Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 54:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 अगे पिडलेले, वादळांनी त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमण्यांनी तुझा पाया घालीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अगे जाचलेले, वादळाने मस्त झालेले आणि सांत्वन न पावलेले, पाहा, तुझे पाषाण सुरम्य रंगात बसवीन, आणि तुझा पाया नीलमण्यांनी घालीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “हे पीडित नगरी, वादळांनी फटकारलेल्या व सांत्वन न पावलेल्यांनो, पाचूरत्नांनी मी तुमची पुन्हा उभारणी करेन, व तुमचा पाया मौल्यवान नीलमणींवर करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 54:11
43 Iomraidhean Croise  

मंदिराचा पाया घडीव चिर्‍यांचा घालावा म्हणून राजाज्ञेने मोठमोठे मोलवान पाषाण खोदून काढण्यात आले.


त्या मंदिराची आतली व बाहेरली जमीन सोन्याने मढवली होती.


माझ्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदींच्या वस्तूंसाठी चांदी, पितळेच्या वस्तूंसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड व लाकडी वस्तूंसाठी लाकूड, गोमेदमणी, जडवण्यासाठी रत्ने, जडावाच्या कामासाठी रंगारंगांचे नग, हरतर्‍हेची रत्ने व संगमरवरी पाषाण ह्यांची रेलचेल मी आपले सगळे बळ खर्चून केली आहे.


त्याने ते मंदिर मोलवान रत्नांनी सुशोभित केले; सोने वापरले ते पर्वाइम येथले होते.


ओफीरचे सोने, गोमेद व नीलमणी ही भारंभार देऊनही त्याचे मोल होत नाही.


नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.


बराच काळ लोटल्यावर मिसराचा राजा मृत्यू पावला; इकडे इस्राएलवंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत, आणि त्या दास्यामुळे त्यांनी केलेली आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोहचली.


त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; त्याच्या पायांखाली नीलकांत मण्यांच्या चबुतर्‍यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखे स्वच्छ होते.


तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले; त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले.


परमेश्वर म्हणाला, “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे;


त्याचे हात पुष्परागाने खचलेल्या सुवर्णनलिकाच होत; त्याचे पोट नीलमणी जडलेल्या हस्तिदंतफलकासारखे आहे.


राष्ट्राच्या जासुदांना काय उत्तर द्यावे? “परमेश्वराने सीयोन स्थापली आहे; त्याच्या लोकांपैकी दीनदुर्बळ तिच्यात आश्रय करून आहेत.”


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे; ‘विश्वास ठेवणार्‍याची त्रेधा उडणार नाही.’


मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’


ह्यावर सीयोन म्हणाली, “परमेश्वराने माझा त्याग केला आहे; प्रभू मला विसरला आहे.”


ह्यासाठी तू जी पीडित व मस्त झाली आहेस, पण मद्याने नव्हे, ती तू हे ऐक :


ज्या पीडा करणार्‍यांनी तुझ्या जिवाला म्हटले, खाली वाक म्हणजे आम्ही तुझ्यावरून चालून जाऊ, आणि तुझ्यावरून ज्या चालणार्‍यांसाठी तू आपली पाठ, भूमी व रस्ता अशी केली, त्यांच्या हाती मी तो प्याला देईन.”


तुझ्या भिंतीवरील कळस माणकांचे, तुझ्या वेशी लालांच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्नखचित करीन.


सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलावत आहे, असे तुझा देव म्हणतो.


तू टाकलेली व द्वेषलेली होतीस; तुझ्याकडे कोणी जात-येत नसत; तरी तुला सर्वकाळचे भूषण, पिढ्यानपिढ्यांचा आनंद अशी मी करीन.


मी तर तुला आरोग्य देईन व तुझ्या जखमा बर्‍या करीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण त्यांनी म्हटले आहे की, ‘हिला टाकून दिले आहे; ही सीयोन! हिला कोणी विचारत नाही.’


त्यांनी ऐकले की मी उसासा टाकत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही; माझ्या सर्व वैर्‍यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे; तू हे केले म्हणून त्यांना आनंद झाला आहे. तू नेमलेला दिवस आणला म्हणजे ते माझ्यासारखे होतील.


त्यांच्या डोक्यांवर असलेल्या चांदव्यावर नीलमण्याच्या सिंहासनासारखे काही दिसत होते आणि त्या सिंहासनावर पुरुष असल्याचा भास होत होता.


मी पाहिले तेव्हा करूबांवरल्या छतांवर नीलमण्यासारखे काही दिसले, ते सिंहासनाच्या प्रतिमेसारखे होते.


तुझे तट बांधण्याचा समय आला आहे. त्या दिवशी तुझ्या सीमा रुंद होतील.


तेव्हा पाहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले; परंतु तो झोपेत होता.


माझ्या ठायी तुम्हांला शांती मिळावी म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे.”


आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, ‘विश्वासात टिकून राहा; कारण आपल्याला पुष्कळ संकटांत टिकून देवाच्या राज्यात जावे लागते.’


प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे;


त्या समयी त्यांच्यावर माझा कोप भडकेल, मी त्यांचा त्याग करीन आणि त्यांच्यापासून आपले मुख लपवीन; त्यांचा फडशा उडेल व त्यांच्यावर पुष्कळ विपत्ती व संकटे ओढवतील. मग ते म्हणतील, ‘आपला देव आपल्यामध्ये नाही म्हणूनच ह्या विपत्ती आपल्यावर ओढवल्या आहेत ना?’


Lean sinn:

Sanasan


Sanasan