Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 56:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 जो विदेशी परमेश्वरचरणी जडला आहे तो असे न म्हणो की, “परमेश्वर आपल्या लोकांतून माझा उच्छेद करील;” आणि षंढही न म्हणो की, “मी केवळ शुष्क वृक्ष आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जो विदेशी परमेश्वराचा अनुयायी झाला आहे त्याने असे म्हणू नये, परमेश्वर कदाचित आपल्या लोकांपासून मला वेगळे करील. षंढाने असे म्हणू नये पाहा, मी झाडासारखा शुष्क आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 जो विदेशी मनुष्य याहवेहशी एकनिष्ठ राहतो, त्याने असे म्हणू नये, “याहवेह निश्चितच मला त्यांच्या लोकांमघून वगळतील.” आणि कोणत्याही षंढाने अशी तक्रार करू नये, “मी तर केवळ एक शुष्क वृक्ष आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 56:3
35 Iomraidhean Croise  

तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझे मोठे नाम, बलिष्ठ हस्त व पुढे केलेला बाहू ह्यास्तव परदेशाहून आला, आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली,


यहूदी लोकांनी आपणांसाठी, आपल्या वंशजांसाठी व जे त्यांना सामील झाले होते त्यांच्यासाठी असा अढळ नियम व प्रतिज्ञा केली की, त्या लेखानुसार प्रत्येक वर्षी नेमलेल्या समयानुसार हे दोन दिवस पाळावेत.


कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील.


जे पुत्र तुला होतील, तुझ्या पोटी निर्माण होतील, त्यांच्यापैकी ज्या कोणास घेऊन जाण्यात येईल ते बाबेलच्या राजवाड्यात खोजे होऊन राहतील.”


त्यांचे माझ्या गृहात व माझ्या कोटाच्या आत कन्यापुत्रांहून श्रेष्ठ असे स्मारक मी स्थापीन व त्यांचे नाव राखीन; सर्वकाळ राहील असे त्यांचे नाव मी करीन, ते नाहीसे होणार नाही.


तसेच परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यांतील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात,


ते सीयोनाची वाट विचारतील, आपली तोंडे इकडल्या रस्त्यांकडे करून म्हणतील, ‘चला, शाश्वत व चिरस्मरणीय अशा कराराने आपण परमेश्वराबरोबर मिलाफ करू.’


कुबडा असो, खुजा असो, नेत्रदोषी असो, किंवा चाई, खरूज झालेला असो अथवा भग्नांड असो;


ह्याशिवाय, तुमच्यामध्ये उपरे म्हणून राहणारे परदेशीय लोक आणि त्यांच्या पोटी तुमच्या देशात जन्मलेली त्यांची संतती ह्यांच्यातून तुम्ही दास व दासी खरेदी करावेत आणि ती तुमची मालमत्ता व्हावी.


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


त्यांनी तुझ्याबरोबर दर्शनमंडपाच्या सगळ्या सेवेच्या बाबतीत आपली कर्तव्ये करावीत; पण कोणा परक्याने तुमच्याजवळ येऊ नये.


पण वेदीच्या संबंधात किंवा अंतरपटाच्या आतील सेवेच्या बाबतीत तू व तुझे मुलगे ह्यांनी आपले याजकपण सांभाळावे; तुम्ही सेवा करावी, कारण मी तुम्हांला दान म्हणून याजकपणाची ही सेवा दिली आहे; कोणी परका जवळ आला तर त्याला जिवे मारावे.”


तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला :


तेव्हा त्यांच्यापैकी काही जणांची खातरी होऊन ते पौल व सीला ह्यांना येऊन मिळाले; आणि भक्तिमान हेल्लेणी ह्यांचा मोठा समुदाय त्यांना मिळाला. त्यात प्रमुख स्त्रिया काही थोड्याथोडक्या नव्हत्या.


मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला.


ती कृपा अशी की, मी परराष्ट्रीयांसाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे; अशासाठी की, परराष्ट्रीय हेच अर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन मान्य व्हावे.


परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत.


ते तुम्ही त्या वेळेस ख्रिस्तविरहित, इस्राएलाच्या राष्ट्राबाहेरचे, वचनाच्या करारांना परके, आशाहीन व देवविरहित असे जगात होता.


प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात.


तुझ्या शत्रूंशी लढाई करण्यासाठी बाहेर पडून तू तळ देशील तेव्हा सर्व दुष्कृत्यांपासून दूर राहा.


पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्यांत पांगलेल्या (यहूदी) लोकांतील,


Lean sinn:

Sanasan


Sanasan