Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 54:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारकर्ता आहे; त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण तुझा निर्माता तुझा पती आहे; त्याचे नाव सेनाधीश परमेश्वर आहे. इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धारक आहे; त्यास सर्व पृथ्वीचा देव असे म्हटले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कारण तुझा निर्माणकर्ता तुझा पती आहे— सर्वसमर्थ याहवेह हे त्यांचे नाव आहे— इस्राएलचे पवित्र परमेश्वर तुझे उद्धारकर्ता आहेत; त्यांना सर्व पृथ्वीचे परमेश्वर म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 54:5
30 Iomraidhean Croise  

मला तर ठाऊक आहे की माझा उद्धारक जिवंत आहे. तो अंती पृथ्वीवर उभा राहील;


माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत; कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.


तरी आता हे याकोबा, तुझा उत्पन्नकर्ता, आणि हे इस्राएला, तुझा निर्माणकर्ता परमेश्वर, असे म्हणतो, “भिऊ नको; कारण मी तुला सोडवले आहे; मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे; तू माझा आहेस.


परमेश्वर, तुमचा उद्धार करणारा, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, “तुमच्यासाठी मी बाबेलास निरोप पाठवला आहे; मी तेथील सर्व खास्द्यांना त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळायला लावीन.


इस्राएलाचा निर्माणकर्ता पवित्र प्रभू, परमेश्वर म्हणतो, होणार्‍या गोष्टींविषयी मला कोण विचारणार? माझे पुत्र व माझ्या हातांचे कृत्य ही पाहा, असे मला कोण सांगणार?


परमेश्वर तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू, म्हणतो : “तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.


ते तर आपणांस पवित्र नगराचे म्हणवतात व इस्राएलाच्या देवाचा आश्रय करतात; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे.


कारण मी परमेश्वर तुझा देव आहे; मी समुद्र खवळवतो तेव्हा त्याच्या लाटा गर्जना करतात; सेनाधीश परमेश्वर हे माझे नाम आहे.


रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले; पण मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो.


ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1


म्हणून देशातला जो आपणास धन्य म्हणवील तो सत्य देवाच्या नामाने आपणास तसा म्हणवील; देशातला जो शपथ वाहील तो ती सत्य देवाच्या नामाची वाहील; कारण पूर्वीच्या कष्टांचा विसर पडला आहे व ते माझ्या दृष्टिआड झाले आहेत.


जो याकोबाचा वाटा तो त्यांसारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.


परमेश्वर म्हणतो, मुलांनो मागे फिरा; कारण मी लग्नाचा नवरा आहे; मी तुम्हांला ह्या शहरातून एक, त्या कुळांतून दोघे, असे घेऊन सीयोनेस आणीन.


जो याकोबाचा वाटा तो त्यांच्यासारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे, इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे; सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.


मग तुझ्याजवळून जाताना मी तुला पाहिले, तर ती वेळ तुझ्या प्रेमविकासाची होती; तेव्हा मी तुझ्यावर पदर घालून तुझी नग्नता झाकली. प्रभू परमेश्वर म्हणतो, तेव्हा मी शपथ वाहून तुझ्याबरोबर करार केला व तू माझी झालीस.


परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तू मला ‘इशी’ (माझा पती) म्हणशील, ह्यापुढे कधी मला ‘बआली’ (माझा धनी) म्हणणार नाहीस.


त्या दिवशी इस्राएलांकरता मी वनपशू, आकाशातील पक्षी व भूमीवर रांगणारे जीव ह्यांबरोबर करार करीन; देशातून धनुष्य, तलवार व युद्ध मोडून टाकीन व ते सुखासमाधानाने राहतील असे मी करीन.


तेव्हा परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल; त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील.


कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील; आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल;


वधू ज्याची आहे तोच वर आहे आणि उभा राहून त्याचे बोलणे जो ऐकतो तो वराचा मित्र आहे, त्याला वराच्या वाणीने अत्यानंद होतो; तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे.


हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त व मंडळी ह्यांच्यासंबंधाने बोलतो आहे.


अखिल पृथ्वीचा जो प्रभू त्याच्या कराराचा कोश तुमच्यासमोर पलीकडे जाण्यासाठी यार्देनेत प्रवेश करत आहे.


अखिल पृथ्वीचा जो प्रभू परमेश्वर ह्याच्या कराराचा कोश वाहणार्‍या याजकांचे तळपाय यार्देनेच्या पाण्याला लागताच वरून वाहत येणारे यार्देनेचे पाणी थांबून साचेल व त्याची रास होईल.”


सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan