Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 52:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांना फुकट धरून नेले आहे, आणि आता मी येथे काय करू? परमेश्वर म्हणतो, त्यांच्यावर प्रभूत्व करणारे गर्जना करीत आहेत, दिवसभर एकसारखी माझ्या नामाची निंदा होत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 परमेश्वर असे म्हणतो, काय घडले आहे ते आता पाहा माझ्या लोकांस फुकट नेण्यात आले आहे, तर आता माझे इथे काय काम आहे? जे त्यांच्यावर अधिकार चालवतात ते आक्रंदन करतील आणि पूर्ण दिवस माझ्या नावाची निंदा होत आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 याहवेह घोषणा करतात, “आणि आता माझ्याकडे काय राहिले आहे? माझ्या लोकांना विनामूल्य नेण्यात आले आहे, आणि जे त्यांच्यावर सत्ता गाजवितात ते त्यांचा उपहास करतात,” याहवेह घोषणा करतात, “संपूर्ण दिवसभर माझ्या नावाची सतत निंदा करण्यात येते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 52:5
27 Iomraidhean Croise  

तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूंना उपहास करायला निमित्त दिले आहेस, ह्यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार.”


तू आपले लोक विनामूल्य विकलेस, त्यांचे मोल घेऊन आपला फायदा केला नाहीस.


कारण निंदा व निर्भर्त्सना करणार्‍यांचे शब्द मी ऐकत आहे.


हे देवा, शत्रू कोठवर निंदा करणार? वैरी तुझ्या नावाची निर्भर्त्सना सदा करणार काय?


हे परमेश्वरा, वैर्‍याने कशी विटंबना मांडली आहे, मूर्ख राष्ट्राने तुझ्या नावाची कशी निंदा चालवली आहे हे लक्षात असू दे.


परमेश्वर म्हणाला, “मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे, त्यांच्या मुकादमांच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे;


येथे तुझे काय आहे? येथे तुझे कोण आहे? तू आपल्यासाठी थडगे खोदवले आहेस; उच्च स्थळी थडगे खोदवले आहेस; खडक कोरून तू आपणासाठी जागा केली आहेस.


तुझे बसणेउठणे, तुझे जाणेयेणे व तुझा माझ्यावरला संताप मला ठाऊक आहे.


तेव्हा यशया त्यांना म्हणाला, “आपल्या धन्याला असे सांगा : ‘परमेश्वर म्हणतो, अश्शूरी राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत, त्यामुळे तू घाबरू नकोस.


मी आपल्या लोकांवर रुष्ट झालो, मी आपले वतन अपवित्र केले; त्यांना तुझ्या हाती दिले. तू त्यांच्यावर किमपि दया केली नाहीस, वृद्धांवर तू आपले भारी जू लादलेस.


तुझे पुत्र मूर्च्छित झाले आहेत, पाशात सापडलेल्या हरिणाप्रमाणे रस्त्यांच्या नाक्यानाक्यांनी ते पडले आहेत; ते परमेश्वराच्या क्रोधाने, तुझ्या देवाच्या धमकीने ग्रासले गेले आहेत.


ज्या पीडा करणार्‍यांनी तुझ्या जिवाला म्हटले, खाली वाक म्हणजे आम्ही तुझ्यावरून चालून जाऊ, आणि तुझ्यावरून ज्या चालणार्‍यांसाठी तू आपली पाठ, भूमी व रस्ता अशी केली, त्यांच्या हाती मी तो प्याला देईन.”


कारण परमेश्वर म्हणतो की : “मोलावाचून तुम्हांला विकले आणि पैक्यावाचून तुमची मुक्तता होणार.


“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर.


त्यांनी ऐकले की मी उसासा टाकत आहे व मला सांत्वन देणारा कोणी नाही; माझ्या सर्व वैर्‍यांनी माझ्या विपत्तीविषयी ऐकले आहे; तू हे केले म्हणून त्यांना आनंद झाला आहे. तू नेमलेला दिवस आणला म्हणजे ते माझ्यासारखे होतील.


त्याने संतप्त क्रोधाने इस्राएलाचे हरएक शृंग छेदून टाकले आहे; शत्रू समोर असता त्याने आपला उजवा हात माघारी घेतला आहे; सभोवतालचे सर्वकाही चाटून जाणार्‍या ज्वालेसारखा त्याने याकोबात पेट घेतला आहे.


तथापि ज्या राष्ट्रांसमक्ष मी त्यांना बाहेर आणले त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा म्हणून माझ्या नामासाठी मी अशी कृती केली.


तथापि माझ्या नामासाठी, ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्यादेखत माझ्या नामाचा अपमान न व्हावा, म्हणून मी हे कार्य केले; मी त्यांना मिसर देशातून काढून त्या राष्ट्रांच्यादेखत त्यांना प्रकट झालो.


“त्या दिवशी मत्स्यवेशीतून ओरडण्याचा आवाज होईल, दुसर्‍या पेठेतून आक्रंदन होईल व टेकड्यांवरून मोठा धडाका उडेल,” असे परमेश्वर म्हणतो.


“तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,” असे शास्त्रात लिहिलेले आहे.


ते मीखाच्या घराजवळ असताना त्यांनी त्या तरुण लेव्याचा आवाज ओळखला तेव्हा ते तिकडे जाऊन त्याला विचारू लागले, “तुला येथे कोणी आणले? तू येथे काय करतोस? तुझे येथे काय काम आहे?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan