वर म्हणतो, आणि मी त्यास निरोगी करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 त्यांच्या ओठांवर प्रशंसा निर्माण करेन. शांती, शांती, दूरच्या व जवळच्या सर्वांना शांतीचा लाभ होवो, आणि मी त्या सर्वांना बरे करेन.” असे याहवेह म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 57:19
27 Iomraidhean Croise  

हे परमेश्वरा, आमच्यासाठी तू शांतता स्थापीत करशील; कारण तू आमच्यासाठी आमची सर्व कार्ये साधली आहेत.


ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो.


नीतिमत्तेचा परिणाम शांती व तिचे फल सर्वकाळचे स्वास्थ्य व निर्भयता होईल.


शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला सुशिक्षितांची जिव्हा दिली आहे; तो रोज रोज सकाळी मला जागे करतो; शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो.


मी आकाशाची स्थापना करावी, पृथ्वीचा पाया घालावा व ‘तू माझी प्रजा आहेस’ असे सीयोनेस म्हणावे म्हणून मी आपली वचने तुझ्या मुखात घातली; आपल्या हाताची छाया मी तुझ्यावर केली.”


परमेश्वर म्हणतो, “माझा तर त्यांच्याशी हाच करार : तुझ्यावर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने तुझ्या मुखातून, तुझ्या संतानांच्या मुखांतून व तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखांतून आतापासून पुढे सर्वकाळ निघून जाणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.”


तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, “पाहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्‍चित्त झाले आहे.”


मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’


तर पाहा, मी ह्या नगरास आरोग्याचे उपचार करीन, त्या लोकांना बरे करीन, आणि शांती व सत्य ह्यांचे वैपुल्य त्यांच्या ठायी प्रकट करीन.


तुम्ही शब्दांनिशी परमेश्वराकडे वळा; त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर; कृपेने आमचा स्वीकार कर, म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू.


मी इस्राएलास दहिवरासारखा होईन; तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील.


तेव्हा मी राष्ट्रांना शुद्ध वाणी देईन, व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने1 करतील.


एफ्राइमातले रथ, यरुशलेमेतले घोडे मी नष्ट करीन; युद्धधनुष्य तोडून टाकण्यात येईल, तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल; त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून ते पृथ्वीच्या दिगंतापर्यंत चालेल.


ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो; ते योग्य नसले तर तुमची शांती तुमच्याकडे परत येवो.


मग त्याने त्यांना सांगितले की, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.


“ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.”


कारण मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.


येशू ख्रिस्त (तोच सर्वांचा प्रभू आहे) ह्याच्या द्वारे देवाने ‘शांतीच्या सुवार्तेची घोषणा करताना आपले जे वचन इस्राएलाच्या’ संततीस पाठवले ते हे.


कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व ‘जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर’ आपला देव ‘स्वतःकडे बोलावील तितक्यांना’ दिले आहे.”


परंतु जे तुम्ही पूर्वी ‘दूर’ होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठायी ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे ‘जवळचे’ झाला आहात.


माझ्यासाठीही विनवणी करा की, ज्या सुवार्तेपायी बेड्या पडलेला मी वकील आहे तिचे रहस्य उघडपणे कळवण्या-साठी मी तोंड उघडीन तेव्हा मला शब्द सुचावेत, ह्यासाठी की, जसे बोलायला हवे, तसे मला उघडपणे बोलता यावे.


म्हणून त्याचे नाव पत्करणार्‍या ‘ओठांचे फळ’ असा ‘स्तुतीचा यज्ञ’ आपण त्याच्या द्वारे ‘देवाला नित्य अर्पण करावा.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan