Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 52:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तुम्हांला घाईघाईने निघावे लागणार नाही, पळ काढावा लागणार नाही; कारण परमेश्वर तुमचा पुढारी आहे; इस्राएलाचा देव तुमचा पाठीराखा आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण तुम्ही घाईने निघणार नाही, किंवा तुम्हास पळून जाणे भाग पडणार नाहीत. कारण परमेश्वर तुमच्यापुढे जाणार, आणि इस्राएलचा देव तुमच्या पाठीशी असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 परंतु तुम्हाला इथून पलायन करावे लागणार नाही वा घाईने निघावे लागणार नाही; कारण याहवेह तुमच्यापुढे जातील, आणि इस्राएलचे परमेश्वर तुमचे पाठीराखे असतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 52:12
23 Iomraidhean Croise  

तुतीच्या झाडांच्या शेंड्यांमधून सेना कूच करीत आहे असा आवाज तुझ्या कानी पडताच युद्धासाठी पुढे चालू लाग, कारण पलिष्ट्यांच्या सेनेचा संहार करण्यासाठी देव तुझ्या अग्रभागी गेला आहे असे समज.”


ते तुम्ही ह्या रीतीने खावे : तुमच्या कंबरा कसून, पायांत जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे; हा परमेश्वराचा ‘वल्हांडण सण’ (ओलांडून जाण्याचा सण) होय.


इस्राएल लोकांनी देशातून धांदलीने निघून जावे म्हणून मिसरी लोकांनी त्यांच्यामागे तगादा लावला; ते म्हणाले, “आम्ही सगळे मेलोच आहोत.”


त्यांनी आपल्याबरोबर मिसर देशातून मळलेली कणीक आणली होती, तिच्या बेखमीर भाकरी भाजल्या, तिच्यात काही खमीर नव्हते; मिसर देशातून त्यांना जबरीने बाहेर काढले होते, म्हणून त्यांना थांबायला अवकाश मिळाला नाही; त्यांना खाण्यासाठी काही तयार करून घेता आले नाही.


परमेश्वराने मिसराचा राजा फारो ह्याचे मन कठीण केले आणि तो इस्राएल लोकांच्या पाठीस लागला; इस्राएल लोक तर मोठ्या धैर्याने चालले होते.


नीतिमानाचा मार्ग नीट आहे; तू न्यायपरायण असून नीतिमानाची गती सरळ करतोस.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे; ‘विश्वास ठेवणार्‍याची त्रेधा उडणार नाही.’


माहीत नाही अशा रस्त्याने मी आंधळ्यांना नेईन; अज्ञात अशा मार्गांनी मी त्यांना चालवीन; त्यांच्यापुढे अंधकार प्रकाश होईल व उंचसखल जागा सपाट मैदान होईल असे करीन. ह्या गोष्टी मी करणार, सोडणार नाही.


“परमेश्वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेन व उंचसखल असलेले सपाट करीन; मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन.


त्यांना तहानभूक लागणार नाही; झळई व ऊन ह्यांची बाधा त्यांना होणार नाही; कारण त्यांच्यावर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याच्या झर्‍यांवर तो त्यांना नेईल.


मी आपले सर्व पर्वत धोपट मार्ग करीन, माझे राजमार्ग उंच होतील.


दबलेला मुक्त होण्याची त्वरा करतो, तो मरणार नाही, गर्तेत पडणार नाही. त्याला अन्नाची वाण पडणार नाही.


मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन; मी त्याला मार्ग दाखवीन, मी त्याचे, त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन.


असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेल, तुझी जखम लवकर भरेल, तुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल व परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल.


तोडफोड करणारा त्यांच्यापुढे चालत आहे; ते वेस फोडून वेशीतून पार निघून गेले; त्यांचा राजा त्यांच्यापुढे चालत आहे व परमेश्वर त्यांच्या अग्रभागी आहे.


मग सर्व छावण्यांच्या पाठीमागे असलेल्या दान वंशाच्या छावणीचे निशाण त्यांच्या दलांप्रमाणे निघाले; त्यांचा सेनानायक अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर त्यांच्या दलावर होता.


त्याच्या मांसाबरोबर खमिराची भाकर खाऊ नये; सात दिवस तू त्याबरोबर बेखमीर भाकर म्हणजे दु:खस्मारकाची भाकर खावी, कारण तू मिसर देशातून धांदलीने बाहेर निघालास; ह्यामुळे मिसर देशातून निघाल्या दिवसाची तुला जन्मभर आठवण राहील.


कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे.’


झाडून सारे लोक उतरून गेल्यावर त्यांच्यादेखत परमेश्वराचा कोश आणि याजक पलीकडे गेले.


सशस्त्र लोक रणशिंगे वाजवणार्‍या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते.


दबोरा बाराकाला म्हणाली, “ऊठ, आजच परमेश्वराने सीसराला तुझ्या हाती दिले आहे; परमेश्वर तुझ्यापुढे निघाला आहे ना?” मग बाराक व त्याच्या पाठोपाठ दहा हजार लोक ताबोर डोंगरावरून उतरले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan