Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 51:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तिने जन्म दिलेल्या मुलांपैकी कोणी तिला मार्गदर्शक नव्हता. तिने वाढवलेल्या मुलांपैकी कोणी तिचा हात धरला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 ज्या मुलांना तिने जन्म दिला त्या सर्वांपैकी तिला कोणीही मार्गदर्शन करून चालवायला नाही, आणि ज्या मुलांना तिने वाढवीले त्या सर्वांपैकी कोणी तिचा हात धरीत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 तिने जन्माला घातलेल्या लेकरांपैकी तिचे मार्गदर्शन करण्यासाठी कोणीही नव्हते; तिने संगोपन केलेल्या लेकरांपैकी तिचा हात धरून चालविण्यासाठी कोणीही नव्हते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 51:18
18 Iomraidhean Croise  

पाहा, देव सात्त्विक मनुष्याचा अव्हेर करीत नाही. तो कुकर्म्याला हाती धरत नाही.


माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पाहा, मला ओळखणारा कोणी नाही; मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची पर्वा करणारा कोणी नाही.


तू माझ्यापासून प्रियजन व मित्र दूर केले आहेत, माझ्या परिचयाचा काय तो अंधकारच आहे.


कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, “भिऊ नकोस, मी तुला साहाय्य करतो.”


परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्‍त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे; राजांना आपल्या कमरा सोडायला मी लावतो; त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करतो.


तेव्हा तू आपल्या मनात म्हणशील, ‘माझी मुले तर हिरावून नेली आहेत, मी वांझ आहे, मी स्वदेशाला मुकले आहे, व परागंदा झाले आहे, अशा माझ्यासाठी ह्यांना जन्म कोणी दिला? ह्यांना लहानाचे मोठे कोणी केले? पाहा, मी एकटीच उरले होते; ही कोठे होती?”’


अगे पिडलेले, वादळांनी त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमण्यांनी तुझा पाया घालीन.


माझा डेरा लुटला आहे, माझे सर्व दोर तुटले आहेत; माझे पुत्र निघून गेले आहेत; ते नाहीत; माझा डेरा ताणायला कोणी नाही, माझ्या कनाती लावायला कोणी नाही.


परमेश्वर म्हणतो मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार होणार नाही; मी त्याच्याबरोबर विवाह केला तरी तो माझा करार त्यांनी मोडला.


माझी मेंढरे सर्व डोंगरांवरून, सर्व उंच टेकड्यांवरून भटकत आहेत; देशभर माझी मेंढरे उपलब्ध आहेत; त्यांची कोणाला शुद्ध नाही, कोणी त्यांना शोधत नाही.


“इस्राएल-कुमारी पडली आहे; ती पुन्हा उठायची नाही; तिला आपल्या भूमीवर टाकून दिले आहे; तिला उठवणारा कोणी नाही.”


त्यांना असू द्या; ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडे आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”


तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते.


तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले व त्याच्या डोळ्यांत थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?”


तर पाहा, आता प्रभूचा हात तुला प्रतिकूल आहे, तू आंधळा होशील, व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही.” तत्क्षणीच त्याच्यावर धुके पडल्यासारखे होऊन त्याच्या डोळ्यांना अंधारी आली; तेव्हा आपल्याला कोणीतरी हात धरून न्यावे म्हणून तो इकडे तिकडे माणसांचा शोध करू लागला.


मग शौलाला जमिनीवरून उठवले आणि त्याने डोळे उघडले, तेव्हा त्याला काही दिसेना; मग त्यांनी त्याला हाताला धरून दिमिष्कात नेले.


मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत, आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan