Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 56:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 जो मानव हे करतो व जो मानवपुत्र ह्याला धरून राहतो, जो शब्बाथ पाळतो, काही अपवित्र करीत नाही, जो कोणतेही दुष्कर्म करण्यापासून आपला हात आवरतो तो धन्य!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 जो मनुष्य हे करतो आणि तो घट्ट धरून राहतो. तो शब्बाथ पाळतो, तो अपवित्र करत नाही आणि वाईट करण्यापासून आपला हात आवरून धरतो तो आशीर्वादित आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जो शब्बाथाच्या दिवसास अपवित्र न करता त्याचे पालन करतो, अयोग्य गोष्ट करण्यापासून स्वतःला आवरतो, या सर्व गोष्टींवर अढळ राहतो, जो असे वागतो, तो मनुष्य धन्य होय.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 56:2
31 Iomraidhean Croise  

मग यहूदाच्या सरदार मंडळीशी वाद करून मी म्हणालो, “तुम्ही असले दुष्कर्म करून शब्बाथ दिवस पवित्र असा पाळत नाही, हे काय?


जे त्याच्या न्यायानुसार वागतात, आणि सर्वदा नीती आचरतात, ते धन्य!


परमेशाचे स्तवन करा!1 जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य!


तुझे वचन पाळावे म्हणून मी आपले पाऊल प्रत्येक वाईट मार्गापासून आवरतो.


जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य!


वाइटाचा त्याग कर व बरे ते कर, शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर.


वाइटापासून दूर राहा, बरे ते कर; म्हणजे तुझी वस्ती कायम राहील.


पण सातवा दिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी कोणतेही कामकाज करू नकोस; तू, तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा दास, तुझी दासी, तुझी गुरेढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरा, ह्यांनीही करू नये;


शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ.


सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो; मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो;


दुष्कर्मापासून दूर राहणे हा सरळांचा धोपट मार्ग होय; जो आपला मार्ग धरून राहतो तो आपला जीव राखतो.


दया व सत्य ह्यांच्या योगाने पापाचे क्षालन होते, आणि परमेश्वराचे भय बाळगल्याने माणसे दुष्कर्मापासून दूर राहतात.


तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नकोस; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे,


तू डावीउजवीकडे वळू नकोस; दुष्कर्मातून आपले पाऊल काढ.


ह्याला तू धरून राहावे, आणि त्यापासून तू आपला हात मागे घेऊ नये हे बरे; कारण जो देवाचे भय धरतो तो ह्या सर्वांतून पार पडेल.


कारण परमेश्वर म्हणतो, “जे षंढ माझे शब्बाथ पाळतात, मला आवडणार्‍या गोष्टी पसंत करतात व माझ्या करारास दृढ धरून राहतात,


तसेच परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याच्या नामाची आवड धरण्यासाठी व त्याचे सेवक होण्यासाठी जे विदेशी त्याच्या चरणी जडले आहेत, त्यांतील जे कोणी शब्बाथ अपवित्र न करावा म्हणून जपतात व माझा करार दृढ धरून राहतात,


तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस, माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस, शब्बाथ आनंददिन आहे, परमेश्वराचा पवित्र व सन्मान्य दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील; व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालवणार नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस;


आणखी त्यांच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होण्यास मी त्यांना आपले शब्बाथही दिले; ते अशासाठी की मी परमेश्वराने त्यांना पवित्र केले हे त्यांना समजावे.


माझे शब्बाथ पवित्र माना, म्हणजे ते तुमच्यामध्ये व माझ्यामध्ये चिन्ह होतील व तुम्हांला समजेल की मी परमेश्वर तुमचा देव आहे.


तुम्ही माझे शब्बाथ पाळावेत आणि माझ्या पवित्रस्थानाविषयी पूज्यबुद्धी बाळगावी; मी परमेश्वर आहे.


तेव्हा तो म्हणाला, “पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य!”


त्याचा धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना आढळेल तो धन्य.


जर ह्या गोष्टी तुम्हांला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आहात.


प्रीतीमध्ये ढोंग नसावे; वाइटाचा वीट माना; बर्‍याला चिकटून राहा;


आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’ अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’2 ते धन्य.


Lean sinn:

Sanasan


Sanasan