Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 54:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कारण पर्वत दृष्टिआड होतील, टेकड्या ढळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही; माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 जरी पर्वत कोसळतील आणि टेकड्या ढळतील, तरी माझा कराराचा विश्वासूपणा तुझ्यापासून दूर होणार नाहीत किंवा माझ्या शांतीचा करार ढळणार नाही, असे तुझ्यावर दया करणारा परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 कारण पर्वत हलतील व टेकड्या काढून टाकल्या जातील, परंतु तुझ्यावरील माझी अढळ प्रीती कधीही हलणार नाही वा माझा शांतीचा करार कधीही भंग होणार नाही,” असे याहवेह, तुझ्यावर करुणा करणारे म्हणतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 54:10
33 Iomraidhean Croise  

माझ्या घराण्याचा देवाशी असा संबंध नाही काय? कारण त्याने माझ्याशी निरंतरचा करार केला आहे; तो सर्व प्रकारे यथास्थित व निश्‍चित आहे; माझा संपूर्ण उद्धार व अभीष्ट ह्यांचा तो उदय होऊ देणार नाही काय?


ती नाहीशी होतील, परंतु तू निरंतर आहेस; ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होतील; ती तू प्रावरणासारखी बदलशील आणि ती नाहीशी होतील.


म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले,


सागराच्या लाटा गर्जून उसळल्या, त्यांच्या उचंबळण्याने पर्वत हालले तरी आम्ही भिणार नाही. (सेला)


त्यांना तहानभूक लागणार नाही; झळई व ऊन ह्यांची बाधा त्यांना होणार नाही; कारण त्यांच्यावर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याच्या झर्‍यांवर तो त्यांना नेईल.


“स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.


रागाच्या आवेशात मी आपले तोंड तुझ्यापासून क्षणभर लपवले; पण मी तुझ्यावर दया करीन, तुझ्यावर मी सर्वकाळ प्रसन्न राहीन असे तुझा उद्धारकर्ता परमेश्वर म्हणतो.


तसे तुम्ही आनंदाने निघाल, शांतीने मिरवत जाल; पर्वत व टेकड्या तुमच्यापुढे जयघोष करतील; वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील.


कान द्या, माझ्याकडे या; ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल; आणि मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन.


दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.


परमेश्वर म्हणतो, “माझा तर त्यांच्याशी हाच करार : तुझ्यावर असलेला माझा आत्मा, तुझ्या मुखात घातलेली माझी वचने तुझ्या मुखातून, तुझ्या संतानांच्या मुखांतून व तुझ्या संतानाचे जे संतान त्यांच्या मुखांतून आतापासून पुढे सर्वकाळ निघून जाणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.”


“कारण मला, परमेश्वराला न्याय प्रिय आहे, अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे; मी त्यांना खातरीने प्रतिफळ देईन; त्यांच्याशी सार्वकालिक करार करीन.


परमेश्वराने आमच्यावर जे सर्व उपकार केले आणि आपल्या दयेने व आपल्या विपुल करुणेने इस्राएलाच्या घराण्याचे जे फार कल्याण केले, त्यांस अनुसरून असे परमेश्वराच्या सदय कृत्यांचे मी वर्णन करीन, त्याचे गुणानुवाद गाईन.


कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.


“यदाकदाचित माझ्यासमोरून हे नियम ढळलेच तर इस्राएलाचा वंश माझ्यासमक्ष राष्ट्र ह्या पदापासून अक्षय ढळेल.”


“परमेश्वर म्हणतो, दिवस व रात्र ह्यांविषयी जो माझा करार तो तुमच्याने मोडवेल, म्हणजे दिवसाचा व रात्रीचा जो नित्यक्रम तो नाहीसा होईल,


तेव्हा तुझ्यावरचा माझा संताप मी शांत करीन; तुझ्याविषयीची माझी ईर्ष्या नाहीशी होईल; मी शांत होईन, पुन्हा कोप करणार नाही.


मी क्षेमवचन देऊन त्यांच्याबरोबर करार करीन, देशातून दुष्ट पशू नाहीतसे करीन म्हणजे मग ते रानात निर्भय असे राहतील व जंगलात झोप घेतील.


मी त्यांच्याबरोबर केलेला करार जीवनाचा व शांतीचा होता; त्याने भय धरावे म्हणून मी ती त्याला दिली होती आणि त्याला माझी भीती वाटली व माझ्या नावाचा त्याला धाक वाटला.


म्हणून त्याला असे सांग की, मी त्याच्याशी आपला शांतीचा करार करतो.


आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.


आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.


कारण मी तुम्हांला खचीत सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.


कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही.


तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्या द्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपल्याला तारले.


“आणखी एकदा” ह्याचा अर्थ असा होतो की, घडवलेल्या वस्तूंप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील; ते ह्यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहाव्यात.


‘एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश’ गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणांवरून ढळली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan