Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 53:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पण आमच्या बंडखोर कृत्यांच्या कारणांमुळे तो भोसकला गेला; आमच्या अपराधांमुळे तो चिरडला गेला. आमच्या शांतीसाठी त्याच्यावर शिक्षा आली, त्याच्या जखमांनी आम्हास आरोग्य मिळाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला, तो आमच्या पापामुळे चिरडला गेला; आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली, आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 53:5
27 Iomraidhean Croise  

आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती ह्यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टाच फोडशील.”


तर देव त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणेल, ‘ह्याचा बचाव कर, ह्याला गर्तेत पडू देऊ नकोस; मला खंड मिळाला आहे.’


हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझा धावा केला आणि तू मला रोगमुक्त केलेस.


जखम करणारे घाय आणि वर्मी लागणारे फटके दुष्टतेचे क्षालन करतात.


यरुशलेमेच्या मनाला धीर येईल असे बोला, तिला पुकारून सांगा, तुझे युद्ध संपले आहे. तुझ्या पापाबद्दलचा दंड मिळाला आहे; परमेश्वराच्या हातून तुझ्या सर्व पापांचा तुला दुप्पट बदला मिळाला आहे.


मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन.


तो माझ्या ओठांना लावून त्याने म्हटले, “पाहा, ह्याचा स्पर्श तुझ्या ओठांना झाला म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायश्‍चित्त झाले आहे.”


आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्‍चित्त करावे, सनातन नीतिमत्ता उदयास आणावी, दृष्टान्त व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा, हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर ह्यासंबंधाने सत्तर सप्तके ठरली आहेत.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “अगे तलवारी, माझ्या मेंढपाळावर व जो पुरुष माझा सोबती त्याच्यावर ऊठ; मेंढपाळावर प्रहार कर म्हणजे मेंढरे विखरतील; माझ्या लहानग्यांवर मी माझ्या हाताची छाया करीन.”


ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.”


तो प्रभू येशू तुमच्याआमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे.


कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की,3 शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांबद्दल मरण पावला;


ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या-आमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.


आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वत:ला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.


आज तुम्ही हे लक्षात आणा; तुमच्या मुलाबाळांना मी हे सांगत नाही; त्यांनी तर हे काही अनुभवले नाही; म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याने दिलेली शिक्षा, त्याचा महिमा, पराक्रमी बाहू व उगारलेला हात ह्यांच्या द्वारे


त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत.


कारण पवित्र होणार्‍यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केले आहे.


तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला;


त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी’ एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसर्‍यांदा दिसेल.


कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापांबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरता, एकदा मरण सोसले. तो देहरूपात जिवे मारला गेला आणि आत्म्यात2 जिवंत केला गेला;


Lean sinn:

Sanasan


Sanasan