Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 52:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अंगाची धूळ झाड; हे यरुशलेमे, उठून बस; सीयोनेच्या बंदिवान कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुझ्या अंगावरची धूळ झटक, यरूशलेमे, ऊठ, उठून बस, सियोनेच्या बंदीवान कन्ये तू कैदी होतीस, तुझ्या मानेचा साखळदंड काढून टाक.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 हे यरुशलेमे, तुझ्यावरील धूळ झटकून टाक, ऊठ व सिंहासनारुढ हो. बंदिवान सीयोनकन्ये, दास्यतेची बंधने आपल्या गळ्यांतून काढून मुक्त हो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 52:2
19 Iomraidhean Croise  

त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल” आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल.


मी आपल्या देशात अश्शूरचा चुराडा करीन, माझ्या पर्वतांवर त्याला पायांखाली तुडवीन; तेव्हा त्याचे जूं त्यांच्यावरून निघेल, त्यांच्या खांद्यांवरून त्याचे ओझे उतरेल.”


तुला खाली पाडतील तेव्हा तू भूमीतून बोलशील; धुळीतून तुझा शब्द हळूच निघेल; जमिनीतून भुतासारखा तुझा ध्वनी उठेल; धुळीतून कुजबुजल्यासारखी तुझी वाणी निघेल.


तेव्हा तिच्या वेशी आकांत करतील, शोकाकुल होतील व ती एकटी1 होऊन भुईवर बसेल.


तेव्हा तू आपल्या मनात म्हणशील, ‘माझी मुले तर हिरावून नेली आहेत, मी वांझ आहे, मी स्वदेशाला मुकले आहे, व परागंदा झाले आहे, अशा माझ्यासाठी ह्यांना जन्म कोणी दिला? ह्यांना लहानाचे मोठे कोणी केले? पाहा, मी एकटीच उरले होते; ही कोठे होती?”’


दबलेला मुक्त होण्याची त्वरा करतो, तो मरणार नाही, गर्तेत पडणार नाही. त्याला अन्नाची वाण पडणार नाही.


ज्या पीडा करणार्‍यांनी तुझ्या जिवाला म्हटले, खाली वाक म्हणजे आम्ही तुझ्यावरून चालून जाऊ, आणि तुझ्यावरून ज्या चालणार्‍यांसाठी तू आपली पाठ, भूमी व रस्ता अशी केली, त्यांच्या हाती मी तो प्याला देईन.”


ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे.


प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे; कारण दीनांना शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांना मुक्तता व बंदिवानांना बंधमोचन विदित करावे;


कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्‍याचा सोटा मोडला आहेस.


माझ्या लोकांनो, तुम्ही त्यांच्यातून निघून जा! परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा.


जे तुम्ही तलवारीपासून निभावला आहात ते तुम्ही निघून जा, थांबू नका! दुरून परमेश्वराचे स्मरण करा, यरुशलेम आपल्या मनात वागवा.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


मळ्यातील झाडे फलद्रूप होतील, भूमी आपला उपज देईल व ते आपल्या देशात निर्भयपणे वसतील; मी त्यांच्यावरील जोखडांची बंधने तोडून ज्यांनी त्यांच्याकडून दास्य करून घेतले त्यांच्या हातून त्यांना सोडवीन तेव्हा त्यांना समजेल की मी परमेश्वर आहे.


अहो, तुम्ही उत्तरेकडील देशाहून पळून या, असे परमेश्वर म्हणतो; मी तर तुम्हांला आकाशातील चार्‍ही वार्‍यांप्रमाणे चोहोकडे विखरले आहे, असे परमेश्वर म्हणतो.


अगे सीयोने, बाबेलकन्येबरोबर राहणारे, आपला बचाव कर.


ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.’


“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास, [भग्नहृदयी जनांस बरे करण्यास] त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे;


मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘माझ्या लोकांनो,’ तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan