Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 55:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 पाहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणार्‍यास बीज, खाणार्‍यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 कारण जसे पाऊस आणि बर्फ आकाशातून खाली पडतात आणि पुन्हा भूमी भिजवल्याशिवाय आणि उत्पन्न करण्यास व अंकुर व पेरणाऱ्यास बीज आणि खाणाऱ्यास भाकर दिल्याशिवाय आकाशात परत जात नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आकाशातून पाऊस व हिम ज्याप्रमाणे खाली पडतात आणि पृथ्वीला भिजवून टाकल्याशिवाय परत जात नाहीत आणि तिला अंकुरतात व बहरतात, जेणेकरून पेरणार्‍यासाठी बीज निपजते व खाणार्‍याला भाकर मिळते,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 55:10
13 Iomraidhean Croise  

म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर, ही त्याने उत्पन्न करावी.


तू भूमीत आपले बी पेरशील त्यावर तो पाऊस पाडील; भूमी पीक देईल ते अन्न रसभरीत व सत्त्वपूर्ण असेल; त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील.


मी तो उद्ध्वस्त करीन; त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही; त्यात काटेसराटे उगवतील; त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघांना करीन.


कारण भूमी जशी आपले अंकुर उगवते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवेसे करतो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत नीतिमत्ता व कीर्ती अंकुरित करील.


मी त्यांना व माझ्या डोंगराभोवतालच्या स्थळांना मंगलदायक करीन; पाऊस योग्य ऋतूत पडेल असे मी करीन; मंगलदायक वृष्टी होईल.


तुम्ही आपणांसाठी नीतिमत्त्वाची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल; पडीत जमीन नांगरून काढा; कारण परमेश्वराने येऊन तुमच्यावर नीतिमत्त्वाची वृष्टी करावी ह्याकरता त्याला शरण जाण्याचा हा समय आहे.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी ऐकेन, मी आकाशाचे ऐकेन, आणि आकाश पृथ्वीचे ऐकेल;


पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाची वृष्टी होवो, माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम, हिरवळीवर जशा पावसाच्या सरी, तसे ते वर्षो.


त्यांच्या संदेश सांगण्याच्या दिवसांत ‘पाऊस पडू नये’ म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे; ‘पाण्याचे रक्त करण्याचा’ अधिकार त्यांना पाण्यावर आहे, आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला ‘सर्व पीडांनी पीडित करण्याचाही’ त्यांना अधिकार आहे.


दाविदाने परमेश्वराला पुन्हा प्रश्‍न केला, तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितले, “ऊठ, कंबर बांधून कईलास जा; मी पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan