Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 51:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 हे परमेश्वराच्या भुजा, जागृत हो, जागृत हो, बलयुक्त हो; पूर्वकाळच्या दिवसांतल्याप्रमाणे, प्राचीन युगातल्याप्रमाणे जागृत हो. राहाबास छिन्नभिन्न करणारा तूच नव्हेस काय? मगरास विंधणारा तूच नव्हेस काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 परमेश्वराच्या बाहू जागा हो, जागा हो, आणि सामर्थ्य धारण कर, जसा प्राचीन दिवसात, पुरातन काळात तसा जागा हो. ज्याने समुद्रातील राक्षसास आणि मगराला भोसकले तो तूच नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 उठा, उठा, हे याहवेहच्या भुजा, सामर्थ्याचे वस्त्र परिधान करा. उठा, पूर्वी जसे जागे झाले होते, पुरातन पिढीत जसे उठले होते. नाईल नदीतील राहाब सर्पाचे तुकडे केले, ते तुम्हीच नाही का, त्या समुद्रातील राक्षसाचा छेद केला, ते तुम्हीच नाही का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 51:9
40 Iomraidhean Croise  

तो आपल्या सामर्थ्याने समुद्र शमवतो;2 तो आपल्या बुद्धिबलाने राहाब छिन्नभिन्न करतो;


देव आपला क्रोध आवरत नाही; राहाबाचे1 सहकारी त्याच्यापुढे दबून जातात.


हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो; आम्ही गायनवादन करून तुझा पराक्रम वाखाणू.


हे देवा, आमच्या पूर्वजांच्या दिवसांत, पुरातन काळी, तू जे कार्य केलेस त्याचे वर्णन त्यांनी केले, व ते आम्ही आपल्या कानांनी ऐकले.


तू आपल्या हाताने राष्ट्रांना घालवून तेथे ह्यांना स्थापले; त्या लोकांना क्लेश देऊन ह्यांचा विस्तार केला.


हे प्रभू, जागा हो, का झोपलास? ऊठ, आमचा कायमचा त्याग करू नकोस.


तू आपले मुख का लपवतोस? आमचे दुःख व आमचा छळ का विसरतोस?


माझा दोष नसता ते धावून सज्ज होत आहेत. मला साहाय्य करावे म्हणून तू जागा होऊन पाहा.


हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन ऊठ; माझे शत्रू संतापले असता त्यांच्याविरुद्ध उभा राहा; माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहेस;


पूर्वीचे दिवस व प्राचीन काळची वर्षे ही मी ध्यानात आणली आहेत.


तेव्हा प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला. द्राक्षारस पिऊन आरोळी मारणार्‍या वीरासारखा उठला.


राहाब व बाबेल मला ओळखतात असे मी विदित करीन; पाहा, पलेशेथ, सोर व कूश म्हणतात, ह्याचा जन्म तेथलाच.


तू राहाबाला1 ठेचून ठार केले आहेस; तू आपल्या बाहुबलाने आपल्या शत्रूंची दाणादाण केली आहेस.


आकाश तुझे आहे, पृथ्वीही तुझी आहे; जग व त्यातले सर्वकाही तूच स्थापले आहेस.


परमेश्वर राज्य करतो, त्याने ऐश्वर्याचा पेहराव घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचा पेहराव घालून कंबर कसली आहे; म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही.


म्हणून इस्राएल लोकांना सांग, ‘मी परमेश्वर आहे; मी तुम्हांला मिसरी लोकांच्या बिगारीच्या ओझ्याखालून काढीन, त्यांच्या दास्यातून तुम्हांला मुक्त करीन आणि हात पुढे केलेल्या बाहूने व मोठ्या शिक्षा करून तुमचा उद्धार करीन;


त्या दिवशी परमेश्वर आपल्या दु:खकर, महान व बलवान खड्गाने चपल सर्प लिव्याथान व वक्र सर्प लिव्याथान ह्यांचे पारिपत्य करील; समुद्रातील अजगराला ठार मारील.


मिसराचे साहाय्य कवडीमोल व व्यर्थ ठरेल, म्हणून ह्या मिसरास “राहाब म्हणजे स्वस्थ बसणारे महामुख” असे नाव मी देतो.


हे यरुशलेमे, जागी हो, जागी हो, ऊठ; तू परमेश्वराच्या हातून त्याच्या क्रोधाचा प्याला पिऊन टाकला आहेस; झोकांडे देणारा कटोरा तू प्यालीस, त्यातील थेंबही उरला नाही.


माझा न्याय समीप आला आहे, माझे उद्धारकार्य सुरू झाले आहे, माझे भुज राष्ट्रांचा न्याय करतील; द्वीपांना माझा ध्यास लागला आहे, त्यांचा भरवसा माझ्या बाहूंवर आहे.


हे सीयोने, जागी हो; आपल्या बलाने युक्त हो; हे यरुशलेमे, पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर; कारण ह्यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठायी प्रवेश करणार नाही.


परमेश्वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारली आहे;1 सगळ्या दिगंतांना आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.


आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?


परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की, “ह्यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूंना मी खातरीने खाऊ देणार नाही; तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षारस परके प्राशन करणार नाहीत;


त्याच्याबरोबर बोल; त्याला सांग : प्रभू परमेश्वर म्हणतो, पाहा, हे मिसर देशाच्या फारो राजा, आपल्या नद्यांत पडून राहणार्‍या मोठ्या मगरा, तू जो म्हणतोस की, ‘नदी माझी आहे, मी ती स्वतःसाठी निर्माण केली आहे,’ त्या तुझ्याविरुद्ध मी आहे.


तू मिसर देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन.


जो काष्ठास म्हणतो, ‘जागे हो’; मुक्या पाषाणास म्हणतो, ‘ऊठ!’ त्याला धिक्कार असो. त्याला काही शिकवता येईल काय? पाहा, ती मूर्ती सोन्यारुप्याने मढवली आहे, पण आत पाहावे तर जिवाचा पत्ता नाही.


तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. आपल्या अभिषिक्ताच्या सुटकेसाठी निघाला आहेस; तू दुर्जनांचे घर पायापासून मानेपर्यंत उघडे करतोस, त्याच्या शिराचे आपटून तुकडे करतोस. (सेला)


तो संकटसमुद्रातून पार जाऊन समुद्रलहरींना दबकावील; नील नदीचे सर्व गहिरे पाणी सुकून जाईल. अश्शूराचा गर्व उतरेल, मिसरचे राजवेत्र निघून जाईल.


सर्व मानवहो, परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे.


त्याने आपल्या ‘बाहूने’ पराक्रम केला आहे; जे आपल्या अंतःकरणाच्या कल्पनेने ‘गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दाणादाण केली आहे.’


हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे : “प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?”


ज्या राष्ट्राच्या दास्यात ते असतील त्याचे पारिपत्य मी करीन,’ असे देवाने सांगितले; आणि ‘त्यानंतर ते तेथून निघून माझी सेवा ह्या स्थळी करतील.’


त्याप्रमाणेच तुमचा देव परमेश्वर ह्याने मिसर देशातून तुमच्यासाठी तुमच्यादेखत संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी बाहू आणि उगारलेला हात ह्यांच्या योगे भयप्रद कृत्ये केली तशी कृत्ये करून देवाने आपल्यासाठी एखादे राष्ट्र इतर राष्ट्रांमधून काढून घेण्याचा कधी प्रयत्न केला काय?


“हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था; जो तू आहेस व होतास [व येणार], तो तू, आपले महान सामर्थ्य धारण केले आहेस आणि ‘राज्यारूढ झाला आहेस’ म्हणून आम्ही तुझे आभार मानतो.


मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला, म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल1 व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट ‘साप’ खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याच्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले.


गिदोन त्याला म्हणाला, “महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर नाही का आणले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हांला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हांला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan