Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 53:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा, रुक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला; त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला आणि शुष्क भूमीवर अंकुराप्रमाणे वाढला; त्याच्यात उल्लेखनीय रुप किंवा सौंदर्य नव्हते. जेव्हा आम्ही त्यास पाहीले, आम्हास आकर्षित करून घेईल अशी सुंदरता त्याच्यात नव्हती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 त्यांच्यासमोर तो कोवळ्या अंकुरासारखा वाढला, शुष्क भूमीतून उगविलेल्या मुळासारखा होता. आम्हाला आकर्षित करेल असे कोणतेही सौंदर्य वा वैभव त्याच्यामध्ये नव्हते, तो आम्हाला हवासा वाटेल असे त्याच्या स्वरुपात काहीही नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 53:2
22 Iomraidhean Croise  

इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल;


त्या दिवशी परमेश्वराचा अंकुर शोभिवंत व तेजस्वी होईल; भूमीचे उत्पन्न इस्राएलाच्या बचावलेल्यांना वैभव व शोभा देणारे होईल.


ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले (त्याचा चेहरा मनुष्याच्या चेहर्‍यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्यजातीच्या स्वरूपासारखे नव्हते इतका तो विरूप होता),


कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी दाविदाकरता एक नीतिमान अंकुर उगववीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील, असे दिवस येत आहेत.


आता हे मुख्य याजका, यहोशवा, तू व तुझ्याबरोबर बसणारे तुझे सोबती, तुम्ही ऐका; ती माणसे चिन्हादाखल आहेत; पाहा, मी माझा सेवक जो ‘कोंब’ त्याला आणतो.


त्याला सांग की, ‘सेनाधीश परमेश्वर म्हणतो, पाहा, एक पुरुष, ज्याचे नाव कोंब असे आहे तो आपल्या स्थानी उगवेल व तो परमेश्वराचे मंदिर बांधील.


जो सुतार, जो मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन ह्यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? आणि ह्याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना?” असे ते त्याच्याविषयी अडखळले.


त्याने त्यांना उत्तर दिले, “एलीया पहिल्याने येऊन सर्वकाही यथास्थित करतो हे खरे आहे; तर मग मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी व तुच्छ मानले जावे असे त्याच्याविषयी लिहिले आहे त्याचा अर्थ काय?


आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती.


येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही.”


तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा.” बरब्बा हा एक लुटारू होता.


ह्यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!”


कारण नियमशास्त्र देहस्वभावामुळे दुर्बळ झाल्याकारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली;


आणि अधिकारी हे वाईट करणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणार्‍यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठवलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan