Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 54:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 आपल्या डेर्‍यांची जागा वाढव, आपल्या राहुट्यांच्या कनाथी पसरू दे; अटकाव करू नकोस; आपल्या दोर्‍या लांब कर, मेखा पक्क्या ठोक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तू आपला तंबू मोठा कर आणि तंबूचे पडदे अधिक दूर बाहेर पसरण्याचे थांबू नको; आपल्या दोऱ्या लांब कर आणि आपल्या मेखा मजबूत कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “आपले तंबू प्रशस्त कर, तुझ्या तंबूच्या कनातीचा विस्तार वाढव, हात आवरू नको; दोरबंद लांब कर, खुंट्या मजबूत कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 54:2
8 Iomraidhean Croise  

तो तेथून पुढे गेला आणि तेथे त्याने आणखी एक विहीर खणली; तेव्हा तिच्यावरून ते भांडले नाहीत, म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ (विस्तार) असे ठेवले, आणि तो म्हणाला, “परमेश्वराने आमच्या भूमीचा विस्तार केला आहे आता ह्या देशात आमची वाढ होईल.”


निवासमंडप व अंगण ह्यांच्यासाठी मेखा व तणावे;


अंगणाचे पडदे (अंगणाच्या कनाती), खांब व उथळ्या, अंगणाच्या फाटकाचा पडदा, तणावे, मेखा आणि निवासमंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य;


तू राष्ट्रांची वाढ केली आहेस, हे परमेश्वरा, तू राष्ट्रांची वाढ केली आहेस; तू आपला महिमा दाखवला आहेस; तू देशाच्या चतुःसीमा वाढवल्या आहेत.


आमचे मेळे भरवण्याची सीयोन नगरी पाहा; यरुशलेम सुखधाम आहे असे तुझ्या दृष्टीस पडेल; जो कधी हलवत नाहीत, ज्याच्या मेखा कधी उपटत नाहीत, ज्याची एकही दोरी तोडत नाहीत, अशा तंबूसारखी ती तुझ्या दृष्टीस पडेल.


माझा डेरा लुटला आहे, माझे सर्व दोर तुटले आहेत; माझे पुत्र निघून गेले आहेत; ते नाहीत; माझा डेरा ताणायला कोणी नाही, माझ्या कनाती लावायला कोणी नाही.


तुझे तट बांधण्याचा समय आला आहे. त्या दिवशी तुझ्या सीमा रुंद होतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan