Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 56:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 घालवून दिलेल्या इस्राएल लोकांस एकत्र करणार्‍या प्रभू परमेश्वराचे हे वचन आहे की एकत्र केलेल्या इस्राएलांखेरीज इतरांनाही एकत्र करून मी त्यांच्यात मिळवीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 ही प्रभू परमेश्वराची घोषणा आहे, जो इस्राएलाच्या घालवलेल्यास जमवतोः मी अजून इतरासही गोळा करून त्यांच्यात मिळवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 जे इस्राएलच्या निर्वासित झालेल्यांना एकत्र करतात, ते सार्वभौम याहवेह अशी घोषणा करतात— “ज्यांना पूर्वी एकत्र करण्यात आले आहे, त्या लोकांशिवाय इतर लोकांनाही मी त्यांच्यात गोळा करेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 56:8
25 Iomraidhean Croise  

यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हांला तार, आम्हांला राष्ट्रांतून काढून एकवट कर, म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे स्तवन करू, तुझ्या स्तवनात आम्हांला उल्लास वाटेल.


परमेश्वर यरुशलेम पुन्हा बांधून वसवतो; इस्राएलातील पांगलेल्यांना तो एकत्र करतो.


मी उत्तरेला म्हणेन, ‘देऊन टाक’; दक्षिणेला म्हणेन, ‘अटकाव करू नकोस’; माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या;


हे पाहा, हे लांबून येत आहेत; हे पाहा, हे उत्तरेकडून व पश्‍चिमेकडून येत आहेत; हे सीनी लोकांच्या देशातून येत आहेत.”


प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी राष्ट्रांना आपल्या हाताने इशारा करीन, लोकांसमोर आपला झेंडा उभारीन; ते तुझ्या पुत्रांना आपल्या उराशी धरून आणतील; तुझ्या कन्यांना खांद्यांवर बसवून पोहचत्या करतील.


तो परमेश्वर म्हणतो; “याकोबाच्या वंशाचा उद्धार करावा, इस्राएलाच्या राखून ठेवलेल्या लोकांना परत आणावे म्हणून तू माझा सेवक व्हावे ह्यात काही मोठेसे नाही; तर माझ्याकडून होणारे तारण तू दिगंतापर्यंत न्यावे म्हणून मी तुला राष्ट्रांचा प्रकाश असा नेमतो.”


केवळ क्षणभर मी तुला सोडले, तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करीन.


मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’


अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका; दूरच्या द्वीपांत हे प्रसिद्ध करा व म्हणा, ‘ज्याने इस्राएलास विखरले तो त्यांना जमा करील;’ मेंढपाळ आपल्या कळपाची निगा करतो तशी तो त्यांची निगा करील.


जो मेंढपाळ आपल्या दाणादाण झालेल्या मेंढरांमध्ये राहून त्यांना हुडकतो, त्याच्याप्रमाणे मी आपल्या मेंढरांना हुडकीन आणि अभ्राच्छादित व अंधकाराच्या दिवशी त्यांची दाणादाण झाली त्या सर्व ठिकाणांतून त्यांना वाचवून आणीन.


यहूदाची संतती व इस्राएलाची संतती एकत्र होऊन आपणांवर एक प्रमुख नेमतील व देशातून निघून येतील; कारण इज्रेलाचा दिवस थोर होईल.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवसांत मी लंगड्यांना जमा करीन; हाकून दिलेल्यांना व मी ज्यांना पिडले त्यांना एकत्र करीन.


ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजेत; ती माझी वाणी ऐकतील; मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल.


आणि केवळ त्या राष्ट्राकरता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे ह्याकरता.


ह्यामुळे यहूदी आपसांत म्हणाले, “हा असा कोठे जाणार आहे की तो आपल्याला सापडणार नाही? तो हेल्लेणी लोकांत पांगलेल्यांकडे जाणार आणि हेल्लेण्यांस शिकवणार काय?


ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan