Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 52:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 सियोने, जागी हो, जागी हो, आपली शक्ती धारण कर, यरूशलेमे, पवित्र नगरी, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर. कारण यापुढे सुंता न झालेला व अपवित्र असा कोणी पुन्हा तुझ्यामध्ये येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 ऊठ, ऊठ, हे सीयोना, सामर्थ्याचे वस्त्र परिधान कर! यरुशलेम, हे पवित्र नगरी, आपली वैभवशाली वस्त्रे परिधान कर. बेसुंती आणि भ्रष्ट यापुढे तुझ्या वेशीतून प्रवेश करणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 52:1
40 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या नामाची थोरवी गा; अर्पण घेऊन त्याच्यासमोर या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.


लोकांचे अधिपती यरुशलेमेत राहत असत; वरकड लोकांपैकी दहांतल्या एकाने पवित्र नगर यरुशलेम येथे राहावे आणि नऊ जणांनी इतर नगरांत वस्ती करावी हे ठरवण्यासाठी त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.


तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिवरासारखे आहेत.


आणि गौरवासाठी व शोभेसाठी तू आपला भाऊ अहरोन ह्याच्याकरता पवित्र वस्त्रे तयार कर.


अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे करावेत; त्यांच्या-साठी कमरबंद व फेटे करावेत, ही वस्त्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावीत.


साध्वी नगरी कशी असाध्वी झाली आहे? ती न्यायपूर्ण होती, तिच्यात नीतिमत्ता वसत असे, आता तिच्यात घातकी राहतात.


आणि मी तुझ्यावर पूर्वीप्रमाणे न्यायाधीश व आरंभीच्याप्रमाणे मंत्री पुन्हा नेमीन; आणि मग तुला नीतिमत्तेची नगरी, विश्वासू नगरी म्हणतील.”


वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे नीतिमान राष्ट्र आत येईल.


तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत.


मग असे होईल की सीयोनेत उरलेल्या, यरुशलेमेत शेष राहिलेल्या ज्या प्रत्येकाचे नाव यरुशलेमेतील जीवन पावणार्‍यांच्या यादीत लिहिले आहे त्या प्रत्येकाला पवित्र म्हणतील.


ते तर आपणांस पवित्र नगराचे म्हणवतात व इस्राएलाच्या देवाचा आश्रय करतात; त्याचे नाम सेनाधीश परमेश्वर आहे.


आपले डोळे वर कर, चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होऊन तुझ्याकडे येत आहेत. परमेश्वराचे वचन असे आहे की माझ्या जिवाची शपथ, तू खरोखर त्या सर्वांना अलंकाराप्रमाणे लेशील; नववधूप्रमाणे तू त्यांना आपल्या अंगावर घालशील.


हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.


हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो; पूर्वकाळच्या दिवसांतल्याप्रमाणे, प्राचीन युगातल्याप्रमाणे जागृत हो. राहाबास छिन्नभिन्न करणारा तूच नव्हेस काय? मगरास विंधणारा तूच नव्हेस काय?


ऊठ, प्रकाशमान हो; कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे; परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावले आहे.


तुझे सर्व लोक नीतिमान होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील; माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील,


मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वत:ला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत; मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.


सीयोनेतील शोकग्रस्तांना राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यांना शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे; खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे; ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यांना नीतिमत्तेचे वृक्ष परमेश्वराने लावलेले रोप म्हणता यावे म्हणून त्याने मला पाठवले आहे.


तुझी पवित्र नगरे वने बनली आहेत; सीयोन रान बनली आहे; यरुशलेम ओसाड झाली आहे.


सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो की, “मी यहूदा देशाचा व त्यातील नगरांचा बंदिवास उलटवीन तेव्हा ह्या देशात लोक पुन्हा हे आशीर्वचन म्हणतील : हे नीति-मत्तेच्या निवासा, पावित्र्याच्या गिरी, परमेश्वर तुझे कल्याण करो!


प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्राएल वंशजांमध्ये राहणार्‍या, मनाने व शरीराने बेसुंती असलेल्या परदेशीयांपैकी कोणी माझ्या पवित्रस्थानात प्रवेश करता कामा नये.


तरी त्याच्या शब्दांचा ध्वनी माझ्या कानी पडला; मी त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला तेव्हा मी भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली.


“सीयोनेवर, माझ्या पवित्र डोंगरावर राहणारा परमेश्वर तुमचा देव मी आहे हे तुम्हांला कळेल, तेव्हा यरुशलेम पवित्र स्थळ होईल; ह्यापुढे परके त्यातून येणार-जाणार नाहीत.


शुभसंदेश असणारा, शांती जाहीर करणारा असा जो, त्याचे पाय पर्वतावर पाहा! हे यहूदा, आपले सण पाळ, आपले नवस फेड; कारण ह्यापुढे तुझ्यामधून दुष्ट पुरुष येणारजाणार नाही; त्याचा समूळ उच्छेद झाला आहे.


हे जरूब्बाबेला, हिम्मत धर,’ असे परमेश्वर म्हणतो; ‘हे मुख्य याजका, यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर; परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा; मी तुमच्याबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


त्याच्यासमोर जे उभे होते त्यांना तो उत्तरादाखल म्हणाला, “त्याच्यावरची मलीन वस्त्रे काढा.” तो त्याला म्हणाला, “पाहा, मी तुझा अधर्म तुझ्यापासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालत आहे.”


मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले;


पण बापाने आपल्या दासांना सांगितले, ‘लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायांत जोडे घाला,


तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.


हे देवाचे नीतिमत्त्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही.


आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.


म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2


शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.


तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना दिले’ आहे; आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी ‘तुडवतील.’


स्वर्गातील सैन्ये पांढर्‍या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती.


तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे;” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत.


तेव्हा मी ‘पवित्र नगरी, नवी यरुशलेम’, देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवर्‍यासाठी ‘शृंगारलेल्या नवरीप्रमाणे’ सजवलेली होती.


‘तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी’ आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम ह्यांचा ‘प्रवेश होणारच नाही’ तर कोकर्‍याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा’ मात्र होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan