यशायाह 51:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 वर आकाशाकडे आपले डोळे लावा, खाली पृथ्वीकडे लक्ष द्या; कारण आकाश धुराप्रमाणे विरून जाईल, पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल, तिचे रहिवासी चिलटांप्रमाणे मरतील; तरी माझे तारण सर्वकाळ टिकेल, माझा न्याय भंग पावणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तू आपले डोळे वर आकाशाकडे लाव, आणि खाली पृथ्वीवर सभोवती पाहा. धुक्याप्रमाणे आकाशे नाहीसे होतील, पृथ्वी वस्राप्रमाणे जीर्ण होईल, आणि तिच्यातील राहणारे चिलटाप्रमाणे मरतील, परंतु माझे तारण अनंतकाल राहील, आणि माझी धार्मिकता तिचे काम करणे थांबवणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुमची दृष्टी वर आकाशाकडे करा, आणि खाली पृथ्वीकडे पाहा; आकाश धुरासारखे विरून नाहीसे होईल, पृथ्वी वस्त्रांप्रमाणे जीर्ण होईल आणि पृथ्वीवरील लोक चिलटांप्रमाणे मरतील. परंतु माझे तारण सदासर्वकाळ टिकेल. माझ्या नीतिमत्तेचा कधीही अंत होणार नाही. Faic an caibideil |