Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 52:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 निघा, निघा, तेथून निघून जा; अशुद्ध वस्तूला शिवू नका; तिच्यामधून निघून जा; परमेश्वराची पात्रे वाह-णार्‍यांनो, तुम्ही आपणांस शुद्ध करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तुम्ही निघा, तुम्ही निघा, तुम्ही येथून निघून जा, अपवित्र गोष्टींना स्पर्श करू नका. तुम्ही त्यामधून निघून जा, जे तुम्ही परमेश्वराची पात्रे वाहता ते तुम्ही आपणाला शुद्ध करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 निघा, निघा, इथून बाहेर पडा! अपवित्र वस्तूला स्पर्श करू नका! तुम्ही जे याहवेहच्या मंदिरातील पात्रांची नेआण करता, इथून बाहेर पडा व स्वतःला शुद्ध करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 52:11
37 Iomraidhean Croise  

“तुम्ही लेव्यांच्या पितृकुळांतील प्रमुख पुरुष आहात; तुम्ही आपल्या भाऊबंदांसह शुचिर्भूत व्हा, मग इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्या कोशासाठी जे स्थळ मी तयार केले आहे तेथे तो नेऊन पोचवा.


त्यात अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हातपाय धुवावेत;


आपणांस धुवा, स्वच्छ करा; माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्मांचे दुष्टपण दूर करा; दुष्टपणा करण्याचे सोडून द्या;


तुम्ही बाबेलातून निघा, खास्दी लोकांमधून जयजयकार करीत पळत सुटा; हे कळवा, ऐकवा, दिगंतापर्यंत असे पुकारा की, “परमेश्वराने आपला सेवक याकोब ह्याचा उद्धार केला आहे.”


परमेश्वर म्हणतो, परमेश्वराच्या मंदिरात जसे इस्राएल लोक परमेश्वरास शुद्ध पात्रांतून अन्नार्पण आणतात तसे सर्व राष्ट्रांमधून तुमच्या बांधवांना अर्पण म्हणून घोड्यांवर, रथांत, पालख्यांत, खेचरांवर व सांडणींवर बसून यरुशलेमेस माझ्या पवित्र पर्वतावर आणतील.


वाटेवर आपल्यासाठी खुणा कर; खुणेचे खांब उभे कर; ज्या मार्गाने तू गेलीस त्या सडकेवर आपले चित्त ठेव; हे इस्राएलाच्या कुमारी, परत ये, तुझ्या ह्या नगरास परत ये.


बाबेलातून पळून जा, खास्द्यांच्या देशातून निघून जा; कळपाच्या पुढे चालणार्‍या एडक्यांसारखे व्हा.


माझ्या लोकांनो, तुम्ही त्यांच्यातून निघून जा! परमेश्वराच्या संतप्त क्रोधापासून तुम्ही प्रत्येक जण आपला बचाव करा.


बाबेलातून पळून जा, तुम्ही आपापले जीव वाचवा; त्याच्या दुष्कर्मामुळे तुम्ही आपला नाश करून घेऊ नका; कारण हा परमेश्वराचा सूड घेण्याचा समय आहे; त्याच्या करणीचे तो त्याला प्रतिफळ देत आहे.


त्यांनी माझ्या लोकांना शिक्षण द्यावे; पवित्र काय व सामान्य काय, शुद्ध काय व अशुद्ध काय, ह्यांचा भेद त्यांना त्यांनी दाखवून द्यावा.


ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वराने सांगितले ते हे : जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझा गौरव होईल.” तेव्हा अहरोन चूप राहिला.


कारण तुमचा देव व्हावे म्हणून ज्याने तुम्हांला मिसर देशातून इकडे आणले तोच मी परमेश्वर आहे; मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र व्हा.”


अशुद्ध व शुद्ध, भक्ष्य प्राणी व अभक्ष्य प्राणी हा भेद ओळखण्याचा हा नियम होय.”


त्यांनी आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र राहावे आणि आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये; ते परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणजे आपल्या देवाप्रीत्यर्थ अन्न अर्पण करीत असतात; म्हणून त्यांनी पवित्र राहावे.


हे सीयोनकन्ये जयजयकार व उल्लास कर; कारण पाहा, मी येईन, मी तुझ्यात वस्ती करीन, असे परमेश्वर म्हणतो.


त्या दिवसांत बहुत राष्ट्रे परमेश्वराला येऊन मिळतील व माझी प्रजा बनतील; मी तुझ्या ठायी वस्ती करीन, मग तुला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला तुझ्याकडे पाठवले आहे.


तो मंडळीला म्हणाला, “तुम्ही ह्या दुष्ट मनुष्यांच्या तंबूंपासून निघून जा. त्यांच्या कोणत्याही वस्तूला शिवू नका; नाहीतर त्यांच्या सर्व पापांचे भागीदार होऊन तुम्ही नाश पावाल.”


एखाद्या मनुष्याच्या शवाला कोणी शिवला तर त्याने सात दिवस अशुद्ध राहावे;


खुल्या मैदानात तलवारीने वधलेल्या शवाला, मृत देहाला, मनुष्याच्या हाडाला अथवा कबरेला कोणी शिवेल तर त्याने सात दिवस अशुद्ध असावे.


“इस्राएल लोकांमधून लेव्यांना वेगळे करून शुद्ध कर.


पेत्र म्हणाला, “नको, नको, प्रभू; कारण निषिद्ध आणि अशुद्ध असे काही मी कधीही खाल्ले नाही.”


त्याने त्यांना म्हटले, “तुम्हांला ठाऊकच आहे की, यहूदी मनुष्याने अन्य जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्याच्याकडे जाणेयेणे ठेवणे हे त्याच्या रीतीरिवाजाविरुद्ध आहे; तथापि कोणाही मनुष्याला निषिद्ध किंवा अशुद्ध म्हणू नये असे देवाने मला दाखवले आहे.


मला ठाऊक आहे आणि प्रभू येशूमध्ये माझी खातरी आहे की, कोणताही पदार्थ मूळचा निषिद्ध नाही; तथापि अमुक पदार्थ निषिद्ध आहे, असे समजणार्‍याला तो निषिद्धच आहे.


म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’


अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा;


प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा.


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘माझ्या लोकांनो,’ तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan