Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 57:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तू धावा करशील तेव्हा तुझ्या मूर्तींच्या समुदायाने तुला सोडवावे; त्या सगळ्यांना तर वारा उडवून नेईल, एक फुंकर त्यांना घेऊन जाईल; पण जो माझा आश्रय करील तो पृथ्वीचे वतन पावेल आणि माझ्या पवित्र पर्वताचा ताबा घेईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जेव्हा तू रडशील, तेव्हा तुझ्या मूर्तींचा समुदाय तुला सोडवो. त्याऐवजी वारा त्यांना घेऊन जाईल, श्वास त्या सर्वांना उडवून नेईल. पण जो माझ्याठायी आश्रय घेतो तो भूमीचा ताबा घेईल, आणि माझा पवित्र डोंगर वतन करून घेईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 जेव्हा तू मदतीसाठी धावा करशील, तुझ्या संग्रहातील मूर्तींना तुझा बचाव करू दे! वारा त्या सर्वांना उडवून नेईल, श्वासाच्या एका फुंकराने त्या उडून जातील. परंतु जो कोणी माझा आधार घेतो तो या भूमीचा ताबा घेईल व माझ्या पवित्र पर्वताचा स्वामी होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 57:13
39 Iomraidhean Croise  

अलीशा इस्राएलाच्या राजाला म्हणाला, “मला तुझ्याशी काय कर्तव्य आहे? तू आपल्या बापाच्या, आपल्या आईच्या संदेष्ट्यांकडे जा.” इस्राएलाचा राजा त्याला म्हणाला, “नाही, नाही; ह्या तीन राजांना मवाबाच्या हाती द्यावे म्हणून परमेश्वराने त्यांना एकत्र केले आहे.”


वार्‍याने जसे धसकट उडते, तुफानाने जसे भूस उडते, तसे ते नष्ट झाले, असे कितीदा घडते?


दुर्जन तसे नाहीत, ते वार्‍याने उडून जाणार्‍या भुसासारखे आहेत.


मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे.


ज्यांचा भाव परमेश्वरावर आहे ते निश्‍चल व सर्वकाळ टिकणार्‍या सीयोन डोंगरासारखे आहेत.


पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.


ज्यांना त्याचा आशीर्वाद प्राप्त होतो ते पृथ्वीचे वतन पावतील; ज्यांना त्याचा शाप लागेल त्यांचा उच्छेद होईल.


नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करतील.


परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग; देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल;


परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल; दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील.


दुष्कर्म करणार्‍यांचा उच्छेद होईल; पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील.


तुमच्या पातेल्यांना कांटेर्‍या जळणाची आच लागण्यापूर्वीच त्यातले कच्चे असो, शिजलेले असो, ते तो वावटळीने उडवून देईल.


हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य!


लोभी मनुष्य तंटा उपस्थित करतो; पण परमेश्वरावर भाव ठेवणारा धष्टपुष्ट होतो.


माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.


राष्ट्राच्या जासुदांना काय उत्तर द्यावे? “परमेश्वराने सीयोन स्थापली आहे; त्याच्या लोकांपैकी दीनदुर्बळ तिच्यात आश्रय करून आहेत.”


कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणार्‍या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली, असा झालास.


त्यांना लावले न लावले, पेरले न पेरले, त्यांचे मूळ भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यांच्यावर फुंकर मात्र घालतो म्हणजे ते सुकून जातात, वादळ त्यांना भुसाप्रमाणे उडवून नेते.


तू त्यांना उफणशील, वारा त्यांना उडवून टाकील, वावटळ त्यांना उधळून देईल; आणि तू परमेश्वराच्या ठायी उल्लास पावशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा अभिमान धरशील.


“राष्ट्रांतून निभावलेल्यांनो, जमा होऊन या, सर्व मिळून जवळ या; जे असल्या कोरीव मूर्ती म्हणजे केवळ लाकडे मिरवतात व उद्धार न करणार्‍या दैवतांची प्रार्थना करतात ते ज्ञानशून्य आहेत.


परमेश्वर म्हणतो, “प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले; देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुन्हा वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रीत्यर्थ तुला नेमतो.


त्यांना मी आपल्या पवित्र पर्वतावर आणीन आणि माझ्या प्रार्थनामंदिरात त्यांना हर्षित करीन; माझ्या वेदीवर केलेले त्यांचे होम व यज्ञ मला पसंत होतील; कारण माझे मंदिर हे सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनामंदिर आहे असे म्हणतील.


तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील,


पण तुम्ही परमेश्वराला सोडले; जे तुम्ही माझ्या पवित्र पर्वताची पर्वा करत नाही, गादासाठी (भाग्यदेवतेसाठी) मेजवानी तयार करता, मनीसाठी (कर्मदेवतेसाठी) मिश्रित पेयांचे प्याले भरून ठेवता,


तेव्हा लांडगा व कोकरू एकत्र चरतील, सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल; सर्पाचे खाणे धूळ होईल. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत. नासधूस करणार नाहीत,” असे परमेश्वर म्हणतो.


मी याकोबातून संतान, यहूदातून माझ्या पर्वतांचा वारस उत्पन्न करीन; माझे निवडलेले त्याचे वतन पावतील, माझे सेवक तेथे वस्ती करतील.


परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिरात जसे इस्राएल लोक परमेश्वरास शुद्ध पात्रांतून अन्नार्पण आणतात तसे सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना अर्पण म्हणून घोड्यांवर, रथांत, पालख्यांत, खेचरांवर व सांडणींवर बसून यरुशलेमेस माझ्या पवित्र पर्वतावर आणतील.


तर तू आपणांसाठी केलेले देव कोठे आहेत? तुझ्या संकटसमयी ते उठून तुला वाचवतील की काय ते पाहा, कारण हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे.


“लबानोनावर चढून आक्रोश कर; बाशानात हेल काढून रड; अबारीमाहून आरोळी कर; कारण तुझे सर्व वल्लभ भंगले आहेत.


वारा तुझ्या सर्व मेंढपाळांना उधळून लावील, तुझे वल्लभ बंदिवान होतील; तेव्हा तू आपल्या सर्व दुष्टतेमुळे लज्जित व फजीत होशील.


तुझे सर्व वल्लभ तुला विसरले आहेत; ते तुला विचारत नाहीत; तुझ्या घोर दुष्कर्मामुळे तुझी पातके फार झाल्यामुळे तुला शत्रूप्रमाणे जखम करून, क्रूर जनांप्रमाणे शिक्षा करून, मी तुला घायाळ केले आहे.


तर माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलाच्या उंच पर्वतावर, इस्राएलाचे सर्व घराणे, त्यातले सगळे जण आपल्या देशात माझी सेवा करतील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो; तेथे मी त्यांचा अंगीकार करीन; तेथे तुमच्याजवळ अर्पणे, तुमची श्रेष्ठ अर्पणे, समर्पित केलेल्या सर्व वस्तू मी मागेन.


ह्यास्तव ते सकाळच्या अभ्रासारखे, लवकर उडून जाणार्‍या दहिवरासारखे होतील, खळ्यातून वावटळीने उडणार्‍या भुसाप्रमाणे, धुराड्यातून निघणार्‍या धुराप्रमाणे ते होतील.


“सीयोनेवर, माझ्या पवित्र डोंगरावर राहणारा परमेश्वर तुमचा देव मी आहे हे तुम्हांला कळेल, तेव्हा यरुशलेम पवित्र स्थळ होईल; ह्यापुढे परके त्यातून येणार-जाणार नाहीत.


तेव्हा असे झाले की, “मी हाक मारीत असता त्यांनी ऐकले नाही, म्हणून ते हाक मारतील तरी मी ऐकणार नाही,” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


जा, तुम्ही मानलेल्या दैवतांचा धावा करा. तुमच्या विपत्काली त्यांनी तुम्हांला सोडवावे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan